Source :- ZEE NEWS

Abdul Rauf Azhar: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरला आपल्या कर्माची फळ भोगावी लागली. भारताच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांच्या कबरी खोदण्यात आल्या. या हल्ल्यात आता मसूद अझहरचा भाऊन अब्दुल रौफचा खात्मा झाल्याची अपडेट समोर आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. 6-7 मे च्या मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POJK) मधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे सांगितलं जातंय. ताज्या अपडेटनुसार मसूद अझहरचा भाऊ रौफ अझहर या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालाय. अब्दुल रौफ हा आयसी-814 कंदहार अपहरणाचा मास्टरमाइंड होता. रौफ अझहरचे कारनामे फक्त एवढ्यापुरते मर्यादित नव्हते तर त्याने आणखी अनेक घृणास्पद कृत्ये केली. तो केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोस्ट वॉन्टेड होता. अनेक देशांच्या नजरा यावर खिळल्या होत्या. 

रौफ अझहर कोण आहे?

रौफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. तो भारतीय सुरक्षा एजन्सींना सर्वात जास्त हवा असलेला दहशतवादी आहे. 1999 मध्ये कंधार येथे झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमान आयसी-814 च्या अपहरणात तो मुख्य सूत्रधार होता. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणारे आयसी-814 हे पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि पाकिस्तान, अमृतसर, दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंधार येथील तालिबान-नियंत्रित प्रदेशात नेले. जैश-ए-मोहम्मदचे नेते मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांची सुटका करणे हा या अपहरणाचा उद्देश होता. या ऑपरेशनची योजना रौफ अझहरने आखली होती आणि तो या कटात सक्रियपणे सहभागी होता. सध्या भारताने मोस्ट वॉन्टेडला ठार मारल्याची अपडेट समोर येतेय. 

जैश-ए-मोहम्मदमध्ये रौफ अझहरची भूमिका

रौफ अझहरचा जन्म 1975 मध्ये झाला. केवळ 24 व्या वर्षी तो आयसी-814 अपहरण कटाचा सूत्रधार बनला. जैश-ए-मोहम्मदमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. जेव्हा मसूद अझहर त्याच्या तब्येतीमुळे बेपत्ता होता. तेव्हा तो जैश-ए-मोहम्मदचे सर्व मोठे निर्णय घेत असे. असे असले तरी त्याने अनेक मोठ्या दहशतवादी कारवाया केल्या आणि लवकरच तो मोस्ट वॉन्टेड बनला.

दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग

2001 मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवर आत्मघातकी हल्ल्यांच्या कटात रौफ असगरचा सहभाग होता. 2016 मध्ये पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यातही त्यांचा सहभाग होता. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याच्या कटात त्याने सक्रिय भूमिका बजावली होती. 1975 च्या अपहरणाच्या नियोजनात अंमलबजावणीत आणि तालिबानशी समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, 2014 ते 2019 पर्यंत झालेल्या इतर अनेक हल्ल्यांमध्ये रौफ अझहरचे नाव सामील होते.

आंतरराष्ट्रीय नजरा रौफवर 

इंटरपोलने रौफ असगरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि त्यानंतरही तो पाकिस्तानमध्ये सक्रिय होता. त्याच्या कारवाया भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थांसाठी चिंतेचा विषय आहेत.

SOURCE : ZEE NEWS