Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मुंबई आणि महाराष्ट्रात आंदोलन होणारच, इथे हुकुमशाही खपवून घेणार नाही’ – आदित्य...

‘मुंबई आणि महाराष्ट्रात आंदोलन होणारच, इथे हुकुमशाही खपवून घेणार नाही’ – आदित्य ठाकरे

3
0

Source :- BBC INDIA NEWS

आदित्य ठाकरे पोलिसांच्या वाहनावर चढून विरोध दर्शवताना

Published

वाचन वेळ: 15 मिनिटे

आज (11 ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी परिसरात एकत्रित व्हायला सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली आहे. अशातच युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेदेखील कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.

आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत सरकार तसेच पोलीस प्रशासनाला प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला.

“सीजेपीची मुलं, तरूण मुलं, सेनेचे, मनसेचे कार्यकर्ते पार्क पोलीस स्टेशनला नेलं. ही दडपशाही कोणाविरुद्ध करत आहात. काल तुषार गांधी यांना सोडत नव्हते. आजही आम्ही वेळेत आलो नसतो तर ह्यांनाही पकडून नेलं असतं. ही अघोषित आणीबाणी आहे. आज तुम्हाला मला कोणालाही अटक होऊ शकते, ही दादागिरी चालणार नाही, आम्ही हे हाल मुंबईचे होऊ देणार नाही”, असे ठाकरे म्हणाले.

यासह मुंबईत उद्याचं आंदोलन कसं राहील हे थोड्यावेळात जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं आहे. उद्या आंदोलन असेल. हे देशप्रेमींचं आंदोलन आहे. ज्ञानेश कुमार विरोधात आंदोलन आहे यात भाजपला लागण्यासारखं काही नाही. तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर ज्वलंत आंदोलन करणार, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

शिवसेना भवन

आदित्य ठाकरेंचं ठिय्या आंदोलन

दरम्यान, सीजेपी आंदोलकांसह, शिवसैनिकही रस्त्यावर उतरल्याने दादरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना भवनासमोर छावणीचे स्वरुप आलं आहे. पोलिसांनी सेनाभवनाच्या अंगणातून कार्यकर्त्यांना उचलून ताब्यात घेतलं आहे.

आदित्य ठाकरेदेखील आक्रमक झाले असून शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ज्या वाहनात कोंबले ती गाडी आदित्य ठाकरेंनी अडवून ठेवली. आदित्य ठाकरेंनी या वाहनावर चढून आपला विरोध दर्शवला.

आदित्य ठाकरे

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीनं 10 ऑक्टोबररोजी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही काल शनिवारी आंदोलन पार पडलं, यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.

कालप्रमाणे आजही मुंबईत शिवाजी पार्क परिसरात आंदोलकांनी जमण्यास सुरुवात केली असता पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. या घडामोडींना वेग आला असतानाच आदिवत्य ठाकरेदेखील रस्त्यावर उतरले आहेत. दादरमधील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून काहींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या दाव्यावर अभिजीत दिपकेंनी काय प्रतिक्रिया दिली?

दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्यांवर अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये दिपके म्हणतात, “मी माझ्या आजीसोबत राहणाऱ्या चुलत भावाशी बोलू देण्याची विनंती केली होती. किमान त्याचा फोन नंबर तरी मिळवता यावा, यासाठी मी फक्त दोन मिनिटांसाठी माझा फोन मागितला होता.

दिल्ली पोलिसांनी मला माझा फोन वापरू का दिला नाही? मी वकिलाशी बोलण्याचीही विनंती केली होती, पण तीही नाकारण्यात आली.”

अभिजीत दिपके (फाइल फोटो)

दिपके पुढे लिहितात, “पहाटे साडेतीन वाजता दिल्ली पोलिसांनी मला वडिलांना फोन करून सांगायला सांगितले की, दुसऱ्या दिवशी मला बराच काळ तुरुंगात राहावे लागणार आहे. माझे वडील नुकतेच त्यांची आई, म्हणजेच माझी आजी, गमावून बसले होते. आजीच्या निधनामुळे आम्ही आधीच दुःखात असताना, माझ्या कुटुंबाला आणखी किती मानसिक त्रास द्यायचा होता?

पहाटे साडेतीन वाजता माझ्या आई-वडिलांना फोन करण्यास सांगण्यामागे नेमका काय उद्देश होता? त्यांना मानसिक त्रास देऊन छळायचा होता का?”, असा सवालही दिपकेंनी उपस्थित केला.

दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद: अभिजीत दिपकेंबाबत काय स्पष्टीकरण दिले?

10 ऑक्टोबर रोजी अभिजीत दिपके यांना विमानाने नेऊन ताब्यात घेतल्याच्या प्रकरणावरून टीकेचा सामना करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

दिल्ली पोलिसांच्या शाहदरा विभागाच्या डीसीपी नेहा यादव यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही तासांपूर्वी सीजेपीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

दिपके आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेण्याबाबत बोलताना डीसीपी म्हणाल्या की, त्यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.

डीसीपींनी एक रेकॉर्ड केलेला व्हीडिओ दाखवून दावा केला की, दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना याबाबत सूचना दिली. तसेच त्यांना विमानाने त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याची ऑफरही देण्यात आली होती.

मात्र, दिपके यांनी गावी जाण्यास नकार दिल्याचा दावा डीसीपी नेहा यादव यांनी केला. पोलिसांनी त्यांना निर्णयाचा पुन्हा विचार करण्यासाठी वेळही दिला होता. तरीही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही, असंही त्या म्हणाल्या.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि दिल्ली पोलीस डीसीपी नेहा यादव

दिल्ली पोलिसांनी दिपके यांना त्यांच्या आई-वडिलांशी बोलण्याची संधी देऊ केली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, असाही दावा करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी म्हटले की, सीजेपीने पोलिसांची चुकीची प्रतिमा निर्माण केली आहे. तसेच, दिपके यांनी मागील आंदोलनातही कायद्याचे पालन केले नव्हते, असा आरोप पोलिसांनी केला. यावेळीही सीजेपीने कायद्याचे पालन केले नाही. दिपके यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली नव्हती आणि दिल्लीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लागू करण्यात आले होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

दिल्ली पोलिसांनी दाखवलेल्या व्हीडिओमध्ये काय आहे?

या व्हीडिओमध्ये अभिजीत दिपके यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे. दोन महिला पोलीस कर्मचारी त्यांना त्यांच्या आजीच्या निधनाची माहिती देताना दिसतात. त्यानंतर साध्या वेशातील एक पुरुष पोलीस कर्मचारी त्यांना विमानाने गावी जाण्याची व्यवस्था करण्याची ऑफर देतो. त्यावर ती व्यक्ती, ‘आय विल स्टे हिअर’ (मी इथेच थांबेन), असे उत्तर देताना ऐकू येते.

दरम्यान, या व्हीडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही. तसेच, या प्रकरणावर सीजेपीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान रेल्वे आणि मेट्रो सेवा रोखल्याप्रकरणी गृह मंत्रालयाला नोटीस

दिल्लीतील आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशांचे कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती कायदेशीर घडामोडींवर वृत्तांकन करणाऱ्या ‘लाइव्ह लॉ’ या संकेतस्थळाने दिली आहे.

सुनावणीत दिलेल्या आदेशांचे कथित उल्लंघन झाल्याचे आढळले असून न्यायालयाच्या अवमानाची (कंटेम्प्ट) कारवाई होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान रेल्वे आणि मेट्रो सेवा रोखल्याप्रकरणी गृह मंत्रालयाला नोटीस

9 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टी आणि अनेक विरोधी पक्षांकडून 10 ऑक्टोबररोजी आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि मेट्रो सेवा बंद करण्याऐवजी त्यांचे नियंत्रित पद्धतीने संचालन करण्याचे तोंडी निर्देश दिले होते.

‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालयाच्या निर्देशांनंतरही मेट्रो स्थानके बंद करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे याचिकाकर्त्यांनी सादर केले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले असण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालय

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अध्यक्ष डी. थारा यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 13 ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र आणि अनुपालन अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे. तूर्तास त्यांना न्यायालयात वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणाच्या पुढील सुनावणीदरम्यान दाखल करण्यात आलेली उत्तरे आणि अनुपालन अहवाल यांच्या आधारे पुढील कारवाईचा विचार केला जाईल.

‘आमचे फोन घेतले, ते हॅक केले असावेत’; सीजेपीनं सांगितलं पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर काय घडलं

सध्या भारत सरकार हे आपल्याच देशातील नागरिकांविरोधात युद्ध करत आहेत, असं कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या तीन दिवसात देशात जे काय झालं ते एखाद्या अघोषित आणीबाणी सारखं आहे असं सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी म्हटले.

सीजेपीच्या नेत्यांनी ताब्यात घेताना कोणत्याही कायद्याचे पालन करण्यात आले नाही. आम्हाला आमच्या वकिलांशी बोलू दिले नाही.

सध्या भारत सरकार हे आपल्याच देशातील नागरिकांविरोधात युद्ध करत आहे, असे सौरभ दास यांनी म्हटले.

सरकारने आमचे फोन घेतले आणि ते त्यांनी हॅक केले असावेत अशी आम्हाला भीती आहे, असे सौरभ दास यांनी म्हटले.

ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी हे सर्व काही होत आहे, ज्ञानेश कुमार यांनी SIR मधून 13 कोटी मतदारांना वगळले. तरुणांनी मतदान करू नये म्हणून त्यांनी ही नावे वगळली असे सौरभ दास यांनी म्हटले.

कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषद

सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली.

सीजेपीच्या लीगल अफेअर्स हेड रत्ना सिंह यांनी सांगितले की आम्हाला ताब्यात घेताना कोणतेही कारण देण्यात आले नाही. जेव्हा पोलिसांनी विचारले की मला ताब्यात घेण्याचे कारण काय तर त्यावर त्यांनी उत्तर दिले की आम्हाला वरतून ऑर्डर आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली आहे.

ज्या पद्धतीने सरकार आमच्याविरोधात एकत्र आलंय यावरुन हे लक्षात येतंय की आमचा मुद्दा योग्य आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नेहा बोरा पुन्हा रस्त्यावर, जाणून घ्या काय घडलं

एसआयआरच्या विरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा रविवारी (11 ऑक्टोबर) आंदोलकांसह आर. के. आश्रम मार्गावर पोहोचल्या.

घटनास्थळी उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे.

नेहा बोरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला. या व्हीडिओत त्या इतर लोकांसोबत धावताना दिसत आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नेहा बोरा पुन्हा रस्त्यावर

2 ऑक्टोबरपासून दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात नेहा बोरा एक प्रमुख चेहरा म्हणून समोर आल्या आहेत. हे आणि जवळपास प्रत्येक आंदोलनानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शनिवारी (10 ऑक्टोबर) दिल्लीतील जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था असताना नेहा बोरा अचानक दिल्ली हाट येथे पोहोचल्या आणि त्यांनी तेथे आंदोलन केले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रविवारी (11 ऑक्टोबर) त्यांनी आंदोलनाची रणनीती बदलली आणि आंदोलनाचे ठिकाण व वेळ जाहीर करणारा एक व्हीडिओ प्रसिद्ध करून समर्थकांना तिथे पोहोचण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्या स्वतः आंदोलनात सहभागी झाल्या. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

‘मोदी डरपोक’, अभिजीत दिपकेंची टीका; दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये आंदोलकांना घेतलं ताब्यात

याआधी, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांची पोलीस कोठडीतून सुटका करण्यात आली होती.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सीजेपीच्या तीन सर्वोच्च नेत्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, जिथं त्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले.

दुसऱ्या बाजूला, ध्रुव राठीनं एक व्हीडिओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये त्याने ‘मला अटक किंवा ताब्यात घेण्यात आलं नव्हतं, तर माझं अपहरण करण्यात आलं होतं,’ असा आरोप केला आहे.

अभिजीत दिपकेंनी सांगितले की ते घरी परतणार आहेत. दिपके यांच्या आजीचे निधन झाले. त्यामुळे आपण यावेळी आपल्या कुटुंबासोबत असू त्यांनी ट्विट केले.

त्यांनी लिहिले, “या दुःखाच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी मी माझ्या गावी परत जात आहे. सौरव आणि आशुतोष लवकरच दिल्लीत पत्रकार परिषद घेतील.”

ते पुढे म्हणाले, “सीजेपी माघार घेणार नाही आणि घाबरणारही नाही. 10 ऑक्टोबर हा दिवस या हुकूमशाहीच्या अंताची सुरुवात म्हणून लक्षात ठेवला जाईल.”

अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची रविवारीच दंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली. त्यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दिल्लीतील कनॉट प्लेसच्या इनर सर्कलमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं विशेष सुनावणीत काय म्हटलं?

रविवारी झालेल्या विशेष सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, कायद्यानुसार लोकांना शहरात मुक्तपणे फिरण्याची परवानगी दिली जाईल आणि कायद्यानं विहित केलेल्या प्रक्रियेशिवाय कुणालाही ताब्यात घेतलं जाणार नाही.

न्यायालयानं असं नमूद केलं की, बीएनएसएसच्या कलम 163 लागू असलेल्या क्षेत्राबाहेर लोकांना एकत्र येण्याचा अधिकार असेल. तसेच, न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात वैयक्तिकरित्या जाण्यापासून कुणालाही रोखलं जाणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं.

सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना मंगळवारपर्यंत अनुपालन अहवाल आणि ताब्यात घेतलेल्या लोकांचा तपशील सादर करण्यास सांगितलं आहे.

रविवारी झालेल्या विशेष सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, कायद्यानुसार लोकांना शहरात मुक्तपणे फिरण्याची परवानगी दिली जाईल आणि कायद्यानं विहित केलेल्या प्रक्रियेशिवाय कुणालाही ताब्यात घेतलं जाणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान हे महत्त्वाचे मुद्दे मांडले:

  • कायद्यानुसार थांबवणं अत्यंत गरजेचं असल्याशिवाय मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू राहिल्या पाहिजेत.
  • कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि कलम 19(2) च्या तरतुदी लक्षात घेऊन बॅरिकेडच्या व्यवस्थेचा आढावा घेतला पाहिजे.
  • कायद्यानुसार इंटरनेट सेवेत व्यत्यय आणला जाणार नाही.
  • कायद्याने विहित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कुणालाही ताब्यात घेतलं जाणार नाही.
  • BNSS च्या कलम 163 लागू असलेल्या क्षेत्राबाहेर लोकांना एकत्र येण्याचा अधिकार असेल.
  • न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात वैयक्तिकरित्या जाण्यापासून कोणालाही रोखलं जाणार नाही.

सुटकेनंतर अभिजीत दिपके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पोलीस कोठडीतून सुटका झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत दिपके यांनी रविवारी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांना ‘डरपोक’ म्हटलं आहे.

अभिजीत यांनी एक्सवर पोस्ट केलंय की, “पंतप्रधान म्हणून मोदी भारतासाठी लज्जास्पद ठरले आहेत. या देशाने यापेक्षा मोठा भित्रा आणि दादागिरी करणारा माणूस कधीच पाहिला नाही.”

आशुतोष रांका यांनी एक्सवर लिहिलंय की, “ज्ञानेश कुमार देशद्रोही आहे. त्याला राजीनामा द्यावाच लागेल. अशा देशद्रोह्यांना हटवण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवायलाही तयार आहे.”

दरम्यान, सीजेपीनं म्हटलं आहे की, अभिजीत दिपके वैयक्तिक कारणास्तव (आजीच्या निधनामुळे) ते आपल्या गावी परतत आहेत.

अभिजीत दिपके यांनी एक्सवर म्हटलंय की, “दुःखाच्या या काळात माझ्या कुटुंबासोबत राहण्यासाठी मी माझ्या गावी परतत आहे. सौरव आणि आशू लवकरच दिल्लीत पत्रकार परिषद घेतील.”

सीजेपीची पत्रकार परिषद

दिल्लीतील कनॉट प्लेसच्या इनर सर्कलमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

रविवारी कनॉट प्लेस इथून ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनशी संबंधित विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

सीजेपीनं रविवारी आंदोलनाची हाक दिली होती. सीजेपीचे सदस्य अजिंक्य शिंदे यांनी आंदोलनासाठी जंतर मंतरवर जाणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनीही रविवारी आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी अद्याप आंदोलनाचं ठिकाण स्पष्ट केलेलं नाही.

आंदोलकांना ताब्यात घेतल्याची छायाचित्रेही समोर आली आहेत.

आंदोलकांना ताब्यात घेतल्याची छायाचित्रेही समोर आली आहेत.

ध्रुव राठीची पोलीसांच्या ताब्यातून सुटका

प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी याला ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी सोडून दिलं आहे.

ध्रुव राठीला 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी गुरुग्राममधील केंद्रीय विहार, सेक्टर 56 मधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

ध्रुव राठीनं प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलंय की, “मला काल सकाळी सात वाजता वीसभर सिव्हील ड्रेसमधील लोकांनी ताब्यात घेतलं. मी याला अपहरण असंच म्हणेन. जवळपास 20 तास मला या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनमध्ये फिरवत राहिले. माझा मोबाईल काढून घेण्यात आला तसेच मला वकिलांशीही बोलू दिलं नाही. या झटापटीत मला अनेक ठिकाणी जखमाही झाल्या आहेत.”

ही हुकूमशाही असून मोदींनी इतिहास पहावा आणि समजून घ्यावं की प्रत्येक हुकूमशहाचा अंत कसा होतो, असं म्हणत टीकाही केली आहे.

ध्रुव राठीने आपण भारतीय नागरिक असल्याचेही स्पष्ट केले आणि आपला पासपोर्ट दाखवला.

ध्रुव राठीने आपण भारतीय नागरिक असल्याचेही स्पष्ट केले आणि आपला पासपोर्ट दाखवला.

दरम्यान, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्यात आली असून दुपारी दोन वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून त्यांच्या सुटकेविषयी माहिती देताना म्हटलंय की, “अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना 10 ऑक्टोबर रोजी BNSS च्या कलम 126/170 अन्वये प्रतिबंधात्मक अटकेखाली घेण्यात आलं. सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून त्यांना 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली कँटोनमेंट येथील SEM न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.”

“शांतता व सुवर्तन राखण्याच्या अटीवर, एका वर्षाच्या कालावधीसाठी 50 हजार रुपयांचा जामीन बंधपत्र (Surety Bond) सादर केल्यानंतर SEM न्यायालयाने त्यांची सुटका केली,” असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलंय.

जंतर-मंतर

दरम्यान, आज रविवारी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी पोलिसांनी सीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.

मात्र, सीजेपीशी संबंधित अजिंक्य शिंदे यांनी म्हटलं आहे की, ते आज म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करतील.

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी रविवारीही आंदोलनाची हाक दिली आहे.

रविवारी आंदोलन कुठे होणार आहे, हे नेहा बोरा हिनं सांगितलेलं नाहीये.

जंतर-मंतरवर सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.

अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था, मेट्रो-रेल्वे बंदी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विमानातूनच ताब्यात घेतल्यानंतर काल, 10 ऑक्टोबर रोजी पोलीस आणि आंदोलकांमधील धरपकडीचा खेळ दिवसभर सुरू राहिला.

आज, रविवारीही हे आंदोलन सुरूच राहिल, अशी घोषणा सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांनी केली आहे.

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीकडून अजिंक्य शिंदे यांच्याकडे या आंदोलनाची धुरा सोपवण्यात आली आहे.

सीजेपीव्यतिरिक्त AISA या विद्यार्थी संघटनेची प्रमुख नेहा बोरा, स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव तसेच प्रशांत भूषण आणि दीपंकर भट्टाचार्य यांच्यासहित अनेकांना काल पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशीरा सोडलं.

फक्त दिल्लीतच नव्हे तर पुणे, मुंबईसहित अनेक प्रमुख शहरांमध्ये हाच सिलसिला पहायला मिळाला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे, हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

काल दिवसभराच्या धुमश्चक्रीनंतर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काय काय घडतंय, याकडे आपलं लक्ष राहिल.

‘अटक केलेल्या नेत्यांना पोलीस ठाण्यात एक्झिक्यूटीव्ह मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं जाईल’ – CJP

कॉक्रोच जनता पार्टीनं दावा केला आहे की, पोलिसांनी अटक केलेल्या नेत्यांना रविवारी सकाळी 9 वाजता दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात एक्झिक्यूटीव्ह मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं जाईल.

सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलंय की, “अभिजीत, आशुतोष आणि सौरव यांना आज सकाळी 9 वाजता दिल्ली कॅन्ट पोलीस स्टेशनमधील एक्झिक्यूटीव्ह मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं जाईल.”

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही त्या तिघांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या की, “दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं मला सकाळी याबद्दल माहिती दिली. सीजेपीची कायदेशीर प्रमुख या नात्याने, मी आमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर वकिलांसोबत पोलीस ठाण्यात उपस्थित राहीन.”

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही त्या तिघांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर निशाणा साधला आहे.

“मोदी शाह इतके घाबरले आहेत की ते आज मुलांचे अपहरण करत आहेत. तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असं त्यांनी शनिवारी ‘एक्स’वर लिहिलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाने व्यक्त केली चिंता

कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुटका अद्याप झालेली नसून याची दखल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागानंही घेतली आहे.

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

सीजेपी आंदोलन

दरम्यान, भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या या चिंता निराधार आहेत, असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

“भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. इथं शांततापूर्ण एकत्र येण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. तसंच मजबूत संस्था, स्वतंत्र न्यायपालिका आणि मुक्त प्रसारमाध्यमांद्वारे ती संरक्षित आहे,” असं जिनिव्हातील भारतीय मिशननं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

“त्यामुळं, मानवाधिकार आयोगाची चिंता निराधार असून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हा अनावश्यक हस्तक्षेप आहे. या संदर्भात, मानवाधिकार आयोगानं निःपक्षपातीपणे आणि भेदभाव न बाळगता काम करण्याच्या अधिकारानुसार इतर ठिकाणी होणाऱ्या आंदोलनांकडंही तितकंच लक्ष दिलं पाहिजे,” असंही निवेदनात म्हटलं आहे.

सीजेपी आंदोलन

देशभरात जणू अघोषित आणीबाणी-वांगचूक

दुसऱ्या बाजूला, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला. त्यात त्यांनी सरकारने ताब्यात घेतलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.

या व्हीडिओमध्ये ते म्हणाले, “काही वेळापूर्वी परत आल्यानंतर मला समजलं की, आज दिल्लीत अनेकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी नेते, युवा नेते, वकील, पत्रकार आणि अगदी खासदारांचाही समावेश आहे.”

“कालपर्यंत त्यांना वाटत होते की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत शांततेत आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, आता देशभरात जणू अघोषित आणीबाणी लागू झाली आहे, असं चित्र आहे.”

काल रात्री उशीरा सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांनी दिल्ली कमिश्नर यांच्या नावे पत्र लिहून सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांच्या ठावठिकाण्याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

याशिवाय, काल रात्री उशीरा सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांनी दिल्ली कमिश्नर यांच्या नावे पत्र लिहून सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांच्या ठावठिकाण्याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटलंय की, “या तिघांच्याही सद्यस्थितीबद्दल तातडीनं माहिती मिळवण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. थेट विमानातच ताब्यात घेतल्यानंतर आता 12 तास उलटून गेले आहेत, तरीही त्यांच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.”

आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो आणि खालील गोष्टींची मागणी करतो:

  • त्यांच्या बेकायदेशीर अटकेतून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी.
  • त्यांच्या ठिकाणाबद्दल त्वरित माहिती देण्यात यावी.
  • त्यांना त्यांच्या वकिलांशी त्वरित संपर्क साधण्याची मुभा देण्यात यावी.

‘तोपर्यंत आम्ही घरी परतणार नाही’ – अजिंक्य शिंदे

कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अजिंक्य शिंदे यांनी ‘एक्स’वर एक व्हीडिओ पोस्ट करून आज रविवारी (11 ऑक्टोबर) होणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती दिली.

या व्हीडिओत ते म्हणाले की, “आज आम्ही जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांनी मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेल्या 12 कोटी मतदारांच्या हक्कांची मागणी करण्यासाठी गेलो होतो. तरीही मोदींच्या हुकूमशाही सरकारने अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह सर्व विद्यार्थी नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतले.”

सीजेपी आंदोलन

ते पुढे म्हणाले, “त्यांना असे वाटले असेल की, आज ताब्यात घेतल्यानंतर सर्वजण घाबरून घरी निघून गेले. मात्र, मोदी-शाह यांना वाटणारी ही भीती दाखवते की, आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे आणि ही एका नव्या लढाईची सुरुवात आहे.”

“मागच्या वेळी ज्याप्रमाणे त्यांनी सरकारचा अहंकार चिरडून टाकला होता, त्याचप्रमाणे यावेळीही सरकारचा अहंकार चिरडून टाकतील.”

“जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परतणार नाही,” असे ते म्हणाले.

रविवारी सकाळी 10 वाजता पुन्हा जंतर-मंतरच्या दिशेने कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मोठ्या संख्येने जंतर-मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

ममता बॅनर्जी-अरविंद केजरीवालही होते ताब्यात

काल विरोधी पक्षांमधील प्रमुख नेते ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनीही जंतर-मंतरकडे कूच करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

याशिवाय, केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनाही ताब्यात घेण्यात आलं.

एकूण चार माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेऊन सोडल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सध्या आम्ही काहीही बोलणार नाही, कारण उद्या इंडिया आघाडीने एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मी नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. या बाबतीत मी खूप शिस्तप्रिय आहे.”

सीजेपी आंदोलन

त्या पुढे म्हणाल्या, “राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. चौकशी करायची असेल, तर पुरावे आवश्यक आहेत. आम्ही त्यांना सांगितले की, ‘ठीक आहे, आम्ही पुरावे देऊ.'”

शनिवारी पोलिसांनी ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पक्षातील पाच नेत्यांना साऊथ अव्हेन्यू येथील बसस्थानकावरून ताब्यात घेतलं होतं.

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांना जंतर-मंतर येथे जायचे होते; मात्र पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. त्यानंतर त्या आपल्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

अधिक शोधा

शॉर्ट व्हीडिओ वगळा आणि पुढे सुरू ठेवा

शॉर्ट व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

  • अभिनेता इमरान खानला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा..

  • दिल्लीत आंदोलनासाठी आलेले लोक गुरुद्वारात थांबले, परिस्थितीवर काय बोलले?

  • नेहा बोरा

  • कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन

  • अभिजीत दिपकेला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं तो क्षण

  • दिल्लीत अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, गावी आजीचं निधन

  • ध्रुव राठी

  • पोलिसांनी इटारसी रेल्वे स्थानकात ताब्यात घेतलेल्या पुण्यातील तरुणांना सोडलं

  • नीतीन नबिन यांची राहुल गांधी आणि दिपकेंवर टीका, 'देशाची प्रगती पाहवत नाही'

  • दिपके यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • kk create

  • 80 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन सैन्यात गोळ्या घालून मृत्युदंड दिला जाणार

  • जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं - 'मला नोबेल मिळालाय!'

  • नाना पाटेकर

  • गोवा डॉक्टर

SOURCE : BBC