Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
- Author, चेरिलिन मोलान
- Role, बीबीसी न्यूज मुंबई
-
21 मे 2025, 07:30 IST
अपडेटेड 13 मिनिटांपूर्वी
भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना ‘हर्ट लॅम्प’ या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील हे पहिलेच पुस्तक आहे.
‘हर्ट लॅम्प’चा इंग्रजी अनुवाद दीपा भास्ती यांनी केला आहे.
या संग्रहात 1990 ते 2003 या तीन दशकांत बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या 12 लघुकथा समाविष्ट आहेत. या कथा दक्षिण भारतातील मुस्लीम महिलांचे जीवन आणि त्यांच्या संघर्षांचे चित्रण करणाऱ्या आहेत.
गीतांजल श्री यांच्या ‘रेत समाधी’ (Tomb of Sand) या पुस्तकापाठोपाठच आता मुश्ताक यांच्याही पुस्तकाला बुकरने गौरविण्यात आलं आहे.
‘रेत समाधी’चा इंग्रजी अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला होता. या पुस्तकाला 2022 इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
बानू मुश्ताक यांचे लेखनसाहित्य पुस्तकप्रेमींमध्ये चांगलेच परिचित आहे; पण बुकरसारख्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकामुळे त्यांचं आयुष्य आणि साहित्यिक प्रवास अधिक प्रकाशझोतात आला आहे. त्यांच्या कथा स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष दर्शवतात, ज्यामध्ये धार्मिकता आणि खोलवर रूजलेल्या पितृसत्ताक समाजामुळे आलेल्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं.
या आत्मजाणीवेतूनच कदाचित मुश्ताक यांना बारकाईने विचार करून साकारलेली पात्रं आणि कथानकं रेखाटण्यास मदत झाली असावी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC