Source :- BBC INDIA NEWS

क्रॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

अभिजीत दिपके आज (6 जून) सकाळी भारतात दाखल झाले. यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तसेच समर्थकांना आवाहन केलं. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी सांगितलं आहे.

यावेळेस अभिजित दिपके म्हणाले, “माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल. या देशात, जेव्हा एखादं मूल या सरकारविरोधात आवाज उठवतं, तेव्हा प्रत्येक आईला अशीच भीती वाटते. आपण या सरकारच्या भीतीमध्ये किती दिवस जगायचं?”

A supporter of the Cockroach Janta Party (CJP) wears a mask as he holds a poster during a protest at the Jantar Mantar, in New Delhi on Saturday. (ANI Photo)

फोटो स्रोत, ANI

‘सीजेपी’ जंतर-मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीपत्रानुसार, त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 6 जूनरोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी देण्यात आली.

 Supporters of the Cockroach Janta Party (CJP) hold posters during a protest at the Jantar Mantar, in New Delhi on Saturday. (ANI Photo)

फोटो स्रोत, ANI

कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत शांततापूर्व आंदोलन करण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं.

Supporters of the Cockroach Janta Party (CJP) take part in the protest at the Jantar Mantar, in New Delhi on Saturday. (ANI Photo/Sumit)

फोटो स्रोत, ANI

सीजेपीचे प्रवक्ते व पत्रकार सौरव दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत म्हटलं, “तुमचे शिक्षणमंत्री अकार्यक्षम आहेत. त्यांच्यामुळं आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे.

अनेक प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. कोट्यवधी मुलं त्रस्त आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदीजी, कृपया धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करून लोकशाहीवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ करा.”

क्रॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, ANI

सीजेपीने एक्सवरील एका ट्वीटमध्ये असंही म्हटलं होतं की, “काय करायचं आणि काय करू नये हे लक्षात ठेवा. सगळ्यांची नजर आपल्यावर आहे.”

Supporters of the Cockroach Janta Party (CJP) hold posters and raise slogans as they take part in the protest at the Jantar Mantar, in New Delhi on Saturday. (ANI Photo/Sumit)

फोटो स्रोत, ANI Photo/Sumit

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) कडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली.

योगेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हीडिओ शेअर केला आहे.

या व्हीडिओत त्यांनी कवी विनोद कुमार शुक्ल यांची कविता वाचत म्हटलं , “मी तुम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, पण तुमच्या भावना, संताप आणि उद्दिष्ट समजतो. कॉक्रोच जनता पार्टी, त्यांचे नेते किंवा तुम्हा सर्वांना मी ओळखत नसलो तरी एकत्र चालण्याचा अर्थ मला कळतो. मी तुम्हा सर्वांना सलाम करतो.”

Cockroach Janta Party (CJP) supporters shout slogans during a protest over alleged irregularities in the country's major examinations, in New Delhi on June 6, 2026. Hundreds of young students gathered in New Delhi on June 6 for the first street protest by the satirical

फोटो स्रोत, AFP via Getty Images

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सीजेपीच्या आंदोलनाला विचारपूर्वक पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितलं आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, “देशात परीक्षा प्रश्नपत्रिका फुटणे, भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी आणि रोज उघड होणारे घोटाळे ही गंभीर समस्या बनली आहे. नैसर्गिक संसाधनांची लूट सुरू असून अर्थव्यवस्था काही मोजक्या उद्योगपतींच्या हाती सोपवली जात आहे.”

 supporter of CJP holds a placard demanding accountability over alleged examination paper leaks during a protest on June 06, 2026 in New Delhi, India. The Cockroach Janta Party (CJP) is a viral, Gen Z-led parody movement founded by political communications strategist Abhijeet Dipke, which uses a cockroach as its mascot to mock political dysfunction. (Photo by Ritesh Shukla/Getty Images)

फोटो स्रोत, Getty Images

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले.

बीबीसीसोबत बोलताना ते म्हणाले, “तरुण मुलांना सगळं समजतं. युवा चिडलेला आहे. त्याच्या मनात जो राग होता, त्याचा उद्रेक झालेला आहे. हे वादळ आणखी किती फोफावतं, हे बघावं लागेल.

या आंदोलनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की, ते दाबणं किंवा त्याचं शमन करणं हे सरकारसाठी फार धोकादायक ठरू शकतं.”

क्रॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, https://x.com/Cockroachisback

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत चर्चेला सुरुवात झाली.

मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं.

आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली. इन्स्टाग्रामवर या पक्षानं 2 कोटींहून जास्त फॉलोअर्सचा टप्पा गाठला.

क्रॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, https://x.com/Cockroachisback

बीबीसी न्यूज मराठीने अभिजीत दिपक यांच्याशी सविस्तर संवाद साधला होता, तेव्हा त्यांनी अशी सोशल मीडिया मोहीम का सुरू केली हे स्पष्ट केले होते.

अभिजीत यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं की, कॉक्रोच पार्टीची ही कल्पना कुठलंही नियोजन करून, खूप विचार करून सुरू केली नव्हती.

त्यांनी सांगितलं, “मी सोशल मीडियावर भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातील वाद वाचला. खरंतर ते वाचून रागही आला पण मग माझ्या मनात एक प्रश्न आला ‘जर सगळे कॉक्रोच एकत्र आले तर?’ मग मी एक्सवर एक पोस्ट केली, ज्यात असं लिहिलं, ‘What if all cockroaches come together?’ आणि तिथून ही गोष्ट सुरू झाली.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC