Source :- ZEE NEWS
India Pakistan Kundli Astrologers: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चाललाय. हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल वेगवेगळ्या मार्गाने कारवाई केली जातेय. यामुळे पाकिस्तान भीतीने थरथर कापतोय. यासोबतच भारताकडून इतर कोणत्याही कारवाईची पाकिस्तानला खूप भीती वाटतेय. ज्याचा अंदाज त्याच्या वागण्यावरून येतोय. दरम्यान भारत आणि जगातील प्रसिद्ध ज्योतिषींनी पाकिस्तानच्या कुंडलीचे विश्लेषण केलंय. पाकिस्तानबाबत ज्योतिषांचे सर्वात मोठे भाकित काय आहे? ते जाणून घेऊया.
भारताची कीर्ती वाढेल
ज्योतिषांच्या मते भारताची कुंडली वृषभ लग्नाची आहे. यावेळी भारतीय कुंडलीत सूर्याची अंतर्दशा सुरू आहे आणि सूर्य कुंडलीतील चौथ्या घराचा स्वामी आहे. यासोबतच चंद्राच्या स्थितीत सूर्याचा अंतरदशा भारताच्या कुंडलीत उपस्थित आहे. सप्टेंबर 2025 मध्ये भारताची कीर्ती आणखी वाढेल आणि हा भारताच्या सौभाग्याचा काळ असेल, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. येत्या काळात भारताचा भूभागदेखील वाढेल. भारताची राशी मकर आहे आणि यावेळी ग्रहांची स्थिती भारतासाठी खूप अनुकूल आणि सकारात्मक आहे. मे महिन्यात 3 मोठे ग्रह आपली हालचाल बदलतील. अशावेळी ग्रहांची ही स्थिती पाकिस्तानला भयानक आर्थिक आणि लष्करी संकटात टाकेल. तर भारताची स्थिती मजबूत होण्याची चिन्हे असल्याचे ज्योतिषी सांगतायत. झी न्यूजच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या कुंडलीतील धोकादायक मारकेश योग
पाकिस्तानच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची अंतरदशा आणि चंद्राची महादशा चालू आहे. यासह शुक्र मारकेश बनून पाकिस्तानचा नाश करण्यास सज्ज आहे. लवकरच पाकिस्तानचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून पुसले जाण्याची शक्यता ज्योतिष व्यक्त करतायत.
गुरूचे अत्याचारी पाऊल पाकिस्तानला पडेल महागात
ज्योतिषी प्रकाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’14 मे नंतर गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीत गुरुचे संक्रमण होताच पाकिस्तानच्या कुंडलीत अंग-भांग नावाचा योग तयार होईल जो पाकिस्तानचा नाश करेल.’
पंचग्रही योग आणि कालसर्प योगामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान
गुरू ग्रहाचे भ्रमण पाकिस्तानसाठी धोकादायक ठरेल. पंचग्रही योग आणि कालसर्प योगाच्या प्रभावामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया ज्योतिषी कृष्ण तारा यांनी दिलीय.
मंगळ ग्रह करेल कहर, पाकिस्तानचे 2 भाग
मंगळाच्या महादशा आणि मंगळाच्या अंतरदशामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढतील. मंगळ क्रोध आणि रक्ताचा कारक असल्याने पाकिस्तानच्या भूमीवर रक्त सांडेल. 1 सप्टेंबर 2025 पूर्वी पाकिस्तान 2 भागात विभागला जाईल, असे ज्योतिषी राजा मिश्रांनी सांगितले.
खप्पड योगामुळे मोठ्या युद्धाची शक्यता!
ज्योतिषशास्त्रातील सर्व मोठे तज्ञ म्हणतात की, लवकरच खप्पड योग नावाचा एक धोकादायक योग तयार होईल. जो पाकिस्तानसाठी एक मोठे संकट निर्माण करेल. एवढेच नव्हे तर हे संयोजन इतके धोकादायक आहे की त्याचा परिणाम महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण करेल आणि पाकिस्तानचा नाश करेल.
SOURCE : ZEE NEWS