Home LATEST NEWS ताजी बातमी विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा काय घडतं? पायलट आणि कर्मचाऱ्यांकडे असतात...

विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा काय घडतं? पायलट आणि कर्मचाऱ्यांकडे असतात ‘हे’ पर्याय

4
0

Source :- BBC INDIA NEWS

विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा काय घडतं? पायलट आणि कर्मचाऱ्यांकडे असतात 'हे' पर्याय

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या फ्लाईट 1073 या विमानातील घटनेनंतर विमान प्रवास आणि त्याच्या अनेक पैलुंबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्याच चर्चेमध्ये हवेत उडणारं विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा नेमकं काय होतं, याचीही चर्चा होते आहे.

फ्लायदुबईचं विमान सुरक्षित खाली उतरू शकलं, यावर काहीजण आश्चर्यही व्यक्त करत आहेत आणि विमानातील भारतीय पायलट स्मित मच्छर, इतर कर्मचारी आणि प्रवाशांचं कौतुकही केलं जातंय.

पायलट्स आणि कर्मचाऱ्यांकडे अशा वेळी काय पर्याय असतात, याविषयी आम्ही हवाई वाहतूक तज्ज्ञ कॅप्टन महेश खैरनार यांच्याशी बातचीत केली. कॅप्टन खैरनार आधी भारतीय हवाई दलात होते आणि स्मित यांनाही ओळखतात.

दोघांनी ‘स्पाईसजेट’ या विमान कंपनीत एकाच वेळी काम केलं होतं आणि स्मित यांच्याप्रमाणेच कॅप्टन खैरनार बोईंग 737 मॅक्स प्रकारची विमानं चालवतात.

ही अत्यंत आधुनिक प्रकारातील विमानं असून, आकाशातून उडताना ती अचानक खाली आली (अल्टिट्यूड लॉस) किंवा पायलट्सनी नियंत्रण गमावलं, तर ती थेट खाली कोसळत नाहीत.

या विमानांत अशा स्वयंचलित यंत्रणा असतात, ज्या काही काळ विमानाला हवेत उडत ठेवतात. त्यामुळे विमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी अवधी मिळू शकतो. अर्थात या प्रणालींवरही मर्यादा आहेत.

पण मग नेमकं, फ्लायदुबईच्या विमानाच्या बाबतीत काय काय घडलं असावं?

विमान अचानक खाली येतं तेव्हा…

कॅप्टन खैरनार सांगतात, “जेव्हा ऑटो पायलट नसतं आणि विमान पूर्ण असं dive मध्ये जातं, तेव्हा त्याचा वेग प्रचंड असतो. मागे बोईंग 737 मॅक्स विमानाचे दोन क्रॅश झाले होते (इथियोपियन एअरलाईन्स आणि लायनएयर) त्यावेळेस त्यांनी विमानाचा खाली येण्याचा वेग प्रतिसेकंद आठ ते नऊ हजार फूट असा असल्याची नोंद केली होती”

एखादा दगड फेकून मारल्यावर तो आणखी वेगानं खाली येतो. विमानाच्या बाबतीत या वेगासोबत इंजिनांनी तयार केलेली ऊर्जाही असते. म्हणजे अशा वेळेस खाली येणाऱ्या विमानाचा वेग मिनिटाला अगदी बारा ते तेरा हजार फूट एवढा प्रचंड होऊ शकतो.

“फ्लायदुबईच्या विमानात दोन पायलट्समध्ये भांडण सुरू होतं, ऑटोपायलट डिसेबल केला होता, असं प्राथमिकदृष्ट्‍या समोर आलं आहे. त्यामुळे विमान जवळपास नोजडाईव्ह करत असावं (म्हणजे उभं जमिनीकडे येत असावं) अशी शक्यता आहे.

विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा काय घडतं? पायलट आणि कर्मचाऱ्यांकडे असतात 'हे' पर्याय

कॅप्टन खैरनार सांगतात की, “पायलटला अशा वेळी विमानावरचं हे बाहेरचं बल, इंजिनाची पॉवर कमी करावी लागेल. खाली येणाऱ्या वेगाचा वापर वर चढण्यासाठी करून तुम्ही विमान स्टॅबिलाईझ करू शकता, असं ते सांगतात.

या प्रकरणात विमान प्रचंड वेगानं खाली आलं आहे. Flightradar24 या वेबसाईटच्या ट्रॅकिंग डेटानुसार, या विमानाचा वेग एका क्षणी 598 नॉट्स म्हणजे (ताशी 688 मैल किंवा ताशी 1,107 किलोमीटर) एवढा झाला होता.

इतक्या प्रचंड वेगानं विमान उडू लागतं, तेव्हा त्याचे तुकडे होण्याचा किंवा त्यात बिघाड होण्याचा धोका वाढतो.”

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

“आपण एखादी गाडी घेतो, तेव्हा तिचा एक सर्वाधिक वेग तपासलेला असतो. साधारण ताशी 140 किंवा 160 किलोमीटर वेगापर्यंत तिची टेस्ट केलेली असते. त्याबाहेर वेग गेला तर गाडी तयार करणारी कंपनी गाडी टिकेल का? याची खात्री देत नाही. विमानाच्या बाबतीतही तसंच असतं,” कॅप्टन खैरनार स्पष्ट करातात.

“जवळपास सहाशे नॉटिकल माइल्सपर्यंतचा वेग गाठल्यावरही विमान टिकून राहिलं, त्याचे काही भाग हवेत तुटून पडले नाहीत, हे आश्चर्य आहे. विमानाचा पंख, टेलप्लेन (शेपटीकडील भाग), रडर (विमानाची दिशा निश्चित करणारी एक यंत्रणा) यापैकी एखादी गोष्ट नष्ट झाली असती, तर त्या वेगानं उडताना विमान कोसळलं असतं.”

पण या विमानानं एवढा ताण सहन केला. तसंच विमान उंचावर असताना हे घडलं, खाली आसपास मोठे डोंगर नव्हते. नाहीतर विमान कशावर तरी आदळण्याचा धोका जास्त होता, असंही खैरनार नमूद करतात.

आतमधील लोकांवर काय परिणाम होतो?

केवळ कोसळतानाच नाही, तर अनेकदा टर्ब्युलन्समुळे, वातावरणातील वादळासारख्या घटनांमुळे विमान अचानक खाली येण्याच्या घटना घडल्या आहेत.

कल्पना करा, तुम्ही एखाद्या रोलर कोस्टर वरून किंवा आकाश पाळण्यातून खाली येताय. तेव्हा जसा पोटात गोळा येतो, तसंच विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा जाणवू लागतं. पण अनेक पटींनी जास्त.

प्रवाशांना गरगरल्यासारखं होतं. अचानक वेटलेसनेस म्हणजे आपण हवेत तरंगत असल्यासारखं वाटू लागतं.

विमानात काही ‘अनसिक्युअर्ड’ वस्तू असतील, म्हणजे सीटबेल्ट नीट बांधलेला नसेल, वरती हँडबॅग ठेवतात, ती जागा उघडी असेल तर अशा वेळी या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जाऊन प्रवाशांवर आदळून दुखापत होऊ शकते.

विमान वेगानं खाली आल्यानं त्यातील हवेचा दाब अचानक बदलतो, तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊ शकतो आणि लोकांना गुदमरल्यासारखं वाटू शकतं. चक्कर येऊ शकते, घाबरल्यासारखं वाटू शकतं.

विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा काय घडतं? पायलट आणि कर्मचाऱ्यांकडे असतात 'हे' पर्याय

पायलट आणि क्रू मेंबर्स यांना अशा आपात्कालीन स्थितीसाठी ट्रेनिंग दिलेलं असतं.

“Upset Prevention and Recovery Training म्हणजे UPRT मध्ये अशा पद्धतीच्या घटनांचा सराव केला जातो. पण सिम्युलेटरमध्ये कितीही ट्रेनिंग झालं तरी ऐन वेळी एखादी व्यक्ती थिजून गेली, गोंधळली असंही होतं. कारण रोजच्या कामात अशा गोष्टी क्वचितच घडतात, तुम्हाला याची सवय नसते.

“एरवी दुसऱ्या कुठल्या बिघाडानं विमान कोसळल्याच्या घटना घडल्या, तेव्हाही विमानावर ताबा मिळवणं पायलट्सना कठीण गेलं होतं. माझ्या मते असामान्य नशीब आणि असामान्य कौशल्य यामुळेच हे विमान वाचलं.

“स्मितवर धारधार शस्त्रानं वार झाले होते. पण तो मानसिकदृष्ट्‍या अलर्ट होता. त्यानं कॉकपिटचं दार उघडलं. नेमकं काय घडलं हे तपासात समोर येईल. पण त्यानं दार उघडलं, ते वेळेत उघडलं, त्यामुळे प्रवासी आणि क्रूला काही करता आलं. दोघं आतच भांडत राहिले असते, तर ही आपत्ती आणखी मोठी ठरली असती. पण पायलटसह सर्वजण सहीसलामत जमिनीवर उतरले”, असं कॅप्टन खैरनार सांगतात.

विमान अचानक खाली येऊ लागतं, तेव्हा काय घडतं? पायलट आणि कर्मचाऱ्यांकडे असतात 'हे' पर्याय

ट्रेनिंगचा एक भाग म्हणजे प्रथमोपचाराचं ट्रेनिंग. विमानातील क्रू मेंबर्सना प्रथमोपचाराचं ट्रेनिंग दिलेलं असतं. विमानात काही प्राथमिक उपचाराची साधनंही ठेवलेली असतात.

“तुम्हाला चाकू मारून कोणी काही केलं असेल तर ती गंभीर परिस्थिती प्रथमोपचारापलीकडची आहे. अशा वेळी विमानातील प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञ आहे का, हे विचारलं जातं. याला ‘पेजिंग फॉर डॉक्टर’ असं म्हणतात. नशीबानं या विमानात एक डेंटिस्ट होता, ज्याला काही गोष्टींचं ट्रेनिंग होतं.

प्रवासीही फार पॅनिक झाले नाहीत, शांत राहिले, खूप आरडाओरड केली नाही, हेही महत्त्वाचं आहे.

“प्रवासी उठले असते आणि धावपळ करू लागले असते, तर त्यानंही विमानाचं संतुलन ढासळू शकतं. म्हणजेच या घटनेत पायलटची सतर्कता, केबिन क्रू आणि प्रवाशांनी दाखवलेलं प्रसंगावधान या सगळ्यामुळे दुर्घटना टळली.”

विमानात कुठली आपत्ती ओढवली, तर काही इमर्जन्सी कोड्स असतात. तुम्ही एटीसीला त्याची माहिती देऊ शकता. उदाहरणार्थ अपहरणासाठी 7500, कम्युनिकेशन फेल्युअरसाठी 7600, मोठी इमर्जन्सी असल्यास 7700. विमान काही कारणानं अचानक खाली जातंय, तेव्हा तुम्ही 7700 अनाऊन्स करू शकता आणि परिस्थिती नियंत्रणात आली तर डी-अनाऊंस करू शकता.

“विमानात तज्ज्ञ पायलटही प्रवास करत होते आणि जवळच काही मिनिटांत विमान खाली उतरवण्याची सुविधा उपलब्ध झाली, हे आणखी एक नशीब. विचार करा मुंबईने मुंबईहून दुबईला जाताना, भर समुद्रावर असं काही घडलं असतं, तर त्यांना आणखी तासभर समुद्रावरून उड्डाण करावं लागलं असतं. त्यात अडचणी वाढल्या असत्या.”

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कॅप्टन खैरनार सांगतात “आम्ही एअरहोस्टेसला कोडवर्ड दिलेला असतो. तिने दरवाजा ओपन करा सांगितलं, तर तो कोड मागितला जातो. तसंच कॅमेऱ्यातून दरावाजाजवळ कोण आहे, कॉकपिटकडे येणारा मार्ग सुरक्षित आहे की नाही, प्रवाशांसाठी बंद आहे की नाही, हेही पाहता येतं. मगच दार उघडलं जातं.

“समजा काही कारणानं दोन्ही पायलट्स बेशुद्ध झाले, किंवा काही करण्याच्या स्थितीत नसतील, तर केबिन क्रू कडे एक सिक्युरिटी कोड असतो, ज्यामुळे 45 सेकंदांनी कॉकपिटचं दार उघडू शकतं. एरवी कुणी हा कोड वापरून आत यायचा प्रयत्न केला, तर पायलट आतूनच दार परत बंद करू शकतो. पण पायलटनं प्रतिक्रियाच दिली नाही, तर 45 सेकंदांनी दार आपोआप उघडतं आणि क्रू आत येऊ शकतात.”

SOURCE : BBC