Source :- BBC INDIA NEWS

सैफ अली खान

फोटो स्रोत, ANI

16 जानेवारी 2025

अपडेटेड 52 मिनिटांपूर्वी

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाला. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि यात त्याला दुखापत झाली.

सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान सैफ अली खानच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या एलीयामा फिलिप यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी हल्लेखोराचं वर्णन सांगितलं आहे. तसेच त्यादिवशी नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम देखील त्यांनी सांगितला आहे.

सैफ अली खानच्या टीमनं याविषयी माहिती देताना म्हटलं, “सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली असून आता त्याच्या तब्येत कसलाही धोका नाहीये.

“सध्या तो बरा झाला असून डॉक्टर त्याच्या तब्येत लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.”

सैफ अली खानच्या टीमने लिलावती ह़ॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “काल रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

सैफ अली खान

फोटो स्रोत, Getty Images

अभिनेता सैफ अली खानच्या टीमनेही या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलं आहे.

त्यात म्हटलंय, “सैफ अली खानच्या निवासस्थानी घरफोडीचा प्रयत्न झाला होता. त्याच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.”

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Twitter पोस्ट समाप्त, 1

मजकूर उपलब्ध नाही

Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

सैफ अली खानची पत्नी करीना कपूरच्या पीएआर एजन्सीने म्हटलंय की, “काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बाकीचे कुटुंबीय चांगल्या स्थितीत आहे.

“आम्ही मीडिया आणि सैफ अली खानच्या चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. पोलीस तपास करत आहेत त्यामुळे इतर प्रकारचे अंदाज लावू नयेत.”

रुग्णालयानं काय सांगितलं?

लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमनी यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं की, “सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. त्याला साडेतीन वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं.

“त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम मणक्याजवळ आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. जखम किती खोल आहे हे शस्त्रक्रियेनंतर कळेल.”

सैफच्या मानेवरही जखम असल्याचं डॉक्टर उत्तमनी यांनी सांगितलं. दुखापत किती खोलवर आहे हे पाहिले जात आहे. सकाळी साडेपाच वाजता शस्त्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.

‘हल्ला चिंताजनक’

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी भाष्य केलं आहे.

त्यांनी म्हटलं, “मुंबईतील कायदा सुव्यवस्था किती ढासळत गेली याच हे लक्षण आहे. मध्यंतरी एकाची हत्या झाली त्याच भागात आणि आज एकावर हल्ला झाला हे सगळं चिंताजनक आहे. राज्य सरकारने विशेषत: मुख्यंत्री हे गृहमंत्री आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे.”

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं, “सैफ अली खान यांच्यावरील हल्ला ही चिंताजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकृत निवेदन येऊ द्या.”

Twitter पोस्टवरून पुढे जा, 2

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Twitter पोस्ट समाप्त, 2

मजकूर उपलब्ध नाही

Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी लिहिलं, “या हल्ल्यानं मला अत्यंत धक्का बसला. मुंबईत काय चाललंय? सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रामध्ये हे घडते, ही सर्वांत चिंतेची बाब आहे. मग सामान्य माणसाला कोणत्या सुरक्षेची अपेक्षा आहे?”

Twitter पोस्टवरून पुढे जा, 3

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Twitter पोस्ट समाप्त, 3

मजकूर उपलब्ध नाही

Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

“दिवसेंदिवस आपण मुंबईमध्ये हिंसाचार, दरोडे, चाकूहल्ले अशा घटनांबद्दल ऐकतो आहोत आणि सरकारकडं उत्तरं नाहीत. आम्हाला उत्तरं हवी आहेत,” असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC