Source :- BBC INDIA NEWS

सोलापूरची कडक भाकरींनी महिलांना असा मिळवून दिला स्वयंरोजगार

9 जानेवारी 2025

ज्वारीचं कोठार म्हणून नावारुपाला आलेलं सोलापूर कडक भाकरीसाठीही प्रसिद्ध आहे. इथल्या कडक भाकरींमुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे.

लक्ष्मी बिराजदार गेली जवळपास वीस वर्षं हा कडक भाकरीचा व्यवसाय करतायत. सुरूवातीला बचत गटातून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज त्या स्वतंत्रपणे चालवतात.

2012 साली त्यांनी संतोषी माता गृहउद्योगाची स्थापना केली. यातून त्यांनी 20 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. दिवसाला पाच हजार भाकऱ्या करणाऱ्या लक्ष्मी यांना यशस्वी उद्योजिका म्हणून या कडक भाकरीने ओळख मिळवून दिली आहे.

तर सोलापूरच्याच शिंगडगाव येथे राहणाऱ्या अंबिका म्हेत्रे यांनाही बचतगटाचा आधार आहे. आणि म्हणूनच त्यांनी मशिनच्या साह्याने भाकरी बनवायला सुरूवात केली.

(रिपोर्ट, शूट आणि एडिट राहुल रणसुभे)

SOURCE : BBC