Source :- ZEE NEWS

Honeymoon Destination of Snakes:  आपल्यापैकी अनेकांना केवळ साप असा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो. अनेकांना तर सरपटणाऱ्या प्राण्यांची फारच भिती वाटते असं चित्र पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगात असं एक ठिकाण आहे जिथं सापांचं मिलन पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. दरवर्षी वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी जवळपास 75 हजार पूर्वी गार्टर प्रजातीचे साप एकाच ठिकाणी येतात आणि स्वत:साठी योग्य जोडीदार शोधतात. या जागेच्या याच वैशिष्ट्यामुळे ती संशोधकांसाठीही औत्सुक्याचा विषय ठरत आहे. नेमकी ही जागा कोणी आणि इथं काय होतं सविस्तर जाणून घेऊयात…

एकाच वेळी 75 हजार साप

खरं तर जवळपासही कुठे साप दिसला तरी तिथून पळ काढणारे किंवा थेट सर्पमित्राचा नंबर डायल करणारे अनेकजण आपल्यात आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा त्यापैकीच एक असाल. मात्र जगात असेही अनेक लोक आहेत जे या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या इतके प्रेमात असतात की त्यांना पाहण्यासाठी ते काहीही करु शकतात. खरं तर एखादे दोन साप किंवा सर्पोद्यनात गेलात तर काही शेकड्याने साप पाहायला मिळतात. मात्र जगात अशी एक जागा आहे जिथे जवळपास 75 हजार साप एकाच वेळी जमतात आणि स्वत:साठी जोडीदाराचा शोध घेतात. बरं सापांचं हे मिलन पाहण्यासाठी इथं हजारो पर्यटकही गर्दी करताना दिसतात.

काही वेळेस दीड लाखांपर्यंत जाते संख्या

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या जागेला सापांचा हनीमून स्पॉट अशा नावानेही ओळखलं जातं. या शहरामध्ये वळवळणारे साप दिसणं अतिशय सामन्य बाब आहे. हे शहर कॅनडामधील मॅनिटोबा येथे असून त्याचं नाव, नार्सिस सिटी असं आहे. दर वसंत ऋतुला या शहरामध्ये 75 हजारांहून अधिक साप एकाच ठिकाणी जमतात. कधी कधी सापांची ही संख्या 75 हजारांच्या दुप्पट म्हणजेच दीड लाखांपर्यंतही जाते.

नक्की वाचा >> ‘नासा’ला मंगळावर सापडली सोन्याची टेकडी! वैज्ञानिकही थक्क; हे ‘सोनं’ पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेशल प्लॅन

कधी आणि कसे जमतात हे साप?

या सापांच्या शरीरावर लाल रंगाची पट्टी असते आणि हे सर्व साप पूर्वी गार्टर प्रजातीचे असतात. जीवशास्त्राशीसंबंधित तज्ज्ञ मंडळी दरवर्षी मार्च ते जूनदरम्यान हजारोंच्या संख्येनं या शहराला भेट देतात. संपूर्ण हिवाळा आपल्या बिळांमध्ये लपून घालवल्यानंतर हे साप जमिनीमधील कपाऱ्यांमधून बाहेर येतात. उष्ण वातावरणाचा आनंद घेण्याबरोबरच ते लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जोडीदाराच्या शोधात असतात. या शोधादरम्यान हजारो साप नार्सिस शहरामध्ये जमतात. सर्दीचा मौसम संपल्यानंतर येथील साप स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. हिवाळ्यामध्ये हे साप चुन्याच्या दगडांमध्ये असलेल्या फटी आणि कपाऱ्यांमधून बाहेर येतात. वसंत ऋतू सुरु झाल्यानंतर नर सापांना आधी जाग येते आणि ते मादीच्या शोधात या फटींमधून बाहेर पडतात. जी नागिनीला हे साप आवडतात त्या त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी म्हणजेच सेक्ससाठी संमती देतात.

नक्की वाचा >> चाणक्य नीती: प्रत्येक विवाहित जोडप्याने रात्री बेडवर जाण्यापूर्वी कराव्यात ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर…

नर मादीला कसं करतात इम्प्रेस?

सापांचं हनिमून डेस्टीनेश असलेल्या नार्सिस शहरात पोहचल्यानंतर नर साप हे मादीभोवती फेर धरुन नाचल्याप्रमाणे गोल गोल फेऱ्या मारतात. मादीवर आपला प्रभाव टाकून तिला आपलं जोडीदार बनवण्याचा या सापांचा प्रयत्न असतो. या प्रक्रियेला ‘मेटिंग बॉल’ असं म्हणतात. हे अशा पद्धतीने सापांचं एकत्र येणं म्हणजे सापांच्या प्रजननाचा काळ असतो. या शहरातील नार्सिस सर्प गुहांमध्ये हजारो साप मुक्तपणे फिरत असतात. या ठिकाणी सापांची मोठी गर्दी होते आणि त्यांना पाहण्यासाठी तितकीच गर्दी पर्यटकांचीही असते.

…अन् हजारो सापांचे प्राण वाचले

नार्सिस शहरामधून एक मोठा महामार्ग जातो. सापांकडे लक्ष देत सावकाश गाड्या चालवाव्यात अशी सूचना देण्यात आलेल्या असूनही येथे हजारो साप गाड्यांखाली चिरडून मरण पावले आहेत. आता पर्यावरण आणि सर्पप्रेमींनी या महामार्गाखालून काही भुयारं तयार केली असून या मार्गाच्या दोन्ही बाजूंना बारीक जाळ्यांचं कुंपण घातलं आहे. या माध्यमातून गाडीखाली चिरडून मरणाऱ्या सापांची संख्या कमी करण्यावर भर असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसू लागला आहे.

हा सारा येथील इकोसिस्टीमचा भाग

नार्सिस शहरामध्ये नर आणि मादी साप एकत्र येणं हे केवळ सहज घडून आलेली गोष्ट असून नसून हा सारा प्रकार म्हणजे येथील इकोसिस्टीमचा भाग आहे. साप कसे राहतात, त्यांचा वेगवेगळ्या गोष्टींना प्रतिसाद कसा असतो, याचा अभ्यास संशोधकांना करता येणार आहे. हे ठिकाण पर्यटकांना वारंवार आकर्षित करतं आणि सर्पमित्रांसाठी तर एखाद्या स्वर्गासारखं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 

SOURCE : ZEE NEWS