Home LATEST NEWS ताजी बातमी डान्स केल्यानं मेंदूला होऊ शकतात हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

डान्स केल्यानं मेंदूला होऊ शकतात हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

6
0

Source :- BBC INDIA NEWS

डान्स केल्यानं मेंदूला होऊ शकतात हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

आपला मेंदू मोठा, तल्लख आणि आणखी शक्तिशाली बनवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक चांगला मार्ग म्हणजे, डान्स म्हणजेच नृत्य करणे.

मेंदूची शक्ती आणखी वाढवण्यासाठी डान्स हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामध्ये संपूर्ण शरिराचा वापर तर होतच असतो, पण त्याचबरोबर मेंदूचा बहुतांश भागही सक्रिय होतो.

एकाच वेळी जॉगिंग आणि सुडोकू खेळण्यासारखा हा प्रकार आहे. नृत्यामुळं मेंदूत होणारे बदल आणि त्याची वाढणारी शक्ती याचे चार मार्ग याठिकाणी देत आहोत.

डान्स करणं हे नक्कीचं मेहनतीचं काम आहे. सातत्यानं डान्स करण्याची प्रेरणा मिळणं हे तर त्याहूनही आणखी कठिण काम आहे.

पण, डान्स हा इतर कोणत्याही व्यायामापेक्षा मेंदूसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

डॉ. चेन हे एक प्रोफेशनल डान्सर राहिलेले आहेत. त्यांनी यामागचं कारण सांगितलं.

त्यांच्या मते, “आपण फक्त स्नायूंचा व्यायाम करत असू, म्हणजे फक्त ट्रेडमिलवर धावणं किंवा वजन उचलणं, तर कालांतराने ती फक्त एक यांत्रिक मसल मेमरी बनते. म्हणजे त्याद्वारे मेंदूला तितकंसं आव्हान दिलं जात नाही.”

डान्स करताना, आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांचा सतत वापर होत असतो. ज्याप्रमाणं शरीर सुडौल करण्यासाठी व्यायाम केला जातो, तसाच आपल्याला मनालाही आकार देता येऊ शकतो. यात संपूर्ण जीवन बदलण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रचंड क्षमता असते. त्याला याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. शिवाय डान्स हा मेंदूसाठी उत्तम व्यायामही आहे.

डान्स करण्याचे फायदे कोणते?

डान्समुळं ग्रे मॅटर आणि व्हाइट मॅटर या दोन्हींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच न्यूरॉन्स मोठे आणि अधिक कार्यक्षम होतात.

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, मेंदू न्यूरॉन्स नावाच्या पेशींनी बनलेला असतो. या पेशी मिळून मेंदूचे टिश्यू (ऊती) तयार करतात. प्रत्येक न्यूरॉनला एक टर्मिनल न्यूक्लियस असतो. ते त्याचे नियंत्रण केंद्र असते. न्यूरॉन्स मिळून मेंदूच्या बाहेरील थरात ग्रे मॅटर तयार करतात. तिथेच माहिती स्वीकारली जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. न्यूरॉनची शेपटी, म्हणजेच ॲक्सॉन, हा व्हाइट मॅटर असतो.

ही मुख्य जोडणारी ऊती असते आणि ती मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमधून शरीराच्या उर्वरित भागांपर्यंत संदेश पोहोचवते. नृत्यामुळं मेंदूच्या या ऊतींमध्ये वाढ होऊ शकते. नियमित व्यायामामुळं मेंदू अधिक कार्यक्षम आणि मजबूत होतो, असंही शास्त्रज्ञांना आढळलं आहे.

डान्स केल्यानं मेंदूला होऊ शकतात हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images

डान्स किंवा सर्वसाधारणपणे व्यायाम करताना शरीरात ‘ब्रेन-डिराइव्ह्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर’ नावाचा एक हार्मोन तयार होत असतो. हा हार्मोन मेंदूच्या पेशींसाठी खताप्रमाणे काम करतो. त्यामुळं या पेशींची वाढ आणि विकास होण्यास मदत होते. तसंच न्यूरोप्लास्टिसिटीमध्येही त्याची मदत होते.

मानवी मेंदू अशा अंदाजे 86 अब्ज पेशींनी बनलेला असतो. काय कृती होत आहे, यानुसार प्रत्येक न्यूरॉन एका सेकंदात 1 ते 200 वेळा संकेत पाठवू शकतो.

हे न्यूरल मेसेज इलेक्ट्रिकल पल्ससारखे असतात. पापणी लवण्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने ते प्रवास करतात. नृत्यामुळे नेमके याच संदेशांचं वहन सुधारतं, असं दिसून आलं आहे.

जेव्हा डान्सर डान्स करत असताना वेगवेगळ्या टोप्यांचा (कॅप्स) वापर करून डॉ. ज्युलिया बेसल या त्यांच्या मेंदूतील हालचालींचे प्रत्यक्ष मोजमाप करतात. त्यात त्यांना हे आढळलं आहे.

त्यांच्या मते, आपण आजूबाजूला कोणाला नाचताना पाहिलं तेव्हाही मेंदूच्या एका भागातून दुसऱ्या भागात माहितीचा प्रवाह वाढू शकतो आणि यामुळं माहिती समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास, विचार करण्याची क्षमता सुधारण्यास आणि भावनिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवतो, त्यामुळं जर चेतापेशी (न्यूरॉन्स) अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू लागल्या, तर त्याचा परिणाम शरिराच्या प्रत्येक कृतीवर होऊ शकतो.

त्यामुळं समन्वय सुधारतो. संभाषण आणि बोलण्याद्वारे इतरांना प्रतिसाद देण्याची आपली क्षमता सुधारते. एवढंच नाही, तर यामुळं गणिताच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची किंवा समस्या सोडवण्याची आपली क्षमतासुद्धा सुधारते.

डान्स करण्यात आनंद का वाटतो?

शाळा किंवा कॉलेजचा वर्ग असो, क्लब असो, सोशल मिडिया असो किंवा कुणी पाहत नसलं तरीही नाचताना एक खास प्रकारची मजा येत असते.

त्याचं कारण म्हणजे, यामुळं मेंदूमधून हार्मोन्सच्या अशा आनंदी मिश्रणाचा स्त्राव होतो ज्यामुळं आपला मूड चांगला होतो.

कदाचित या हार्मोन्सबद्दल तुम्ही ऐकले असेल. एंडोर्फिन – शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक, तसेच डोपामाइन आणि सेरोटोनिन, हे दोन्ही नैसर्गिकरित्या मनःस्थिती सुधारणारे हार्मोन्स आहेत.

इतर लोकांसोबत नाचताना शरीरात ऑक्सिटोसिनचा स्त्राव होतो. त्याला बाँडिंग हार्मोन म्हणतात. नाचण्यासारखी एखादी क्रिया जेवढी जास्त वेळ केली जाते, तेवढाच मेंदू ते पुन्हा करण्यासाठी उत्सुक होतो आणि त्याला त्याची ओढ लागते.

जेवढा जास्त डान्स करण्यात आपण सहभागी होतो तेव्हा त्याचा या न्यूरोकेमिकल्ससी संपर्क येतो. त्यामुळं जास्तीत जास्त वेळा असा आनंद मिळवावा वाटतो.

त्यामुळंच लोक पुन्हा पुन्हा डान्स फ्लोअरवर परत येतात. आपल्या मोठ्या, तल्लख मेंदूचा प्रभाव कदाचित लगेच दिसणार नाही, पण जसजसं वय वाढेल, तसतसा तो प्रभाव महत्त्वाचा ठरू शकतो.

जसजसं आपलं वय वाढतं, तसतसे न्यूरॉन नैसर्गिकरित्या नष्ट होतात. त्यामुळं पार्किन्सन्स आणि अल्झायमरसारखे आजार होऊ शकतात.

सेव्हिंग अकाऊंट

पार्किन्सन्स आणि अल्झायमरसारख्या आजारांवर कोणताही उपचार नाही. ते फक्त टाळता येतात. आणि टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे न्यूरलचा किंवा चेतासंस्थेचा साठा तयार करणे.

याची तुलना बचत खात्याशी करता येईल. काहीतरी नवीन शिकणे, एखादी खूप अवघड गोष्ट करणे किंवा नृत्य करणे बँकेच्या बचत खात्यात पैसे जमा करण्यासारखे आहे.

तुमच्याकडं फक्त 100 डॉलर असतील आणि एखादं मोठं संकट आलं तर कदाचित तुम्ही कर्जात बुडून जाल. पण जर तुमच्याकडं दहा लाख डॉलर असले तर. कॉग्निटिव्ह रिझर्व्हचा अर्थ तसाच आहे.

तुमचा कॉग्निटिव्ह रिझर्व्ह किंवा ही क्षमता चांगली असेल, तर तुमच्याकडे भरपूर ‘पैसे’ (म्हणजेच, चेतासंस्थेची राखीव क्षमता) आहे असं समजा.

डान्स केल्यानं मेंदूला होऊ शकतात हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images

अनेक न्यूरॉन्स असण्याचा अर्थ म्हणजे, तुमच्याकडे संदेश पाठवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळं मृत झालेल्या न्यूरॉन्सला बायपास करण्यासाठी तुम्ही इतर मार्गांचा वापर करू शकता.

इतर लोकांकडं कदाचित हे मार्ग उपलब्ध नसतील. पण तुमच्याकडे असेल, कारण तुम्ही वर्षानुवर्षे ते जोपासले असतील. डान्समुळं नेमकं हेच घडतं, याचे वैज्ञानिक पुरावे आहेत.

संशोधकांनी विविध मनोरंजनात्मक उपक्रम आणि स्मृतिभ्रंशाचा धोका यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला. त्यात पोहणे, चालणे किंवा घरगुती कामं यांसारख्या 11 प्रकारच्या शारीरिक क्रियांच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यात स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होण्याशी संबंधित असलेला डान्स हा एकमेव उपक्रम आढळला.

वाढत्या वयानुसार मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि डान्समुळं ते टाळता येऊ शकतं. यामुळं विचारशक्ती वाढते, मेंदूचं आरोग्य सुधारतं, न्यूरॉन्सची संख्या वाढते आणि न्यूरोट्रान्समीटरना चालना मिळते. वाढत्या वयानुसार ते कमी होण्याची शक्यता असते. शिवाय, कोणत्याही वयात नृत्य सुरू करणे फायदेशीर आहे, कारण न्यूरॉन्सची लवचिकता आयुष्यभर टिकून राहते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC