Home LATEST NEWS ताजी बातमी दिल्लीत आंदोलकांवर हिंदुत्ववादी संघटनांच्या लोकांनी हल्ला केल्याची चर्चा का होतीये?

दिल्लीत आंदोलकांवर हिंदुत्ववादी संघटनांच्या लोकांनी हल्ला केल्याची चर्चा का होतीये?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

दिल्ली आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान शनिवारी आंदोलकांना शिवीगाळ करताना, त्यांच्यावर हल्ले करताना काही ग्रुप्सचे व्हीडिओ समोर आले आहेत. या समूहातील लोक स्वतःची ओळख हिंदुत्ववादी संघटनांचे स्वयंसेवक अशी सांगत आहेत.

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या एका समूहाने आंदोलकाला मारहाण केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओतील व्यक्ती सांगते की त्यांना या समूहाकडून मारहाण करण्यात आली. ती व्यक्ती व्हीडिओत रडताना दिसत आहे. जेव्हा पत्रकाराने या आंदोलकाला विचारले की तुम्हाला पोलिसांनी संरक्षण दिले का त्यावर ‘नाही’ असे उत्तर आंदोलकाकडून आले आहे.

त्या व्यक्तीवर हल्ला करणारे लोक हे ‘आपल्याच संघटने’तील आहेत असा दावा हिंदुत्ववादी संघटना ‘हिंदू रक्षा दला’चे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंदर चौधरी ऊर्फ पिंकी भैय्याने केला आहे.

या व्हीडिओवर पिंकी भैय्याने ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, “झुरळांना (कॉक्रोचेस) वठणीवर आणण्यासाठी हिंदू रक्षा दल सक्षम आहे आणि पुढे देखील आम्ही हे करत राहू.”

ज्या पत्रकार मुलीने या घटनेचं वार्तांकन केलं ती ‘या’ आंदोलकाला ‘छोटी बच्ची’ म्हणताना दिसते.

सोशल मीडियावर जेव्हा या व्हीडिओची चर्चा झाली तेव्हा पोलिसांनी या घटनेची दखल घेत रमन सैनी विवेकानंद उर्फ विवेक, कपिल कुमार, रविंदर सिंह ऊर्फ गोविंद हिंदू यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

कमला मार्केट पोलीस स्टेशन येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला माहिती दिली आहे की या चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

व्हीडिओमधील दृश्य

व्हीडिओत मार खाताना दिसणारी आंदोलक व्यक्ती अल्पवयीन होती की नाही याबाबत पोलीस अधिकाऱ्याकडून पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत आणि पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे असे त्यांनी सांगितले.

भारतीय न्यायसंहितेच्या कलम 126 (शांतता टिकवण्यासाठी घेतलेली हमी), 115 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 130 ( हल्ला) तसेच इतर संबंधित कलमानुसार पोलिसांनी FIR दाखल केली आहे. पुढील तपासानंतर आणखी कलमे लावली जातील असे पोलिसांनी सांगितले.

बीबीसीकडे एफआयआरची कॉपी नाहीये.

हल्लेखोर कोण आहेत?

संबंधित हल्ल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया अकाउंटवरुन तो फिरवण्यात आला आणि संबंधितांची ओळख करुन देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले. भारतीय युवा काँग्रेसने देखील हा व्हीडिओ शेअर केला.

घटनेचा विरोधाभास असा की हल्लेखोरांवर एका बाजूने तीव्र टीका होत असताना या हल्लेखोरानींच समोर येऊन आपली ओळख जाहीर केली.

या घटनेतील आरोपी कपिल कुमार याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हीडिओ पोस्ट करत सांगितले त्याने आणि दुसरा आरोपी रविंदर सिंह याने आम्ही झुरळांचा नीट बंदोबस्त केला अशा शीर्षकाचा व्हीडिओ टाकला.

व्हीडिओत ते म्हणताना दिसतात की आम्ही मोदी आणि दिल्ली पोलिसांचे समर्थक आहोत. तरी देखील आम्हाला त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या आदराच्या रक्षणार्थ आम्ही उतरलो असताना त्यांनी आम्हाला ताब्यात घेतले आहे.

बीबीसीने आणखी एक आरोपी रमन सैनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ आला.

बीबीसीने पिंकी भैय्या यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. मी हे निश्चितपणे सांगू शकत नाही के ते लोक आमच्या संघटनेशी संबंधित आहेत की नाहीत असं त्यांनी सांगितले.

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हिंदू रक्षक दलाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपीचा दावा

असं असलं तरी, रविंदर सिंहला जेव्हा पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याने तो हिंदू रक्षा दलाचा सदस्य असल्याचा दावा केला. पोलीस जेव्हा त्याला घेऊन जात आहेत त्या व्हीडिओत तो असा दावा करताना दिसत आहे.

“मला परेशान करू नका, सगळे मोठे ऑफिसर्स मला ओळखतात,” असे तो म्हणतोय. हा व्हीडिओ ईटीव्ही भारत दिल्लीने अपलोड केला आहे. “मी परत जाईन आणि त्या झुरळांना सरळ करेल. जे लोक देशविरोधी घोषणा देत आणि पोलिसांना शिवीगाळ करत आहेत त्यांना मी सरळ करणार. हिंदू रक्षा दल झुकणार नाही,” असे त्याने म्हटले.

आम्हाला आणखी एक व्हीडिओ मिळाला आहे ज्यात रविंदर सिंह आंदोलकाला थापड मारताना दिसत आहे.

दिल्लीतील कनॉट प्लेस या भागाला आंदोलनावेळी छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. निमलष्करी आणि पोलीस दलातील हजारो कर्मचारी या भागात तैनात होते. शहराच्या मध्यवर्ती भागात जेव्हा आंदोलक येत होते तेव्हा त्यांना ताब्यात घेताना तणावपूर्ण स्थिती दिसली.

शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले पण त्याचवेळी आंदोलकांवर हल्ले करणाऱ्या हिंदू रक्षा दलासारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर तातडीने कारवाई करण्यात पोलीस दल सक्षम ठरले नाही यावरुन काही आंदोलकांनी पोलिसांवर टीका केली आहे.

‘आंदोलक हे सनातन विरोधी’

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की शनिवारी सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हीडिओंची तपासणी करत आहोत आणि त्यांची पडताळणी झाल्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

एक उदाहरण…शनिवारी X वर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओत पिंकी भैय्या म्हणत आहे, “हिंदू रक्षा दलाला डिवचू नका, आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत.”

व्हीडिओ ग्रॅब

शनिवारनंतर जसं आंदोलन पुढे जात होतं त्यावेळी पिंकी भैय्यांनी हिंसक चिथावणी देणारे व्हीडिओ पोस्ट करत आंदोलकांना ‘सनातन विरोधातले लोक’ असं संबोधले आहे.

पत्रकार धैर्य माहेश्वरींनी एक व्हीडिओ पोस्ट केला आहे त्यात आंदोलकांना पकडून त्यांच्याकडून ‘सॉरी’ म्हणून घेतलं जात असल्याचे दिसत आहे.

‘द क्विंट’ने रितेश ठाकूर या व्यक्तीची मुलाखत घेतली. त्यात ती व्यक्ती स्वतःला ‘बजरंग दला’चा कार्यकर्ता सांगते. त्याने सांगितले की या आंदोलनात त्यांच्याशी संलग्नित 250 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.

या लोकांनी भूतकाळात राम आणि सीता यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. आम्ही त्यांना हे पुन्हा करू देणार नाहीत. असं तो व्हीडिओत सांगत आहे.

‘कॉक्रोचमुळे दिल्ली जाम’

शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी बीबीसीच्या पत्रकारांनी आंदोलनस्थळावर अशा काही चकमकी पाहिल्या. ‘कॉक्रोच जनता पार्टी असो वा, राहुल गांधी की आणखी कुणी. जर देश विभागण्याचं काम होत असेल तर आम्ही त्यांच्यासमोर माघार घेणार नाहीत,’ असं एका व्यक्तीने म्हटले.

‘या कॉक्रोचमुळे सर्व दिल्ली जाम झाली आहे, सर्व काम ठप्प झालं आहे,’ असं आणखी एका व्यक्तीने म्हटले.

आंदोलनासाठी आलेले आणि त्यांना विरोध करणारे, अशा दोन समूहांत तणाव दिसल्याचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

ते म्हणताय की जर तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला मारू. तुम्ही बेकायदेशीररीत्या आला आहात येते, (असं ते [उजव्या विचारसरणीचे समर्थक] सांगत आहेत, असं एका आंदोलकाने बीबीसीला कनॉट प्लेसजवळील इंदिरा चौकात सांगितले. या आंदोलकात आणि उजव्या विचारसरणीच्या ग्रुपसह तणाव झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पीटीआयने सांगितले की दिल्ली पोलिसांनी सीजेपी आंदोलनादरम्यान 20 FIR नोंदवल्या आहेत. ज्यात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या प्रकरणांचा देखील समावेश आहे.

पीटीआयने पुढे सांगितले, की त्यात महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या हिंदू रक्षा दलाशी संलग्नित असलेल्या आणि अटक झालेल्या चार जणांचा समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

अधिक शोधा

शॉर्ट व्हीडिओ वगळा आणि पुढे सुरू ठेवा

शॉर्ट व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

  • अभिनेता इमरान खानला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा..

  • दिल्लीत आंदोलनासाठी आलेले लोक गुरुद्वारात थांबले, परिस्थितीवर काय बोलले?

  • नेहा बोरा

  • कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन

  • अभिजीत दिपकेला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं तो क्षण

  • दिल्लीत अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, गावी आजीचं निधन

  • ध्रुव राठी

  • पोलिसांनी इटारसी रेल्वे स्थानकात ताब्यात घेतलेल्या पुण्यातील तरुणांना सोडलं

  • नीतीन नबिन यांची राहुल गांधी आणि दिपकेंवर टीका, 'देशाची प्रगती पाहवत नाही'

  • दिपके यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • kk create

  • 80 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन सैन्यात गोळ्या घालून मृत्युदंड दिला जाणार

  • जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं - 'मला नोबेल मिळालाय!'

  • नाना पाटेकर

  • गोवा डॉक्टर

SOURCE : BBC