Source :- ZEE NEWS

Tiktoker Private Video :  सोशल मीडियावर सजल मलिक सध्या ट्रेंड करत आहेत. तिच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे. कोण आहे ही सजल मलिक आणि काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. सोशल मीडियावर अचानक ट्रेंडमध्ये येण्यामागे कारण ठरलं ते कथित तिचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये इंफ्लुएंसरचे कथित MMS लीक झाले असून त्यात सजल मलिकचं नाव आहे. 

सजल मलिकचा एमएमएस लीक 

खरं तर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सजल मलिकचा जो कथित खाजगी व्हिडीओ लीक झाला आहे त्यात ती आक्षेपार्ह स्थितीत दिसतेय. सजलच्या खाजगी व्हिडीओ लीक प्रकरणानंतर, सोशल मीडियावरील तिचे चाहते दोन गटात विभागले गेले असून काही तिचे समर्थन करत आहेत, तर काहींनी तिला वाईट रीतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

कोण आहे सजल मलिक?

सजल मलिक ही पाकिस्तानची एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून ती विशेषतः टिकटॉक, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर सक्रिय असते. तिने फॅशन, मेकअप आणि जीवनशैलीच्या कंटेंटसह आपली ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्स असून तरुण चाहत्यांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे.

दरम्यान सजलचा अश्लील व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाल्यानतंर सर्वत्र तिचीच चर्चा होतेय. काही जण हा फेक व्हिडीओ असल्याचे म्हणत आहे. तर काही लोक प्रसिद्धीसाठी असे व्हिडीओ लीक केल्याचही म्हणत आहे. खरं तर सत्य काय आहे हे फक्त सजललाच माहिती असले तरी तिने अद्याप या प्रकरणावर तिने मौन सोडलेले नाही. कथित खाजगी व्हिडीओ लीक प्रकरणावर सजल मलिककडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

गेल्या काही काळापासून, इन्फ्लुएंसरचे खाजगी व्हिडीओ ऑनलाइन लीक होण्याचा मुद्दा सुरू आहे. आता सजल मलिक देखील या ट्रेंडचा एक भाग बनली आहे. असा अनुभव घेणारी ती पहिली पाकिस्तानी सेलिब्रिटी नाहीये. यापूर्वी, मिनाहिल मलिक, इम्शा रहमान आणि इतरांचे कथित इंटिमेट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर त्यांची नावेही चर्चेत आली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मिनाहिल मलिकचा खाजगी व्हिडीओ लीक झाल्यानंतर तिने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) कडे गुन्हा दाखल केल्याचे वृत्त मिळतेय. 

SOURCE : ZEE NEWS