Source :- BBC INDIA NEWS

‘युवा चिडलेला आहे’; सीजेपी आंदोलनावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया
Published
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
बीबीसीसोबत बोलताना ते म्हणाले, “तरुण मुलांना सगळं समजतं. युवा चिडलेला आहे. त्याच्या मनात जो राग होता, त्याचा उद्रेक झालेला आहे. हे वादळ आणखी किती फोफावतं, हे बघावं लागेल. या आंदोलनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की, ते दाबणं किंवा त्याचं शमन करणं हे सरकारसाठी फार धोकादायक ठरू शकतं.”
“आधीच लोकांचा विश्वास उडाला आहे, तो आणखी उडेल. तसेच, आमच्यासारखे जे सिनिअर्स येथे आले आहेत, त्यावरून असं लक्षात येतं की हे आंदोलन जरी युवकांचं असलं तरी यातून जो प्रश्न निर्माण झालाय तो फक्त युवकांचा नाही तर देशातल्या संपूर्ण नागरिकांचा आहे. म्हणून आम्ही आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहोत.”
सीजेपी हा आम आदमी पार्टीची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला जातोय, त्यावर आपलं मत काय? हे आंदोलन यशस्वीरित्या पुढे जाईल का? या प्रश्नांवरही विजय कुंभार यांनी प्रतिक्रिया दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







