Source :- ZEE NEWS
Baba Vanga Nostradamus Predictions: 2025 सालासाठी पैगंबर बाबा वांगा आणि नास्त्रेदमस यांनी केलेली भाकिते खूपच भयावह आहेत. जगभरात बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस आपल्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. या दोघांनी युरोपसह अनेक ठिकाणी विनाशाचे संकेत दिले होते आणि त्यांनी केलेली भाकिते खरी ठरत असल्याचे दिसते. कारण 2025 हे नवं वर्ष सुरु होऊन अवघे 14 दिवस झाले आहेत आणि अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या आपत्तीचे संकेत देत आहेत.
वर्ष सुरू होण्यापूर्वीच, 29 डिसेंबर 2024 रोजी, दक्षिण कोरियामध्ये विमान अपघातात 179 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 3 जानेवारी रोजी फुलरटन शहरातील एका इमारतीच्या छतावर एक छोटे विमान कोसळले, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 18 जण जखमी झाले. याशिवाय, वायव्य कोलंबियामध्ये एका लहान विमानाच्या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
2025 बद्दल नास्त्रेदमस यांनी केलेले भाकितं
नास्त्रेदमस यांनी त्यांच्या लेस प्रोफेसीज या पुस्तकात लिहिले आहे की, 2025 हे वर्ष अनेक कारणांमुळे धोकादायक ठरेल. या वर्षी एक महाकाय लघुग्रह पृथ्वीजवळून येईल. ज्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे नकारात्मक बदल होऊ शकतात. यासोबतच, नास्त्रेदमसने 2025 मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणीही केली आहे. नास्त्रेदमसच्या मते, 2025 मध्ये पृथ्वीच्या हवामानात अनेक बदल होतील. पुरामुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती गंभीर होईल, तर नास्त्रेदमसने असेही म्हटले आहे की ,अनेक ज्वालामुखी सक्रिय होतील. जर हे भाकित खरे ठरले तर देशात आणि जगात खरोखरच अनेक प्रकारचे बदल दिसून येतील.
युद्धाबद्दल नास्त्रेदमसची भाकिते
आपल्या सर्वांना माहित आहे की, रशिया आणि युक्रेनमध्ये बऱ्याच काळापासून युद्ध सुरू आहे. पण नास्त्रेदमसच्या भाकितानुसार, हा संघर्ष 2025 मध्ये संपेल. याचे कारण परस्पर संमती नसून दुसरे काहीतरी असेल. नास्त्रेदमसच्या मते, आर्थिक अडचणी आणि सतत कमी होत असलेल्या संसाधनांमुळे रशिया आणि युक्रेन युद्धाच्या मार्गावर जातील.
या दोन्ही देशांनी सावधगिरी बाळगावी
2025 मध्ये इंग्लंडबद्दल नास्त्रेदमसने एक भयानक भाकीत केले आहे. नास्त्रेदमसच्या मते, 2025 मध्ये इंग्लंडला युद्धभूमीवर उतरावे लागू शकते. याशिवाय, कोणताही प्राणघातक साथीचा रोग इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेलाही उद्ध्वस्त करू शकतो. इंग्लंडच्या राजघराण्यात कलह निर्माण होण्याची शक्यताही नास्त्रेदमसने वर्तवली आहे. रशियाबद्दल, नास्त्रेदमस म्हणाले आहेत की, रशिया एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकतो. पण सध्याच्या परिस्थितीत हे शक्य वाटत नाही.
SOURCE : ZEE NEWS