Home LATEST NEWS ताजी बातमी रक्तातील साखर थोडी वाढली तरी घाबरत असाल तर, तज्ज्ञ याबाबत काय सांगतात...

रक्तातील साखर थोडी वाढली तरी घाबरत असाल तर, तज्ज्ञ याबाबत काय सांगतात ते जाणून घ्या

4
0

Source :- BBC INDIA NEWS

रक्तातील साखरेची पातळी वाढणं म्हणजे आजाराचा धोका? समजून घ्या ब्लड शुगर स्पाइकचं गणित

आजकाल रक्तातील साखर वाढल्यानंतर चिंता व्यक्त करणं हा ‘ट्रेंड’ बनला आहे. मात्र, अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढणं ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. त्यामुळे काळजी कधी करायची आणि कधी नाही, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

गेल्या काही वर्षांत दोन आश्चर्यकारक गोष्टी घडताना दिसत आहेत.

पहिली म्हणजे, संपूर्णतः निरोगी असणारे लोकही रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ‘ग्लुकोमीटर’ चा वापर करत आहेत. तर, दुसरीकडे अनेक लोक ब्रेड, पास्ता यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करत आहेत.

लेखक, पॉडकास्टर आणि सोशल मिडीयावरील ‘वेलनेस इन्फ्लुएन्सर’ नेहमीच ‘रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू देऊ नये आणि त्यावर नियंत्रण ठेवावं’ हा सल्ला देत असतात.

याच दृष्टिकोणामुळे, रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू देणं म्हणजे स्वतःहून आरोग्याचा धोका वाढवणं आहे असं मानलं जातं.

पचनाशी संबंधित (मेटाबॉलिझम) कोणतेही आजार नसलेल्या निरोगी व्यक्तींमध्येही रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका निर्माण होणं म्हणजे हार्मोनल असंतुलन, चेहऱ्यावर पुळ्या येणं, मनःस्थितीतील (मूड स्विंग) चढउतार आणि त्याहूनही वाईट गोष्टींना आमंत्रण देण्यासारखं आहे असं अनेकांचं म्हणणं असतं. पण आता तज्ज्ञ या गोष्टीला विरोध करत आहेत.

मग नक्की कोणत्या वेळी काळजी करावी आणि आपण मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्सयुक्त अन्न खाल्लं तरीही कोणत्यावेळी नुकसान होण्याची शक्यता नसते, ते पाहूया.

रक्तातली साखर का वाढते?

जेव्हा आपण साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ, जसं की रिफाइंड साखर, फळं आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त (कार्ब्स) अन्न खातो आणि त्यांचं पचन होतं, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या वर जाते.

याचं कारण म्हणजे, जेव्हा आपलं शरीर कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचं पचन करतं, तेव्हा त्यांचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि हे ग्लुकोज पुढे रक्तामध्ये शोषलं जातं, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रक्तातील साखरेची पातळी वाढते.

हे इन्सुलिन रक्तातील ग्लुकोज बाहेर काढून शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करतं, मग शरीराला ऊर्जा मिळते.

मात्र, रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढण्यासाठी फक्त अन्नच कारणीभूत असतं असं नाही.

रक्तातील साखरेत अचानक होणारी वाढ टाळण्यासाठी त्यांनी, त्यांच्या आहाराचं, व्यायामाचं योग्य नियोजन करणं आणि साखरेच्या पातळीवर नियमित लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असतं.

तीव्र स्वरूपाच्या व्यायामादरम्यान (हाय-इंटेन्सिटी एक्सरसाईज), ॲड्रिनॅलिनसारखी संप्रेरकं (हॉर्मोन्स) यकृताला (लिव्हर) रक्ताभिसरणात अधिक ग्लुकोज सोडण्याचा संदेश देतात, यामुळे काम करणाऱ्या स्नायूंना अतिरिक्त ऊर्जा मिळते.

यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी तात्पुरत्या स्वरूपात वाढू शकते, असं अमेरिकेतील कनेक्टिकट येथील ‘येल स्कूल ऑफ मेडिसिन’च्या बालरोग संप्रेरक तज्ज्ञ (पेडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट) जेनिफर शेर सांगतात.

मात्र, मधुमेहाच्या रूग्णांमध्ये शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही, किंवा ते आधीसारखं प्रभावीपणे काम देखील करत नाही. याचाच अर्थ असा की, अन्न खाल्ल्यानंतर मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी धोकादायकपणे वाढू शकते.

अशावेळी, रक्तातील साखरेत अचानक होणारी वाढ टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या आहाराचं, व्यायामाचं योग्य नियोजन करणं आणि साखरेच्या पातळीवर नियमित लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असतं.

तसंच, काही लोकांना इन्सुलिन किंवा मेटफॉर्मिनसारखी औषधं घेणंही गरजेचं असतं.

अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढणं सामान्य

मी अलिकडेच सहा आठवड्यांसाठी वरून घेतलेली साखर (ॲडेड शुगर) पूर्णपणे बंद करण्याचा प्रयोग केला होता. तेव्हापासून, जेव्हा जेव्हा मी एखादा गोड पदार्थ खातो, तेव्हा माझी ब्लड शुगर नक्कीच वाढते, असं माझ्या निरीक्षणात आलं आहे.

तज्ज्ञांच्या मते, रक्तामध्ये साखरेचं प्रमाम अचानक वाढणं (ग्लुकोज स्पाइक) हे आरोग्यासाठी हानिकारकच असतं, हा लोकांचा सर्वात मोठा गैरसमज आहे.

ब्राऊन पुढे सांगतात की, रक्तातील साखरेची ही वाढ अगदी थोड्या वेळासाठी वाढली आणि ती सामान्य चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) असलेल्या व्यक्तीमध्ये झाली असेल, तर आपण याबाबत अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

मात्र, रक्तातील ग्लुकोजची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त काळ वाढलेली राहिली किंवा शरीर ग्लुकोजचं नियंत्रण नेहमीप्रमाणं करत नसेल, तर हा एक संकेत असू शकतो. असं जेनिफर शेर सांगतात.

हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं (इन्सुलिनचा प्रभाव कमी होणं) लक्षण असू शकतं, या स्थितीच शरीर ग्लुकोजला नेहमीसारखा प्रतिसाद देत नाही.

त्यामुळे, जर शरीरात प्रदीर्घ काळासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त राहिलं, तर इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो.

परंतु, काही तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळं थेट इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो, हे ठामपणे सांगण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.

याऐवजी, जेव्हा आपण आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त अन्न खातो, तेव्हा या अतिरिक्त उष्मांकांचं (कॅलरीजचे) चरबीत रूपांतर होतं, हे याचं कारण असू शकतं, असं ‘युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड’मधील डाएटिशियन आणि वरिष्ठ संशोधन सहस्राध्येता (सिनियर रिसर्च फेलो) निकोला गेस सांगतात.

त्या पुढं असंही म्हणतात की, यामुळे वाढणारे वजन हा टाईप 2 मधुमेहासाठी एक धोक्याचा घटक (रिस्क फॅक्टर) ठरतो.

ग्लुकोज मॉनिटर्सचा वाढता वापर

मधुमेहाचे रुग्ण आधीपासूनच त्यांच्या रक्तातील साखरेची (ब्लड शुगर) नियमितपणे तपासणी करत असतात.

ही तपासणी करण्याचा एक मार्ग म्हणजे ‘सतत ग्लुकोज निरीक्षण प्रणाली’ (CGMs). यांसारखी उपकरणं दिवसभरातील रक्तातील साखरेच्या पातळीची सातत्याने नोंद ठेवतात.

सातत्याने ग्लुकोज मॉनिटर्सचा वाढता वापर

काही इतर तज्ज्ञांच्या मते, या उपकरणांमुळे “आहारात हानिकारक बदल होऊ शकतात आणि आरोग्याविषयीची संकल्पना बिघडू शकते”, कारण ही उपकरणं रक्तातील साखरेची पातळी आहे त्यापेक्षा जास्त दाखवू शकतात.

अलीकडील एका निरीक्षणात, ॲड्रियन ब्राऊन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं आढळून आलं की, “मधुमेह नसलेल्या लोकांमध्ये ‘सतत ग्लुकोज निरीक्षण प्रणाली’ CGMs च्या वापरामुळे आरोग्यात सुधारणा होते, हे सिद्ध करणारे सुसंगत आणि उच्च-दर्जाचे पुरावे उपलब्ध नाहीत.”

मात्र, याला अपवाद फक्त टाईप 2 मधुमेहाचा धोका असणारे लोक असू शकतात. रक्तातील ग्लुकोजवर लक्ष ठेवणारं ट्रॅकर हे कोणाला जास्त धोका आहे याचा अंदाज लावण्यास मदत करू शकतं, असं नवीन संशोधन दाखवून देतं, असं शेर सांगतात. परंतु खरच ‘सतत ग्लुकोज निरीक्षण प्रणाली’ CGMs फायदेशीर आहे की नाही हे ठरवण्यासाठी आणखी पुराव्यांची गरज आहे.

संतुलित आहार घेणं सर्वात उत्तम का मानलं जातं?

रक्तातील साखरेची पातळी वाढणं ही एक सामान्य बाब असली आणि निरोगी लोकांमध्ये याचे कोणतेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नसली, तरी शरीरातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करण्याचे काही फायदे नक्कीच आहेत.

उदाहरणार्थ, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक खाली घसरल्यास (ग्लुकोज डिप) आपल्याला जास्त भूक लागू शकते, ज्यामुळे एकंदरीत कॅलरीजचं (ऊर्जेचे) प्रमाण वाढू शकतं.

अन्नपदार्थ देखील आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीत होणाऱ्या बदलांवर परिणाम करतात.

याबरोबरच, तुम्ही कोणत्या क्रमानं अन्नपदार्थ खाता या गोष्टीचा विचार करणंही उपयुक्त ठरू शकतं. उदाहरणार्थ, कर्बोदकांनी युक्त (कार्बोहायड्रेट्सने समृद्ध) जेवणापूर्वी प्रथिनं (प्रोटीन) आणि भाज्या खाल्ल्यानं जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी नेहमीची वाढ कमी होते, असं दिसून आलं आहे.

आणखी एक टीप म्हणजे असे संतुलित आहार घेण्याचं उद्दिष्ट ठेवा. यात प्रथिनं (प्रोटीन), फायबरनं समृद्ध वनस्पतीजन्य अन्न (फायबर-रिच प्लांट फूड्स) आणि निरोगी चरबीचा (हेल्दी फॅट्स) समावेश असावा.

यामुळे पचनक्रिया मंदावण्यास आणि ऊर्जेचा (एनर्जीचा) सातत्यपूर्ण पुरवठा होण्यास मदत होते, तसेच तुमचे वजन निरोगी व नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

ब्राऊन सांगतात, “प्रत्येक व्यक्तीनुसार या प्रतिसादात लक्षणीय फरक जाणवतो. इतकंच नाही तर, एकाच व्यक्तीच्या शरीराचा प्रतिसाद हा त्याला मिळालेली झोप, ताणतणाव (स्ट्रेस), शारीरिक हालचालींची पातळी आणि खाल्लेल्या अन्नाचा प्रकार यांसारख्या घटकांनुसार वेळोवेळी बदलू शकतो.”

सातत्याने ग्लुकोज मॉनिटर्सचा वाढता वापर

तसंच, काही आहारांमध्ये (डायट्स) सूचवल्याप्रमाणं कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) पूर्णपणे टाळणं अंगलट येऊ शकतं, असं निकोला गेस म्हणतात.

महत्त्वाचं म्हणजे, कर्बोदकं हा संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग मानला जातो. निकोला गेस यांनी त्यांच्या एका अलीकडील निरीक्षणात (रिव्ह्यू) म्हटल्याप्रमाणं, काही विशिष्ट अन्नपदार्थ पूर्णपणे टाळल्यानं नकळतपणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असणारे पदार्थही खाणं बंद होऊ शकतं.

त्यामुळे ‘सतत ग्लुकोज निरीक्षण प्रणाली’ (CGMs) फायद्यांबाबत तज्ज्ञांमध्ये अजूनही मतभेद असण्याची शक्यता असली, तरी तोपर्यंत आपल्यापैकी बहुतेकजण आधीच गरजेपेक्षा जास्त अतिरिक्त साखर (ॲडेड शुगर) खातात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे, आपण हे अतिरिक्त साखरेचं प्रमाण कमी करण्यावर नक्कीच भर देऊ शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC