Home LATEST NEWS ताजी बातमी राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टापर्यंत ‘चलो दिल्ली’ मार्च, तर मुंबईत ठाकरे करणार ‘मूक...

राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टापर्यंत ‘चलो दिल्ली’ मार्च, तर मुंबईत ठाकरे करणार ‘मूक निदर्शनं’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

बॅरिकेड

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनांची मालिका आज सोमवारी (12 ऑक्टोबर) सुरुच राहणार आहे. राहुल गांधी यांनी चलो दिल्ली म्हणत सुप्रीम कोर्टापर्यंत मार्च काढणार असल्याचं म्हटलंय.

तरुण, सर्व विरोधी पक्ष, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांनी या मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सायंकाळी तोंडावर काळी फीत बांधून मूक निदर्शन करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये आज होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरही मेट्रो प्रशासनाच्या वतीनं काही ठराविक स्थानकं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

राहुल गांधींनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह, एसआयआर आणि मतचोरीबाबतच्या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना निवेदन देण्यासाठी एक मार्च काढणार असल्याचं म्हटलं आहे.

‘चलो दिल्ली’ म्हणत राहुल गांधींनी या मार्चमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

राहुल गांधी

“काल, देशातील तरुण दिल्लीत शांततापूर्ण आंदोलनासाठी बाहेर पडले. ते मनात प्रेम घेऊन आले होते, द्वेष किंवा राग नाही. त्यांना पोलीस आणि भाजपच्या गुंडांकडून मारहाण झाली. आम्हाला असा भारत नको आहे. उद्या, आम्ही पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्याच्या पलीकडे जाऊन एकजूट होत भारतीय असल्याच्या नात्याने सर्वोच्च न्यायालया पर्यंत मार्च काढत आहोत.

तरुण, सर्व विरोधी पक्ष, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि भारताच्या संविधानाच्या पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्यासोबत चालतील. आम्ही देशाच्या वतीने सरन्यायाधीशांना एक निवेदन सादर करू, त्यात मतचोरी थांबवणं, एसआयआर (SIR) रद्द करणं आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार आहोत,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोभाल आणि मोहन भागवत भारताचा आवाज दाबू शकत नाही. हे भित्रे आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना बाजूला व्हावंच लागेल. आम्ही प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीने एकत्र मोर्चा काढू, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

दिल्ली मेट्रोची ही स्थानके बंद

दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सोमवारीदेखील सहा मेट्रो स्थानकं सुमारे 10 तासांसाठी बंद ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

या स्थानकांवर सकाळी 6 ते सायंकाळी 4 या वेळेत प्रवाशांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असतील, असं DMRC नं सांगितलं आहे.

पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि बाराखंबा रोड ही ती सहा मेट्रो स्थानकं असणार आहेत.

या मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद राहणार आहेत. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेतील आणि आवश्यकतेनुसार नवीन माहिती देतील. पण या सर्व स्थानकांवर मेट्रो एक्सचेंज सुविधा उपलब्ध असणार आहे.

मुंबईत ठाकरेंची मूक निदर्शने

आदित्य ठाकरे पोलिसांच्या वाहनावर चढून विरोध प्रदर्शन करताना

मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनंही सोमवारी सायंकाळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. समाज माध्यमांद्वारे या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

“दडपशाही चालू देणार नाही! लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊया!” असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलं आहे.

दुपारी 4 वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ तोंडावर काळी फित बांधून मूक निदर्शनं करणार असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. त्यासाठी हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

रविवारी काय घडलं?

दरम्यान रविवारी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं होतं. त्यानंतर त्यांना हमीपत्र दिल्यानंतर सोडण्यात आलं. तर ध्रुव राठी याचीही पोलिसांनी सुटका केली होती.

त्यांनंतर अभिजीत दिपके त्यांच्या गावी आजीच्या अंत्यविधीसाठी गेले. तर सीजेपीच्या आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले.

तप दुसरीकडे डाव्या पक्षांची विद्यार्थी संघटना असलेल्या एआयएसएच्या सदस्यांनी अध्यक्ष नेहा बोराच्या नेतृत्वामध्ये पोलिसांना चकवा देत संसद मार्ग परिसरात काही बॅरिकेड्स ओलांडून पुढं जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

आंदोलन

दुसरीकडे मुंबईत रविवारी सीजेपी आंदोलकांसह, शिवसैनिकही रस्त्यावर उतरल्याने दादरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ज्या वाहनात कोंबलं होतं, ती गाडी आदित्य ठाकरेंनी अडवून ठेवली. आदित्य ठाकरेंनी या वाहनावर चढून आपला विरोध दर्शवला.

तर सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या विशेष सुनावणीत कायद्यानुसार थांबवणं अत्यंत गरजेचं असल्याशिवाय मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू राहिल्या पाहिजे असं सांगितलं.

न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात वैयक्तिकरित्या जाण्यापासून कोणालाही रोखलं जाणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.

तसंच आदेशांचे कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती कायदेशीर घडामोडींवर वृत्तांकन करणाऱ्या ‘लाइव्ह लॉ’ या संकेतस्थळाने दिली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC