Source :- BBC INDIA NEWS

लॉस एंजेलिस आगीचे 8 फोटो, कॅलिफोर्नियाच्या स्वप्नसृष्टीला वणव्यानं असं केलं उद्ध्वस्त

फोटो स्रोत, Getty Images

1 तासापूर्वी

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये पसरलेली आग भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे.

या आगीचं क्षेत्र सातत्यानं वाढतच चाललं आहे. आतापर्यंत कमीत कमी सहा जंगले या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावरुन लवकरच पायउतार होणाऱ्या जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता.

आगीचे तीव्र लोट आता अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या लॉस एंजेलिसमधील जवळपास सर्व परिसरामध्ये पसरले आहेत. या आगीमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लाखाहून अधिक लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे.

जोरदार वाहणारं वारं आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे.

या आगीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची ऑस्कर नामांकनं देखील दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहेत. यापूर्वी हे 17 जानेवारी रोजी होणार होते, परंतु आता 19 जानेवारी रोजी अकादमी पुरस्कार नामांकनांबाबतची माहिती दिली जाईल.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी सर्वांत आधी पॅसिफिक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर उत्तर-पश्चिम लॉस एंजेलिसमध्ये येतो.

मात्र, फक्त 10 एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच 2900 एकरच्या परिसरामध्ये पसरली. आता शहरभर आकाशात धुराचे लोट जमा झाले.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असूनही सद्यस्थितीत ही आग 17,200 एकरमध्ये पसरलेली आहे. कॅलिफोर्नियाच्या इतिहासामध्ये ही आग आतापर्यंतची सर्वांत विनाशकारी आग मानली जात आहे.

लॉस एंजेलिस फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की, या भीषण आगीमुळे इथे राहणारा जवळपास प्रत्येक रहिवासी धोक्यात आहे.

पॅसिफिक पॅलिसेडस

या परिसराला आगीची सर्वात जास्त झळ बसली आहे. इथल्या बहुतांश लोकांना आपली घरं आणि चीजवस्तू सोडून पळून जावं लागलं आहे.

फोटो स्रोत, Google Earth, Getty

पॅलिसेडस चार्टर हायस्कूल हे या भागातलं महत्त्वाचं केंद्र आहे. मात्र आगीमुळे ते उद्ध्वस्त झालं आहे.

फोटो स्रोत, facebook

या प्रसिद्ध शाळेत अनेक मोठे लोक शिकून गेले आहेत. हॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रण या शाळेत झालेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पॅसिफिक किनारी महामार्ग

पॅसिफिक किनारी प्रदेश आधी असा दिसत होता.

फोटो स्रोत, Reuters

वणवा लागल्यावर या प्रदेशाची अशी स्थिती झाली आहे.

फोटो स्रोत, Reuters

ऑल्टाडेना

जंगलात लागलेल्या आगीमुळे ऑल्टाडेनामधील शेकडो घरं नष्ट झाली आहेत. हा परिसर लॉस एंजेलिसच्या उत्तरेस असलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या मागे येतो. या फोटोतून घराचं किती नुकसान झालंय हे दिसून येतं.

फोटो स्रोत, Google Earth, Getty

आगीमुळे बेचिराख झालेले ऑल्टाडेना एखाद्या वैराण प्रदेशासारखं दिसू लागलंय

फोटो स्रोत, Maxar Technologies

पॅसाडेना

इथल्या जवळच्या पॅसाडेना भागामध्ये एक सिनेगॉगही आगीत भस्मसात झालं आहे. हे सिनेगॉग जवळपास 100 वर्षं जुनं होतं असं सिनेगॉगच्या वेबसाईटमध्ये नमूद केलेलं आहे.

फोटो स्रोत, Google Earth, Getty

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC