Home LATEST NEWS ताजी बातमी महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील 5 दिवस हवामान...

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील 5 दिवस हवामान कसे असणार

7
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

हवामान खात्यानं आज (14 सप्टेंबर) दुपारी जारी केलेल्या हवामान अंदाजात पुढील 5 दिवस राज्यात पावसाची स्थिती कशी असेल याची माहिती दिली आहे. यानुसार महाराष्ट्रातील 5 ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार, 19 सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

नैऋत्य मोसमी वारे गुजरात प्रदेशात जोरदार, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये सक्रिय, कोकण-गोवामध्ये सक्रिय आणि उर्वरित प्रदेशात सामान्य होते.

गुजरात आणि सौराष्ट्र प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

उत्तर कोकण, गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये बहुतांश ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड्‌यात काही ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

या पार्श्वभूमीवर पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? मुंबई शहर आणि परिसरात पुढील 48 तासांसाठी हवामान कसे असेल? शेतकऱ्यांसाठी पुढील 7 दिवस काय इशारा देण्यात आला आहे? जाणून घेऊयात.

मुंबई शहर आणि परिसरात पुढील 48 तासांसाठी हवामान कसे असेल?

24 तासांसाठी:

आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत 35-45 किमी/तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरींचीही शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

मुंबईतील हवामान अंदाज

फोटो स्रोत, ANI

48 तासांसाठीः

आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

पुढील 5 दिवस कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट?

14 सप्टेंबर

14 सप्टेंबला राज्यात कुठेही रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही. मात्र, 5 ठिकाणी यलो अलर्ट आहे. यात नाशिक घाट, नंदूरबार, पालघर, ठाणे, गडचिरोलीचा समावेश आहे. या सर्व भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीत काही ठिकाणी विजांचा गडगडात अनुभवायला मिळू शकतो.

पुण, पुणे घाट आणि अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट नसला तरी पावसाची शक्यता आहे. पुणे घाटात मध्यम पाऊस आणि पुणे, अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस/मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे.

15 सप्टेंबर

15 सप्टेंबरला राज्यात कुठेही रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट नाही. असं असलं तरीही काही भागांत पावसाचा अंदाज आहे. पालघर व ठाण्यात मध्यम पाऊस, नाशिक घाट व पुणे घाट परिसरात मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज

फोटो स्रोत, IMD

16 सप्टेंबर

16 सप्टेंबरला देखील राज्यात कुठेही रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट नाही. असं असलं तरीही पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात मध्यम पावसाचा, तर काही कोकण व घाट भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

17 सप्टेंबर

17 सप्टेंबरला देखील राज्यात कुठेही रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट नाही. या दिवशी पुणे घाट आणि सातारा घाटात हलका ते मध्यम पाऊस, तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली या भागांमध्ये हलका पाऊस/मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे. नाशिक आणि जळगावमध्ये कोरडे हवामान अपेक्षित आहे.

18 सप्टेंबर

18 सप्टेंबरला देखील राज्यात कुठेही रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट नाही. मात्र, पुणे घाट व सातारा घाट परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि सांगलीमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे. नाशिक व जळगावमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांसाठी पुढील 7 दिवस काय इशारा?

14 सप्टेंबर

उत्तर कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाड्‌यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

15 सप्टेंबर

उत्तर कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाड्‌यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

16 सप्टेंबर

उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी, उतर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

हवामान अंदाज

फोटो स्रोत, IMD

17 सप्टेंबर

उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

18 सप्टेंबर

उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड़ा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

19 सप्टेंबर

उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस/वादळी पावसाची दाट शक्यता आहे.

20 सप्टेंबर

उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा येथील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC