Source :- ZEE NEWS

Famous Sweets Name Changed : भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या तनावात अशा काही घटना समोर आल्या आहेत ज्यांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु झालेल्या या तनावामुळे राजस्थानच्या जयपुर शहरात अनेक मिठाईंचे नाव बदलले. इथे काही मिठाईंमध्ये असलेल्या ऐतिहासिक मैसूर पाकचं नाव देखील बदलून मैसूर श्री करण्यात आलं आहे. दुकानातील लोकांविषयी बोलायचं झालं तर त्यांनी सगळ्या मिठाईंच्या नावातून ‘पाक’ हा शब्द काढून टाकला आहे. पाकच्या जागी त्यांनी मिठाईच्या नावात आता ‘श्री’ जोडलं आहे. 

‘मैसूर पाक’ आता ‘मैसूर श्री’ 

दुकानदारानं ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ‘आम्ही आमच्या सगळ्या मिठाईंच्या नावातून पाक हा शब्द काढून टाकला आहे. आता ‘मोती पाक’ आता ‘मोतीश्री’ ‘गोंद पाक’ आता ‘गोंद श्री’ आणि ‘मैसूर पाक’ आता ‘मैसूर श्री’ होणार. मिठाईंमध्ये ‘पाक’ या शब्दाचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. पण कन्नड भाषेक पाकचा अर्थ गोड आहे. ‘मैसूर पाक’ कर्नाटकची लोकप्रिय मिठाई आहे ज्याचं नाव मैसूरच्या नावावर आहे. या मिठाईला साखरेच्या पाकात बनवतात.’

भारत पाकिस्तान तणाव

22 एप्रिलला जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तनाव वाढला. हे पाहता त्यांनी जयपुरमध्ये मिठाईंचं नाव बदलून टाकलं आहे. भारताकडून 7 मे रोजी पाकिस्तानवर कारवाई करत ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं. या कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवादी ठिकाणांना निशाणा बनवलं होतं. भारतानं केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून कारवाई करण्यात आली आणि त्यांनी मिसाइल आणि ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतानं पाकिस्तानला यात यशस्वी होऊ दिलं नाही. 10 मे रोजी झालेल्या सीजफायरनंतर आता या सगळ्यात शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : मुंबईच्या AC लोकल ट्रेनमध्ये सेलिब्रिटीने घेतला प्रवाशांचा योगा क्लास! ‘हा’ भन्नाट व्हिडीओ पाहाच

19व्या शतकापासून मैसूर पाक हा पदार्थ प्रचलित झाला. इतिहासकारकांचं म्हणणं आहे की मिठाईला मैसूर पॅलेसच्या शाही स्वयंपाक घरात पहिल्यांदा बनवण्यात आलं. ही मिठाई महाराजा कृष्णराजा वाडियार IV यांच्या शासन काळात बनवण्यात आली होती. या मिठाईला स्वयंपाकी काकसुरा मदाप्पानं तयार केलं होतं. त्यांनी या मिठाईला बेसन, साजूक तूप आणि साखर हे मिक्स करून बनवण्यात आलं. एक वेगळा गोड पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा ही मिठाई बनवण्यात आली आणि सगळ्यांच्या ही पसंतीस उतरली. तर त्यावेळी तिथले महाराज असलेल्या कृष्णराजा वाडियार IV यांनी ही डिश सगळ्यात आधी चाखण्यासाठी दिली होती. त्यांनी ही मिठाई इतकी आवडली की त्यांनी याचं नाव मैसूर शहरावरून ठेवलं.

SOURCE : ZEE NEWS