Home LATEST NEWS ताजी बातमी फ्लायदुबई विमान प्रकरण : ‘सहभाग आढळला तर इराणला मोठा फटका बसणार’ ट्रम्प...

फ्लायदुबई विमान प्रकरण : ‘सहभाग आढळला तर इराणला मोठा फटका बसणार’ ट्रम्प यांचा इशारा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

डोनाल्ड ट्रम्प

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

फ्लायदुबई विमानात वैमानिकावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यास इराणवर “अत्यंत घातक हल्ला” केला जाईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी सांगितलं की, विमानाचा कथितपणे अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाचे इराणशी संबंध असू शकतात.

मात्र, ही माहिती आपण “जे ऐकत आहोत त्याच्या आधारे” सांगत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

ट्रम्प म्हणाले, “आम्ही सध्या या प्रकरणावर काम करत आहोत. ते आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात माहिती शेअर करत आहेत. मी जे ऐकत आहे त्याच्या आधारे माझं उत्तर ‘होय’ असंच असेल.”

इराण दोषी आढळल्यास अमेरिका प्रत्युत्तरात्मक कारवाई करेल का, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता ट्रम्प म्हणाले, “इराणला मोठा फटका बसणार आहे.”

इस्रायलमधील तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळावर 30 सप्टेंबर 2026 रोजी, कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये प्रवाशांचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केले.

‘फ्लायदुबई’चं FZ1073 विमान दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जात असताना अवघ्या दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात 17 हजार फूट (सुमारे 5,200 मीटर) खाली आलं.

त्यानंतर विमान सौदी अरेबियाकडे वळवण्यात आलं आणि तिथं उतरवण्यात आलं. विमानात नेमकं काय घडलं, हे त्या क्षणी तरी नीटसं कळलं नाही. मात्र, विमान उतरल्यानंतर प्रवाशांनी आतील घटनांचं वर्णन केलं.

एका प्रवाशानं सांगितलं की, संपूर्ण विमानात भयानक किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यानंतर तीन ते पाच जणांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला ताब्यात घेतलं.

दुसऱ्या एका प्रवाशानं सांगितलं की, त्यांनी चाकू घेऊन हल्ला करणाऱ्या हल्लेखोराकडून विमानाचा ताबा घेतला. दरम्यान, मागच्या बाजूला असलेले इतर दोन वैमानिक पुढे आले आणि त्यांनी विमान सुखरूपपणे लँड करण्याची जबाबदारी स्वीकारली.

इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.

तिथं ‘फ्लायदुबई’च्या विमानातून परतलेल्या प्रवाशांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती.

लोकांनी इस्रायली झेंडे फडकवले आणि टर्मिनलमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचं उत्साहानं स्वागत केलं.

‘हे रक्त त्याचं आहे का?’

विमानात घडलेल्या घटनेबद्दल प्रवाशांनी अनेक हृदयद्रावक गोष्टी सांगितल्या आहेत.

‘बीबीसी न्यूजनाइट’शी बोलताना, विमानातच असलेल्या अल्मोग इटाली यांनी विमानाच्या वेगानं खाली उतरण्याच्या अनुभवाची तुलना रोलरकोस्टर राईडच्या अनुभवाशी केली.

“अचानक विमान रोलरकोस्टरप्रमाणे खूप वेगानं खाली पडू लागलं होतं, जणू काही त्यावर प्रचंड ‘जी-फोर्स’चा परिणाम होत होता,” असं इटालीनं सांगितलं.

त्यांनी म्हटलं की, “विमान 20 ते 30 सेकंद वेगानं खाली पडत होतं. यानंतर विमान काही काळासाठी पुन्हा स्थिर झालं आणि मग पुन्हा खाली पडू लागलं.”

केबिनच्या आतून व्हीडिओ रेकॉर्ड करणारे आणि पायलटला आवर घालण्यास मदत करणारे आसाफ रेगाविम, 30 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलमधील त्साफ्रिया येथील बेन गुरियन विमानतळावर पत्रकारांशी बोलताना.

जेव्हा विमान दुसऱ्यांदा खाली येऊ लागलं, तेव्हा त्यांनी काही लोकांना ‘कॉकपिटच्या दिशेनं धावताना’ पाहिलं.

“एका पायलटनं दुसऱ्याला थांबवलं आणि काही प्रवासी व क्रू सदस्यांनी त्याच्यावर मात करून त्याला खाली पाडलं, असं वाटतंय,” असं ते म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटलं की, “फक्त तीन-चार प्रवासी जे पायलटला ताब्यात घेत होते, ते जखमी झाले. त्यामुळेच, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसल्या असतील. पण इतर प्रवासी जखमी झाले नाहीत. त्या तीन-चार अत्यंत धाडसी लोकांनाही फक्त किरकोळ जखमा झाल्या आहेत, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.”

“ते खूपच शूर आहेत. त्यांनी अक्षरशः आमचे प्राण वाचवले,” इटाली म्हणाली.

हाइम लाझारोविच नावाच्या आणखी एका प्रवाशानं पत्रकारांना सांगितलं की, “सुदैवानं मी जिवंत आहे. या विमानप्रवासातील सर्वात भीतीदायक क्षण तो होता, जेव्हा पायलटचं विमानावरचं नियंत्रण सुटलं.”

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

SOURCE : BBC