Source :- ZEE NEWS
Asaduddin Owaisi On Pahalgam Attack: एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजी नगरमधील पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टोंवर निशाणा साधला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ओवैसींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी ओवैसींनी केली आहे.
सरकारने कठोर कारवाई करायला हवी
“सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी सांगितलेले आहे. सरकारने कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी ओवैसींनी केली आहे. तसेच पाकिस्तान मलेरियाचं औषध तयार करता येत नाही ते काय बोळणार? असा टोलाही ओवैसींनी लगावला आहे. तसेच सिंधू नदीमधून पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त वाहील अशी वल्गना करणारे पाकिस्तानमधील नेते बिलावल भुट्टोंनाही ओवैसींनी सुनावलं आहे.
बिलावल भुट्टोंना सुनावलं
“बिलावल भुट्टो आताच राजकारणामध्ये आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट त्यांना समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पापानां मारणारे चांगले आहेत का?” असा सवाल ओवैसींनी बिलावल यांना विचारला आहे.
धर्म विचारून मारण्यावरुन सुनावलं
पहलगाममधील हल्ल्यातील मृतांना धर्म विचारून मारले या मुद्द्यावर बोलताना ओवैसींनी, “आयएसआय, इसीस असो की पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटना त्यांना असे वाटते की, भारतात हिंदू – मुस्लिम वाद व्हावेत. त्यांना हे दाखवायचे होते की काश्मिरमध्ये नॉन मुस्लिम येऊ शकत नाहीत. जे लोक जात धर्म विचारून मारहाण करतात त्याची आम्ही निंदा करतो,” असं स्पष्ट केलं. “त्या काश्मिरी आदिलने हिंदू- मुस्लिम पहिलं नाही. जर कोणी हिंदू-मुस्लिम करीत असेल तर ते चुकीच आहे. त्याची निंदा करतो,” असं ओवैसी म्हणाले.
संभाव्य भारत – पाकिस्तान युद्धाबद्दल
संभाव्य भारत – पाकिस्तान युद्धाबद्दल बोलताना, “युद्ध हे सरकारवर सोडा. सरकार काय करणार हे सरकार ठरवणार आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सांगितले आहे. तुम्हाला काय करायचं करा, पण हा दहशतवाद कायमच संपवा. सरकारला त्यांचे काम करू द्या,” अशी भूमिका ओवैसी यांनी मांडली.
पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका
पाकिस्तानला ‘एफएटीए’च्या ग्रे लिस्टमध्ये टाकणं आवश्यक आहे. मी भारत सरकारला विनंती त्यांनी पाकिस्तानला ग्रे लिस्टेड करावे. सेल्फ डिफेन्समध्ये हल्ला करण्याचा अधिकार भारताला आहे. बेकायदेशीर मार्गाने उभारलेल्या पैशातून अतिरेक्यांना मदत मिळत आहे. सरकारने यावर ॲक्शन घ्यायला हवी,” अशी मागणी ओवैसींनी केली.
SOURCE : ZEE NEWS