Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
अपडेटेड 8 मिनिटांपूर्वी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी लागलाआहे.
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सकाळी अकरा वाजता राज्य मंडळ कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग तसंच लिंगनिहाय निकाल जाहीर करण्यात येत आहे.
तर निकालाची लिंक दुपारी एक वाजता सक्रिय होईल.
इथे ‘असा’ पाहू शकता निकाल
दहावी आणि बारावी या इयत्तांचे निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळं देण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे,
इयत्ता दहावीचा हा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- https://mahahsscboard.in/ या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर, तुमचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव इंग्रजीमध्ये टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पहायला मिळेल.

फोटो स्रोत, Getty Images
परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
त्याचप्रमाणे, Digilocker अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
निकालाची टक्केवारी
दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 1.71 टक्क्यांनी कमी आहे.
यावर्षी 15,58,020 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. 15,46,579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के लागला, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी 90.78 टक्के लागला.
दहावीच्या परीक्षेत 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांचा निकाल 92.31 टक्के लागला.
62 पैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.
211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले.
नुकताच लागला बारावीचा निकाल
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्रातील एकूण 91.88 टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (96.73 टक्के) लागला असून. लातूर विभागाचा सर्वात कमी (89.46 टक्के)निकाल लागला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या निकालात 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत आणि मुलांचं प्रमाण मुलींपेक्षा कमी (89.51 टक्के) आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC