Source :- BBC INDIA NEWS

स्पेन, पोर्तुगाल

फोटो स्रोत, Getty Images

19 मिनिटांपूर्वी

युरोपमधील स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अनेक भागात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानं विमानतळ, मेट्रो आणि रेल्वेसारख्या सेवा ठप्पा झाल्या आहेत. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून तेथेच अडकून पडले आहेत.

स्पेनच्या वीजपुरवठा कंपनीनं यामागचं कारण सांगताना म्हटलं की, संपूर्ण देशातील वीज खंडित झाली आहे. या ब्लॅकआऊटमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.

या ब्लॅकआऊटमागे सायबर हल्ल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. मात्र, युरोपियन काउन्सिल प्रेसिडेंट यांनी अशाप्रकारच्या कुठल्याही सायबर हल्ल्याचं संकेत नसल्याचं सांगितलं.

पोर्तुगालमध्ये अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्यानं पुरता गोंधळ उडालाय. अनेक शहरांमधील मेट्रो, रेल्वे सेवा बंद पडल्या आहेत. रस्त्यांवरील वीजदिवेही बंद पडून सर्वत्र अंधार पसरला, असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलीय.

इतक्या मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले असून हा सायबर हल्ला तर नाही ना अशी शंकादेखील व्यक्त केली जात आहे.

‘सायबर हल्ला नाही, पोर्तुगालनं सायबर हल्ल्याचं कारण नाकारलं’

पोर्तुगाल आणि स्पेनमधील वीजपुरवठा खंडित होण्यामागे कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याचे संकेत नसल्याचं पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांनी सांगितलं.

स्पेनच्या माद्रिदमध्ये रेल्वे सेवा थांबल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होण्याची वाट पाहणारे प्रवासी

फोटो स्रोत, Reuters

तर, वीजपुरवठा कंपनी रेड इलेक्ट्रिकानं त्यांच्या एक्सवरील सोशल मीडिया अकाउंटवर माहिती देताना म्हटलं की, “ही समस्या तातडीने सोडवण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहे”, असं सांगितलं.

पोर्तुगालमधील लिस्बनमध्ये पेट्रोल पंपावर झालेली वाहनांची गर्दी

फोटो स्रोत, EPA

युक्रेनच्या उर्जामंत्र्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी करण्यात मदत करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

लिस्बनमधील विमानतळाबाहेर अडकलेले नागरिक

फोटो स्रोत, EPA

दरम्यान, स्पेनमध्ये होणारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा देखील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे थांबवण्यात आली आहे. एकीकडे वीजपुरवठा खंडित झाल्यानं सामान्य नागरिकांचे हाल असून सेवा पूर्ववत कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वीजपुरवठा पूर्ववत होण्यास लागू शकतो आठवडा

पोर्तुगाल येथील वीज कंपनी रेड इलेक्ट्रिका नॅशनल (आरईएन) नं खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो अशी माहिती दिली.

यापूर्वी, स्पेनच्या वीज विभागानंही वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सहा ते दहा तास लागू शकतात, असा अंदाज वर्तवला होता.

या ब्लॅकआउटमागील कारण सांगताना आरईएननं स्पेनमधील तापमाना झालेल्या तीव्र बदलांमुळे हे संकट उद्भवल्याचं म्हटलं आहे. मात्र, स्पॅनिश सरकारकडून अद्याप यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

लिस्बनमधील विमानतळाबाहेर अडकलेले नागरिक

फोटो स्रोत, EPA

दरम्यान, स्पेन आणि पोर्तुगालमधील ब्लॅकआउटच्या घटनेनं नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचं चित्र आहे. मोबाईल सेवा, एटीएम, घरगुती कामासाठीचे इलेक्ट्रॉनिक उकरणंही बंद झाल्यानं काय करावं अन् काय नाही, अशी स्थिती उत्पन्न झालीय.

स्पेनची रेल्वे कंपनी रेनफेनं, वीज संकटामुळे त्यांच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या असल्याचं सांगितलंय. तर, मद्रिद मेट्रोकडूनही त्यांच्या सर्व लाइन बंद असल्यांची माहिती दिली.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, स्पेनमधील माद्रिदच्या महापौरांनी लोकांना शक्य तितका कमी प्रवास करण्याचं (गाडी चालवण्याचे) आवाहन केलं असून आवश्यक नसल्यास तुम्ही आहात तिथेच थांबा असंही त्यांनी म्हटलंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC