Source :- ZEE NEWS

Viral News : भारतात नातेसंबंधाना अतिशय महत्त्व आहे. श्रवणकुमारसारखे पुत्र, राम-सीतेसारखे देवासारखे पती-पत्नी, लक्ष्मणासारखे दीर आहेत जे त्यांच्या नातेसंबंधांच्या मर्यादा समजून वागत असतात. पण परदेशात या धक्कादायक नातेसंबंधामुळे विश्वासा तडा गेला आहे. पती पत्नीचं नातं असो किंवा आई लेकीचं नातं असो प्रत्येक नातं हे विश्वासावर उभं असतं. एका महिले त्यांच्या आयुष्यातील अशी धक्कादायक घटना सांगितली की, त्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. तिच्या आयुष्यात नात्याची अशी गुंतागुंत झाली आहे, की ती ही कहाणी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

या महिलेने सांगितलं की, त्याच्या लग्नाला आणि पती पत्नीच्या नात्याला तडा गेला आणि तोही तिच्या आईमुळे. जेव्हा तिला कळलं की, तिच्या आईचं तिच्या पतीसोबत म्हणजे सासूचं जावयासोबत गेल्या 22 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. एके दिवशी दोघांना तिने रंगेहात पकडलं आणि त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा मुलीच्या वडिलांना, म्हणजेच जावयाच्या सासऱ्यांना या घटनेबद्दल कळलं त्यांनाही धक्का बसला. त्यांच्या मनात अजून संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी ताबडतोब त्यांच्या लहान मुलांची डीएनए चाचणी करून घेतली. मग असे एक रहस्य उघड झाले की ते ऐकून संपूर्ण कुटुंब हादरलं. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर r/TrueOffMyChest नावाचा एक ग्रुप आहे. @blownupmarriage1 या वापरकर्त्याने सुमारे 3 वर्षांपूर्वी एक मोठी पोस्ट लिहिली होती आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित त्रासदायक गोष्टी उघड केल्या होत्या. ती 40 वर्षांची होती. तिने सांगितले की तिच्या आई आणि पतीचे 22 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती आणि तिचा नवरा 15 वर्षांच्या असल्यापासून प्रेमात होते. जेव्हा ती महिला 17 वर्षांची झाली तेव्हा तिच्या पालकांनी त्या दोघांनाही त्यांच्या स्वतःच्या घरात जागा दिली. दोघांचेही वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झाले. लग्नानंतर वडिलांनी त्यांच्या मुली आणि जावयासाठी घराशेजारी एक घर विकत घेतले, जिथे दोघेही एकत्र राहू नांदायला लागले. 

डीएनए चाचणीने उघडलं मोठं रहस्य

त्या महिलेला एकूण 6 भावंडे होती. तिला स्वतःची 4 मुलं होती आणि ती 7 महिन्यांची गर्भवती होती. त्या महिलेने सांगितलं की एकदा ती तिच्या मैत्रिणींसोबत सहलीला गेली होती. पण ती सहलीच्या एक दिवस आधी परतली. ती तिच्या बेडरूममध्ये जाताच तिला तिची आई आणि नवरा आक्षेपार्ह स्थितीत दिसले. हे पाहून त्याचे भान हरपले. तिने तिच्या पतीला विचारले की हे प्रेमसंबंध किती काळापासून सुरू आहेत, त्यावर पतीने तिला सांगितलं की हे प्रेमसंबंध लग्नापूर्वीपासून सुरू होते. यावरून, त्या महिलेला समजले की तिचे दोन लहान जुळे भाऊ आणि शेवटचा भाऊ तिच्या पतीची मुलं असण्याची शक्यता आहे. जेव्हा महिलेने हे तिच्या वडिलांना सांगितलं तेव्हा तेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी आपल्या लहान भावांच्या डीएनए चाचणीची मागणी करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. तेव्हा हे जुळे भाऊ तिच्या पतीची मुलं असल्याचे उघड झाले. यानंतर महिलेने तिच्या संपूर्ण कुटुंबाला ही घटना सांगितली. वडिलांनी आईला घराबाहेर काढले, जी तिच्या बहिणीसोबत राहायला गेली होती आणि महिलेचा तिच्या पतीसोबत घटस्फोटाचा खटलाही सुरू झाला होता.

या पोस्टमध्ये त्या महिलेने इतरही अनेक माहिती दिली आहे, जी खूपच विचित्र आहे. त्याची पोस्ट व्हायरल झाली आणि त्याला 29 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आणि हजारो लोकांनी त्यावर कमेंट केल्या. महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे की तिची आई संपूर्ण दोष तिच्यावर टाकत आहे आणि म्हणत आहे की तिने तिचे घर उद्ध्वस्त केले आणि या घटनेमुळे तिला तिची नोकरीही गमवावी लागली. यामुळे लोकांनी त्या महिलेला पाठिंबा दिला आणि म्हटलं की ती अजिबात चुकीची नव्हती, तिची आई आणि नवरा फसवणूक करणारे होते आणि तिने योग्य पाऊल उचलले. 

SOURCE : ZEE NEWS