Home LATEST NEWS ताजी बातमी काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’ सुरू असताना नक्की काय घडलं? जयराम रमेश यांनी...

काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’ सुरू असताना नक्की काय घडलं? जयराम रमेश यांनी दिलं असं स्पष्टीकरण

5
0

Source :- BBC INDIA NEWS

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान.

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित समारंभास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत.

गेल्या वेळीही या दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. भाजपने या कृतीला स्वातंत्र्यदिनाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, “त्यांना प्रत्येक गोष्टीत अपमानच दिसतो. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात किंवा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही, त्यांनाच याचा राग येतो किंवा ते दुखावलेले वाटतात.”

दरम्यान, दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभात ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत पूर्णपणे वाजवण्यात आलं. यावेळी, थोड्या कालावधीनंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असहजता निर्माण झालेली दिसून आली.

वास्तविकत:, आतापर्यंत ‘वंदे मातरम्’ची केवळ दोनच कडवी गायली जात असत. मात्र, पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारने ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण रूपाला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा कायदेशीर दर्जा दिला आहे.

1937 मध्ये, जेव्हा जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याबाबत रवींद्रनाथ टागोर यांचा सल्ला घेतला होता, तेव्हा टागोर यांनी असं म्हटलं होतं की, एकेश्वरवादावर विश्वास असणाऱ्या जसे की, मुस्लीम वा ब्राह्मो समाजाच्या अनुयायांना या गीताच्या पुढील कडव्यांवर आक्षेप असू शकतो. कारण त्यांत दुर्गा देवीचं आवाहन करण्यात आलं आहे.

त्यांनी नेहरूंना सल्ला दिला होता की, केवळ पहिली दोन कडवीच राष्ट्रीय गीत म्हणून कायम ठेवावीत, कारण त्यांत मातृभूमीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यात आलं आहे.

'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्याच्या काही वेळानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये असहजता दिसून आली. 'वंदे मातरम'च्या पहिल्या दोन कडव्यांपर्यंत सर्व काही ठीक होतं, परंतु त्यानंतर मात्र काहीतरी बोलणं सुरू असल्याचं दिसून आलं.

फोटो स्रोत, ANI

आतापर्यंत काँग्रेसनंही याच धोरणाचं पालन केलं होतं.

काँग्रेसच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे पूर्ण गीत वाजवलं जात असल्याचा व्हीडिओ पुन्हा शेअर करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी लिहिलंय की, “‘वंदे मातरम’ गीत पूर्ण वाजवल्यामुळे मायलेकांची जोडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष नाराज झाल्याचे दिसताहेत. काही मानसिकतेत कधीच बदल होत नाही.”

दरम्यान, या मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, “ऑक्टोबर 1937 मध्ये कलकत्त्यामध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात, गांधीजींसह सर्व प्रमुख नेत्यांनी असा निर्णय घेतला होता की काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायलं जाईल. हे राष्ट्रीय गीत आहे.”

तरीही, ‘वंदे मातरम्’चे केवळ दोनच कडवे या स्वरूपात स्वीकारण्यात आले होते.

काँग्रेस हेडक्वार्टरमध्ये काय झालं?

काँग्रेस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभास काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्याच्या काही वेळानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये असहजता दिसून आली.

‘वंदे मातरम’च्या पहिल्या दोन कडव्यांपर्यंत सर्व काही ठीक होतं, परंतु त्यानंतर मात्र काहीशी असहजता स्पष्टपणे दिसून आली.

काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीची साधारण 55 सेकंद राष्ट्रगीत गायलं, परंतु त्यानंतरही ते वाजत राहिल्यावर काहीशी असहजता दिसली. गाणं वाजत राहिलं आणि हे ज्येष्ठ काँग्रेस नेते शांत झाले.

वंदे मातरमच्या वेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी.

फोटो स्रोत, @kharge

या कार्यक्रमाच्या दृश्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांच्यात संवाद होत असल्याचं दिसून येतं.

सोनिया गांधी काहीशा असहज झाल्यासारख्या वाटत होत्या आणि त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी काही बातचित केली. त्यानंतर, या दोन्ही नेत्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला बोलावून त्याच्याशी संवाद साधला.

दरम्यान, सोनिया गांधी मान डोलावताना दिसल्या. राष्ट्रगीत सुमारे तीन मिनिटे चाललं. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं आणि ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे ध्वजगीत गायलं गेलं.

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित अधिकृत समारंभात, 80 वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘जन गण मन’ या या राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायलं गेलं.

जयराम रमेश काय म्हणाले?

अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात वंदे मातरम् सुरू असताना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे एकमेकांशी काहीतरी बोलले होते. यांच्यात काही तरी बोलणं झालं, त्याबाबत पत्रकारांनी जयराम रमेश यांना प्रश्न विचारले.

त्यावर जयराम रमेश म्हणाले , “संपूर्ण वंदे मातरम् गायले गेले. यात वादाचा प्रश्नच उद्भवत नाही. ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. काँग्रेस अध्यक्ष (मल्लिकार्जुन खर्गे) बराच वेळ उभे होते, म्हणून सोनियाजी त्यांच्यासाठी खुर्ची आणायला सांगत होत्या. बस्स एवढंच.”

तसंच 1937 मध्ये काँग्रेस अधिवेशनात रविंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार वंदे मातरम् गीताच्या काही ओळी गाण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून काँग्रेसनं तेवढ्याच ओळी गायला सुरू केली आणि तेव्हापासून त्याच ओळी गायल्या जातात असं ते म्हणाले.

केरळमध्ये ते गायलं जात नाही, असं पत्रकारांनी विचारलं असता, त्यांनी या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. स्वातंत्र्यदिनानिमित्त मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हे संपूर्ण गीत गायले गेले.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी.

फोटो स्रोत, ANI

कार्यक्रमात वंदे मातरमच्या बाबतीत काही तरी स्पष्टता नाही असं दिसत होतं. तर जयराम रमेश यांच्या मते ते पूर्ण गाण्यात काहीच गैर नाही, तर या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे?

ही घटना त्यांच्या पूर्वी व्यक्त केलेल्या भूमिकेच्या विरोधात आहे. यापूर्वी, केवळ पहिले दोन कडवेच गायले जावेत, असे काँग्रेसचे मत होते. काँग्रेसने संसदेतही हीच भूमिका कायम ठेवली आहे. या घटनेमुळे पक्षाला काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

केरळमध्ये ‘वंदे मातरम’ गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील शाळांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकवण्यास आणि ‘जन गण मन’ गाण्यास सांगण्यात आले.

मात्र, सामान्य शिक्षण विभागानं जारी केलेल्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताचा उल्लेख नव्हता.

सार्वजनिक शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार, संस्थाप्रमुखांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपासून राष्ट्रध्वज फडकवून त्यानंतर राष्ट्रगीत गायले पाहिजे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केवळ ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचा उल्लेख आहे आणि शाळांना ‘वंदे मातरम’ गाण्यास सांगितले नाही.

प्रोटोकॉल अधिकाऱ्याने जारी केलेल्या परिपत्रकाच्या आधारावर ह्या सूचना देण्यात आल्या होत्या. ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन करण्यासंदर्भात केंद्राने दिलेल्या निर्देशांवरून राजकीय वाद सुरू असतानाच हा आदेश आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC