Source :- BBC INDIA NEWS

जंतर मंतरवरील आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके आणि इतर

फोटो स्रोत, ANI

तुझा आवडता प्राणी कोणता? या प्रश्नाला तुम्ही कधी झुरळ हे उत्तर ऐकलं नसेल. पण दिल्लीत 6 जूनच्या दिवशी झुरळाचे मास्क, टी शर्ट्स, स्टिकर्स वगैरे परिधान करून अनेक लोक जंतर मंतरवर मोठ्या हौसेने जमले होते.

या गर्दीत सगळ्या प्रकारचे लोक होते. कुणी परीक्षांमधल्या घोटाळ्यामुळे त्रस्त आणि संतप्त होऊन आले होते, कुणी सोशल मीडियावरच्या या ट्रेंडचा प्रत्यक्षातला जोर पाहण्यासाठी, काही लोक तर दिल्ली फिरताना गर्दी दिसली म्हणून सहज आलेले आणि काही इथे चांगला ‘कंटेंट’ मिळेल या हेतूने.

सरन्यायाधीशांच्या एका वाक्याला प्रत्युत्तर म्हणून एका उपरोधातून ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा जन्म झाला.

सोशल मीडियावर भल्याभल्यांच्या लोकप्रियेतेचे विक्रम मोडीत काढणारी ही ‘चळवळ’ प्रत्यक्षात किती पाण्यात आहे हे सिद्ध करण्याचा दिवस म्हणजे 6 जूनचं जंतर मंतरवरचं आंदोलन.

सोशल मीडियावरून थेट मैदानात येतानाची आव्हानं

एक कळीचा मुद्दा, अमेरिकेत शिकणारा एक कल्पक युवक, सामाजिक – राजकीय जीवनात संघटितपणे काही करण्याचा थोडा अनुभव किंवा समज असणारे काही कार्यकर्ते/प्रवक्ते आणि सोशल मीडियावरचा भरघोस परंतु अदृश्य पाठिंबा असं भांडवल घेऊन CJP ने मैदानात पाऊल टाकलं होतं.

CJP च्या या आंदोलनाला पहिलटकरणीच्या कळा सोसाव्या लागल्या नसत्या तरच नवल.

10 वाजेपासून जंतर मंतरवर निदर्शनांसाठी परवानगी मिळाली होती. मी सकाळी 11 च्या सुमारास तिथे पोहोचलो तेव्हा गर्दी यथातथाच होती. नेमकं काय आणि कसं घडणार आहे याची कल्पना ना जमलेल्यांना होती आणि ना त्यांना जमवणाऱ्यांना.

आंदोलनात सहभागी विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि इतर तरुण-तरुणी

फोटो स्रोत, ANI

ज्या मंचावरून जमलेल्या समर्थकांना अभिजीत दिपके आणि इतर लोकांनी संबोधित करणं अपेक्षित होतं तो मंचच अजून उभारला गेला नव्हता.

त्यामुळं त्या आंदोलन स्थळावर कधी इकडे, कधी तिकडे असं करत लहान-सहान भाषणं, महापुरुषांच्या नावांच्या आणि राष्ट्रभक्तीपर घोषणा असं सुरू होतं.

जूनच्या महिन्यात दिल्लीत उकाडा ‘मी’ म्हणत असतो. डोक्यावर चढलेल्या सूर्याचा पारा 40-42 डिग्री पार करत होता.

अखेर तो मंच उभा राहिला, मंचावर आणि मंचासमोरच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बराच वेळ आणि शक्ती जात होती.

ज्या माणसाच्या हाकेवर सोशल मीडियावर इतके लोक जमले त्याच्या हाका प्रत्यक्षात ऐकण्यासाठीची साऊंड सिस्टीम अपुरी असल्याने अभिजीत दिपके मंचावर असतानाही अनेक लोक इतरत्र घोळके करून बसले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, ANI

घोषणाबाजी, सद्य स्थितीवर रचलेली गाणी, चर्चा अशा गोष्टी समांतर पद्धतीने अनेक ठिकाणी सुरू होत्या.

या ‘व्यवस्थाविरोधी झुरळांना’ विरोध करण्यासाठीही काही लोक तिथे पोहोचले होतेच. काहींना पोलिसांनी हुसकावून लावलं तर काहींबरोबर तिथे जमलेल्या ‘झुरळांनी’ कॅमेऱ्यांच्या साक्षीने दोन हात केले.

शास्त्रज्ञ, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक काही तासांनंतर तिथे आले, एव्हाना गर्दीही वाढली होती. सोनम यांच्या भाषणासाठी मंचाकडे ओघ वाढला.

राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षांमधला गोंधळ आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी या प्रमुख मुद्द्यांना अधोरेखित करण्याचं काम सोनम वांगचुक यांनी केलं.

प्रस्थापित माध्यमं आणि कंटेंट क्रिएटर्स

‘जंतर मंतर’ या दिल्लीतल्या ऐतिहासिक वेधशाळेसमोरचा रस्ता हे राजधानीतलं आंदोलनांसाठी राखून ठेवलेलं ठिकाण. इथे पोहोचणं तसं अगदीच सोपं आहे.

पण यावेळी इथे रंग वेगळाच होता. माध्यमांची आणि माध्यमकर्मींची उपस्थिती लक्षणीय होती पण ‘राष्ट्रीय’ किंवा ‘मुख्य प्रवाहा’तल्या माध्यमांवर या आंदोलनाच्या वार्तांकनांचं प्रमाण त्या तुलनेत अगदीच व्यस्त होतं.

खासकरून वृत्तवाहिन्यांवर या आंदोलनाचं लाईव्ह प्रक्षेपण न होता कुठे प्रायोजित कार्यक्रम, कुठे ‘वीकेंड स्पेशल’ कार्यक्रम अशा गोष्टी बरेच तास सुरू होत्या.

अध्येमध्ये लहानशी बातमी दिसत होती. पण इतर आंदोलनांप्रमाणे ‘लाईव्ह’ कव्हरेज नव्हतं. खुद्द ‘जंतर मंतर’वर तर माध्यमांबाबतची मतं खुलेपणाने बोलून दाखवली जात होती.

Instagram पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Instagramवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

अनेक प्रस्थापित माध्यमसंस्थांच्या वार्ताहारांना त्यांचं वार्तांकन सुरू असताना किंवा ते तिथे उभे असताना जमलेले अनेक लोक ‘हे गोदी मीडिया आहेत’, ‘यांच्याशी बोलून काय उपयोग? हे तर सरकारची बाजू घ्यायलाच आले आहेत’ असं उघडपणे ऐकवत होते.

काही ज्येष्ठ पत्रकारांनी / संपादकांनी त्यांच्या वाहिन्यांवरून किंवा वैयक्तिकरीत्या समाजमाध्यमांवरून या ‘चळवळीची’ केलेली टिंगल इथे जमलेल्या अनेकांना रुचली नव्हती. त्याचा राग त्या संस्थेसाठी काम करणाऱ्या पत्रकारांवर निघत होता.

इथे नजरेत भरणारी एक गोष्ट म्हणजे समांतर माध्यमांचे प्रतिनिधी, मुक्त पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्सची संख्या. तुम्ही कुठेही नजर फिरवलीत तरी सेल्फी स्टिक किंवा ट्रायपॉडवर लावलेले मोबाईल फोन कॅमेरे आणि माईक दिसत होते.

CJP चे प्रवक्ते आणि कार्यकर्तेही माध्यमं आणि कंटेंट क्रिएटर्स असा भेद न पाळता जवळपास सर्वांशीच बोलत होते.

NEET/CBSE च्या घोळांपासून ते, जनआंदोलनांना आजही स्थान आहे का इथपर्यंत आणि पूर्वी झालेल्या घोटाळ्यांच्या हिशोबापासून ते आणि झुरळाला हात-पाय किती इथपर्यंतचे हरप्रकारचे प्रश्न इथे ऐकायला मिळत होते.

काही क्रिएटर्स दोन विरुद्ध बाजूच्या लोकांना समोरासमोर उभं करून त्यांचे तारसप्तकातले वादविवाद रेकॉर्ड करत होते. (हे कौशल्य ‘मुख्य प्रवाहातल्या’ माध्यमांकडूनच आत्मसात केलेलं आहे हा भाग निराळा).

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

SOURCE : BBC