Source :- ZEE NEWS

Pakistan Richest Hindu: फाळणीनंतर पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. यामुळे पाकिस्तानमध्ये देखील अनेक हिंदू राहतता. पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या खूपच कमी असली तरी, तिथेही हिंदू आपला झेंडा फडकवत आहेत.   व्यापार कलाविश्वात आणि अगदी राजकारणासह पाकिस्तानातील सर्वच क्षेत्रांमध्ये हिंदूंचे मोठे अस्तित्व आहे. पाकिस्तानातील टॉप ५ श्रीमंत हिंदू कोण आहेत हे जाणून घेऊया. 

दीपक पेरवानी हा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू आहे. सिंधी समुदायाशी संबंधित असलेल्या दीपक पेरवानी यांची गणना पाकिस्तानातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्समध्ये केली जाते. अनेक पाकिस्तानी नाटक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपक पेरवानी यांची एकूण संपत्ती सुमारे 71 कोटी रुपये आहे.

दीपक परवानी यांचे चुलत भाऊ नवीन परवानी हे त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नवीन पेरवानी हा एक प्रसिद्ध पाकिस्तानी स्नूकर खेळाडू आहे आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 60 कोटी रुपये आहे. ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत हिंदू आहेत. 
गेल्या ५ दशकांपासून पाकिस्तानमधील चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेली हिंदू अभिनेत्री संगीता तिसऱ्या स्थानावर आहेत. संगीताने अनेक प्रसिद्ध नाटके आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाकिस्तानी सेलिब्रिटींमध्ये गणली जाणारी संगीता एक अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका आहे. तिला परवीन रिझवी म्हणून ओळखले जाते. संगीता ही प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री जिया खानची मावशी आहे. संगीत उर्फ ​​परवीन रिझवी यांची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे.

पाकिस्तानच्या राजकारणातही हिंदूंचा देखील दबदबा आहे. अनेक हिंदू नेते येथील आमदार, खासदार आणि मंत्रीही राहिले आहेत. रीता ईश्वर 2013 ते 2018 पर्यंत पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या सदस्य होत्या. त्यांची गणना येथील श्रीमंत राजकारण्यांमध्ये केली जाते. रीता ईश्वरची एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे.

पाकिस्तानमधील हिंदू समुदायाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले डॉ. खातुमल जीवन हे देखील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक आहेत. संपत्तीच्या बाबतीतही पाकिस्तानी लोकांशी स्पर्धा करतात. डॉ. खातुमल यांची एकूण संपत्ती 15  कोटी रुपये आहे. त्यांनी 1988 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या तिकिटावर सिंध विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. अनेक सरकार सोबत त्यांनी काम केले आहे.  

SOURCE : ZEE NEWS