Home LATEST NEWS ताजी बातमी एनव्हीडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांचा राजीनामा, आता जबाबदारी कोणाकडे?

एनव्हीडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांचा राजीनामा, आता जबाबदारी कोणाकडे?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

कोणाला मिळाली जबाबदारी

वाचन वेळ: 3 मिनिटे

एनव्हीडिया कंपनीचे सीईओ जेन्सन हुआंग यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दुसऱ्या कथित अफेअरच्या आरोपांनंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.

जेन्सन हुआंग हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होते.

जेन्सन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हीडियाची सह-स्थापना केली होती आणि गेली तीन दशके ते कंपनीचे नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एनव्हिडिया जगातील सर्वात मौल्यवान तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक बनली.

जेन्सन हुआंग

कोलेट क्रेस अंतरिम सीईओ

एनव्हीडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा जेन्सन हुआंग यांनी राजीनामा दिल्याची घोषणा कंपनीच्या संचालक मंडळानं काही क्षणांपूर्वी केली.

त्यानंतर कोलेट क्रेस यांनी अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (Interim CEO) म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आहे, असं संचालक मंडळानं स्पष्ट केलं आहे. त्या यापूर्वी कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

कोलेट क्रेस

संचालक मंडळाचे सदस्य हार्वी जोन्स हे आपल्या निवेदनात म्हणतात, “कोलेट यांनी एनव्हीडियाच्या असामान्य वाढीच्या काळात नेतृत्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीचा व्यवसाय, ग्राहक, कामकाज आणि आर्थिक स्थिती यांची त्यांना सखोल जाण आहे.”

हार्वी जोन्स यांची कंपनीच्या आजवरच्या इतिहासातील पहिले संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, असंही कंपनीनं सांगितलं आहे.

जेन्सेन हुआंग : संघर्ष करून मिळवले यश

जेन्सेन हुआंग यांनी 1993 मध्ये Nvidia (एनव्हीडिया) या कंपनीची स्थापना केली होती. हा शब्द खरं तर दोन शब्दांचं संयोजन आहे. NV म्हणजे ‘नेक्स्ट व्हिजन’ आणि Vid या शब्दाचा अर्थ व्हीडिओ आहे.

हुआंग यांचं जीवन कष्ट, धोके आणि कठोर परिश्रमाने भरलेलं आहे. ही कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहे आणि टेबल साफ करण्यापासून बरीच कामं केली आहेत.

1963 मध्ये जन्मलेल्या हुआंग यांचं बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेलं. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं.

दोन्ही भावांना इंग्रजी येत नव्हतं. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवण्यात आलं. ते नातेवाईक फार पूर्वीपासून अमेरिकेत स्थायिक झाले होते. दोघांनी केंटकी येथील ओनिडा बॅप्टिस्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं.

2016 मध्ये शाळेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रानुसार, दोन्ही भावांना तिथे राहण्याची, खाण्याची आणि काम करण्याची परवानगी होती. या संस्थेत फक्त उच्च शिक्षण दिलं जातं.

लहानपणी हुआंग शौचालय साफ करायचं काम करत.

हुआंग यांनी 2012 साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “अनेक अडचणी असूनही, मी नेहमी आनंदी असायचो त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव होता.”

जेन्सेन हुआंग

हुआंग आणि त्यांची पत्नी लोरी यांनी 2016 मध्ये शाळेतील मुलींसाठी वर्गखोल्या आणि वसतिगृहांसह इमारत बांधण्यासाठी 2 दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती.

काही वर्षांनी त्यांचे आई-वडीलही अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये स्थायिक झाले. नंतर ते आई-वडिलांसोबत राहत होते. हुआंगने ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं.

त्यांच्या मते, तेव्हाच त्यांना संगणकाची भुरळ पडली. तिथेच त्याची पत्नी लोरीशी भेट झाली. दोघेही एकत्र काम करायचे. 80 विद्यार्थ्यांच्या वर्गात फक्त तीन मुली शिकत होत्या. लोरी त्यांच्यापैकी एक होत्या.

विद्यापीठातील 2013 च्या व्याख्यानात, हुआंग यांनी कंपनीचे सह-संस्थापक ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रिम यांना योगायोगाने कसे भेटले याबद्दल सांगितलं.

कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील डेनीसच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करताना एनव्हीडियाच्या तीन सह-संस्थापकांना कंपनीची कल्पना सुचली.

वयाच्या 15 व्या वर्षी पोर्टलँडमधील डेनिसच्या रेस्टॉरंटमध्ये भांडी धुणे, टेबल साफ करणे आणि वेटर म्हणून काम करणे ही पहिली नोकरी मिळाल्यापासून हुआंगचे डेनिसशी चांगले संबंध होते.

“हे एक मोठं काम होतं. प्रत्येकाने रेस्टॉरंट व्यवसायात त्यांची पहिली नोकरी केली पाहिजे. यामुळे आपल्या अंगी नम्रता येते आणि कठोर परिश्रम कसे असतात ते समजतं,” असं हुआंग सांगतात.

स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस येथे नुकत्याच झालेल्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं होतं की, “मी सीईओ होण्यापूर्वी माझं पहिलं काम भांडी धुण्याचं होतं आणि मी त्यात खूप चांगला होतो.”

त्यांच्या मते, रेस्टॉरंटच्या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या लाजाळूपणावर काम करण्यास मदत झाली.

त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितलं होतं की, “मला लोकांशी बोलताना खूप अवघडायचं.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC