Home LATEST NEWS ताजी बातमी ‘हा माझा हलाल लुक आहे’; हिजाबमधील या क्रिएटरला पाहून ‘ओडिसी’, ‘स्पायडरमॅन’ची अभिनेत्रीही...

‘हा माझा हलाल लुक आहे’; हिजाबमधील या क्रिएटरला पाहून ‘ओडिसी’, ‘स्पायडरमॅन’ची अभिनेत्रीही थक्क

6
0

Source :- BBC INDIA NEWS

झैनब यांच्या पोशाखावर झेंडाया यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ टिकटॉकवर जवळपास दोन कोटी व्ह्यूज मिळवून गेला आहे.

फोटो स्रोत, Zainab Jiwa

“मला याची झिपच बंद करता येत नाहीये!”

29 वर्षीय झैनब जीवा टिकटॉकसाठी ‘गेट रेडी विथ मी’ व्हीडिओ बनवत होती. कॉर्सेट घालताना तिने हे वाक्य म्हटलं. घरात बसून असे व्हिडिओ पाहणाऱ्या 20 ते 25 वयोगटातील अनेक तरुणांना हा प्रसंग ओळखीचा वाटू शकतो.

डिजिटल क्रिएटर झैनब नुकत्याच लंडनमध्ये झालेल्या ‘द ओडिसी’ या चित्रपटाच्या प्रीमियरला जाण्याच्या तयारीत होती.

दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलानचा हा चित्रपट या वर्षातील हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे.

झैनबला या प्रीमियरसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तिने, हॉलिवुडची सुपरस्टार झेंडायाचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्यामागचं कारण होतं तिने घातलेला आकर्षक पोशाख.

तिने हुड असलेला एक सोनेरी गाऊन आणि हिजाब घातला होता.

झेंडायाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

“ती तिथून जात होती आणि तिची नजर माझ्यावर पडली. मला बघून ती आणि तिला बघून मी दोघेही आवाक झालो होतो,” असं झैनब म्हणाली.

“काही क्षण आमच्या दोघांच्याही नजरा एकमेकींकडे होत्या. त्यानंतर ती म्हणाल्या, ‘ओ माय गॉड, अमेझिंग, अमेझिंग!’ आणि मग ती तिथून निघून गेली,” असं झैनबने सांगितलं.

ती पुढे म्हणाली की, “मला अजूनही याचा धक्का बसलेला आहे. झेंडायाने माझ्या पोशाखाकडे लक्ष दिलं, याचा विचार करूनच मला आश्चर्य वाटलं.”

झैनब जीवा यांनी ‘विकेड: फॉर गुड’, ‘हाउस ऑफ द ड्रॅगन’च्या तिसऱ्या सीझन आणि ‘विकेड: पार्ट वन’च्या प्रीमियरला हजेरी लावली.

फोटो स्रोत, Dave Benett-WireImage/Getty Images/HBO Max UK

झैनबनी हा प्रसंग सांगणारा व्हीडिओ टिकटॉकवर पोस्ट केला. तो व्हायरल झाला असून त्याला जवळपास दोन कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. व्हीडिओ व्हायरल झाल्यापासून तिला सतत फोन येत आहेत.

झेंडायाने हाय-फॅशनमधील ‘मेथड ड्रेसिंग’च्या माध्यमातून रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पद्धतीत कलाकार चित्रपटाच्या विषयाला किंवा थीमला साजेसा पोशाख निवडतात.

पण झैनबने हे दाखवून दिलं की, तिच्यासारखं स्वतंत्रपणे काम करणारी क्रिएटर देखील हॉलिवुडच्या कलाकारांना आपल्या पद्धतीने टक्कर देऊ शकते.

झैनब मुस्लीम आहे आणि ती हिजाब घालते.

ती अनेकदा चित्रपटांच्या प्रीमियरला पारंपरिक कपडे घालते आणि केस झाकून ठेवते. मात्र, या ‘शालीन पोशाखाला’ही ट्रेंडमध्ये आणण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्यात मजा येते, असं ती सांगते.

“तुम्ही स्वतःला पूर्णपणे झाकलं असलं तरीही तुमचा पोशाख त्या कार्यक्रमाच्या थीमला साजेसा करता येतो.”

या आठवड्यात बीबीसीच्या ब्रॉडकास्टिंग हाऊसमध्ये मुलाखतीसाठी आली तेव्हा तिने ऑलिव्ह रंगाचा शर्ट, टाय आणि ब्रोच घातला होता.

“आज मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे,” असं तिने सांगितलं.

झैनब स्वतःला फॅशनची ‘क्रेझी फॅन’ मानते. तिला फॅशनची आवड कधीपासून आहे, असं विचारलं असता ती सांगते, “जन्मापासूनच.”

चित्रपटांबद्दलही तिला तितकीच आवड आहे. मात्र, सुरुवातीला हा तिचा केवळ छंद होता.

ती मनोरंजनासाठी सोशल मीडियावर तिच्या आवडत्या चित्रपटांचे आणि त्या चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या पोशाखांचे व्हिडिओ पोस्ट करत असे.

ती हे करत असताना मोठ्या स्टुडिओंचं तिच्याकडे लक्ष गेलं. डिस्नेने सर्वात आधी तिला ‘मून नाइट’ या सीरिजसाठी मुलाखतीची संधी दिली. यात तिला कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली.

तो प्रसंग सांगताना ती सांगते, “मला वाटलं कुणीतरी मला फसवतंयच.”

तिने पुढे सांगितलं, “मी तो व्हीडिओ पुन्हा पाहूही शकत नाही. मी अजिबात चांगलं काम केलं नव्हतं.”

झैनब जीवा 29 जुलै 2026, बुधवारी इंग्लंडमधील लंडन येथील ओडियन लक्स, लीसेस्टर स्क्वेअरमध्ये झालेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या यूके प्रीमियरला उपस्थित राहिल्या.

फोटो स्रोत, Jeff Spicer/ Getty Images for Sony Pictures

आज झैनब पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर आणि प्रेझेंटर म्हणून काम करते. ती डेन्झेल वॉशिंग्टन, पॉल मेस्कल, टॉम हिडल्स्टन आणि झेंडाया यांसारख्या कलाकारांच्या मुलाखती घेते.

त्याचवेळी व्हीडिओच्या माध्यमातून विविध चित्रपटांचे तिच्या खास पद्धतीने कौतुकही करते.

ती नेहमी डोक्यापासून पायापर्यंत झाकणारे पोशाख परिधान करते.

रेड कार्पेटवर दिसणाऱ्या अनेक डिजिटल कंटेंट क्रिएटर्सपैकी झैनब एक आहेत. त्यात ‘चिकन शॉप डेट’च्या अमेलिया डिमोल्डनबर्ग, रीस फेल्डमन आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व जेक शेन यांचाही समावेश आहे.

हे काम नेहमी सोपं नसतं.

कधी कधी झैनबला चित्रपटाच्या प्रीमियरचं आमंत्रण कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच मिळतं. त्यामुळे कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पोशाख तयार करण्यासाठी तिची धावपळ उडते.

प्रीमियरच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणं हेही तिच्यासाठी वेगळं आव्हान असतं.

“अनेकदा मी खूपच विचित्र दिसत असते,” ती सांगते.

झैनब अनेक डिझायनर्स आणि ब्रँड्ससोबत काम करतात. मात्र, कपडे आणि पोशाख पुन्हा वापरून खर्च नियंत्रणात ठेवत असल्याचं ती सांगते.

त्या अनेकदा हटके पोशाख घालतात. त्यामुळे कलाकारांमध्ये सहज मिसळणं त्यांना सोपं जातं.

‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’च्या दुसऱ्या सीझनसाठी तिने एका विद्यार्थी डिझायनरने तयार केलेला लाल गाऊन घातला होता. त्या गाऊनवर हिजाब घातलेल्या तीन महिलांचे चेहरे होते.

“मी थोडी जास्त उत्साही आहे. पण मी जे काही करते, त्यात माझ्या संस्कृतीचा समावेश करायला मला आवडतो,” ती सांगते.

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’साठी तिने कोळ्याच्या जाळ्यासारख्या डिझाइनची मेहंदी लावून आपला लुक खास बनवला होता.

‘ग्लॅडिएटर 2’ साठी त्यांनी गोल्डन शिल्ड परिधान केलं होतं.

झैनब जीवा 13 नोव्हेंबर 2024रोजी इंग्लंडमधील लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअर येथे झालेल्या 'ग्लॅडिएटर 2'च्या रॉयल फिल्म स्क्रिनिंग आणि जागतिक प्रीमियरला उपस्थित राहिल्या.

फोटो स्रोत, Simon Ackerman/FilmMagic

शालीन कपडे घातल्यामुळे या क्षेत्रात यश मिळवणं कठीण जाईल, अशी भीती आपल्याला सुरुवातीला वाटत होती, असं ती मान्य करते. मात्र, आता तिला यात मजाही येते.

“मी माझे केस किंवा हात झाकून ठेवते, यात मला खूप मजा येते. मी याला ‘हलाल लुक’ म्हणेन.”

“मला हा भाग सर्वात जास्त आवडतो. कारण यामुळे हे दिसून येतं की, इथे खरंतर कोणतीही बंधनं नाहीत.”

हॉलिवूडच्या झगमगाटापासून घरचं आयुष्य वेगळं

झैनब आपला बराचसा वेळ हॉलिवुडच्या कलाकारांसोबत घालवत असली, तरी वायव्य लंडनमधील हॅरो इथलं त्यांचं घरचं आयुष्य यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे.

“माझं घर पूर्णपणे अस्ताव्यस्त असतं. सामान ठेवण्यासाठी जागाच कमी आहे. त्यामुळे कपडे अनेकदा कुठेही कोंबून ठेवते,” ती सांगते.

तिच्याकडे एक मांजर आहे.

तिचे भाऊ-बहिणीही अनेकदा तिला भेटायला येतात. कपड्याबाबत काही अडचण तयारच झाली तर तिचे आई-वडील देखील तिच्या मदतीला धावून येतात.

झैनब सांगते की, त्यांच्या आई-वडिलांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला आहे.

झैनब जीवा

फोटो स्रोत, Walt Disney Ltd/BAFTA/Paramount Pictures/WireImage via Getty Images

झैनबचे टिकटॉकवर 6 लाख 60 हजार, तर इन्स्टाग्रामवर जवळपास 4 लाख फॉलोअर्स आहेत.

ती या क्षेत्रातील एक प्रमुख कंटेंट क्रिएटर बनत आहे. मात्र, तिला प्रसंगी टीकेलाही सामोरं जावं लागतं.

‘तिचे पोशाख शालीन नाहीत’, अशी टीका काही जण करतात.

“या क्षेत्रात काम करताना नेहमीच टीकेला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते,” असं ती सांगते.

मात्र पुढे ती म्हणते, “प्रत्येक नकारात्मक कमेंटच्या बदल्यात खूप साऱ्या सकारात्मक कमेंट्सही असतात. माझ्यापासून लोकांना प्रेरणा मिळत असेल, तर बाकीच्या गोष्टींची मला चिंता नाही.”

सध्या तरी झैनब हॉलिवुडमध्ये सुरू असलेल्या ब्लॉकबस्टर्सच्या मालिकांचा आनंद घेत आहे.

‘चित्रपटांसाठी हा सीझन चांगला ठरला, मी याबाबत खूपच एक्सायटेड आहे’, असं ती सांगते.

आणि आणखी अनेक खास चित्रपट येत आहेत. ड्यून येतोय ( यात देखील झेंडाया प्रमुख भूमिकेत दिसेल) डूम्सडे येतोय असं ती सांगते.

ती सांगते, मला टीव्ही आणि चित्रपट आवडतात. मला वाटतं समाजाला एकत्र बांधून ठेवणारी हे एक आनंददायी माध्यम आहे.

“मी फक्त एकच गोष्ट शेवटीला म्हणेल की मी तर केवळ एक फॅन आहे, केवळ एक फॅन.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC