Home LATEST NEWS ताजी बातमी खाद्य तेलाच्या बाबतीत स्वावलंबी असलेला भारत जगातला सर्वात मोठा आयातदार बनण्याची कारणं

खाद्य तेलाच्या बाबतीत स्वावलंबी असलेला भारत जगातला सर्वात मोठा आयातदार बनण्याची कारणं

2
0

Source :- BBC INDIA NEWS

भारत खाद्य तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना खाद्य तेलाच्या वापरात 10 टक्के कपात करण्याचं आवाहन केलं होतं.

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचं परकीय चलन वाचवण्याच्या व्यापक आवाहनाचा हा एक भाग होता.

मोदींनी नागरिकांना इंधनाच्या वापरात कपात करण्याचं, सोनं खरेदी न करण्याचं आणि अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचं आवाहनदेखील केलं होतं.

जगभरात 2025/26 मध्ये झालेल्या वनस्पती तेलाच्या एकूण आयातीमधील जवळपास पाचवा भाग एकट्या भारताचाच होता. यामुळे भारत खाद्य तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश बनला.

मात्र नेहमीच अशी परिस्थिती नव्हती.

‘स्वावलंबी भारत’

मात्र 1990 च्या दशकाच्या मध्यापासून स्वस्त आयात आणि वेगानं झालेल्या आर्थिक प्रगतीनं मागणीत वाढ झाली.

प्रति व्यक्तीमागे होणारा खाद्य तेलाचा वापर वाढला. त्यानंतर देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सातत्यानं आयातीवर अवलंबून होत गेला.

भारताचं खाद्य तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व 1994-95 मध्ये फक्त 5 टक्के होतं

फोटो स्रोत, Science Photo Library

नीती आयोगाच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, खाद्य तेलाच्या आयातीवरील देशाचं हे अवलंबित्व ‘देशाच्या परकीय चलनसाठ्यावर नकारात्मक परिणाम करतं आहे.’

कोणत्या खाद्य तेलांची आयात होते?

भारतातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी 14.3 टक्के जमिनीवर तेलबियांची लागवड केली जाते. भारत एरंड, करडई, तीळ, रामतीळ, शेंगदाणा आणि मोहरी-राई यांचा प्रमुख उत्पादक आहे.

मात्र भारताच्या खाद्यतेलाच्या आयातीत मुख्यत: 3 प्रकारच्या तेलांचा समावेश आहे. ते म्हणजे, पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल.

निव्वळ पाम तेलाचाच खाद्यतेलाच्या आयातीतील वाटा 57 टक्के आहे. तर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा वाटा अनुक्रमे 29 टक्के आणि 14 टक्के आहे.

भारतात खाद्य तेलाच्या वापरात बदल कसा झाला?

गेल्या 2 दशकांमध्ये भारतातील खाद्य तेलाच्या वापराचं स्वरुपदेखील मोठ्या प्रमाणात बदललं आहे.

भारतात हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग ही क्षेत्रं पाम तेलाचे सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी आहेत.

स्नॅक्स, रेडी-टू-ईट उत्पादनं, बेकरी पदार्थ आणि मिठाई यासारख्या पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थांच्या वाढत्या मागणीबरोबरच पाम तेलाच्या मागणीत देखील वाढ झाली.

याच कालावधीत कधीकाळी भारतात सर्वात कमी खप होणाऱ्या खाद्य तेलांपैकी एक असलेल्या सूर्यफुलाच्या तेलाचा वाटा (3.1 टक्के) वाढून 2022-23 पर्यंत 11.6 टक्के झाला.

मात्र शेंगदाणा तेलाचा खप 2001-02 मध्ये 12 टक्के होता. तो घसरून 2022-23 मध्ये 3 टक्के झाला. तर मोहरीच्या तेलाचा खप 17 टक्क्यांवरून कमी होऊन 13.6 टक्क्यांवर आला.

तेलबियांच्या उत्पादनातील फरक

आंध्र प्रदेशातील आपल्या ताड्याच्या मळ्यातील एक शेतकरी

त्याच्या तुलनेत, जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादकांपैकी एक असलेल्या अमेरिकेत प्रति हेक्टरी उत्पादन 3.4 टन होतं.

हा फरक इतर तेलबियांच्या उत्पादनात देखील दिसून येतो. भारतातील मोहरीचं प्रति हेक्टरी उत्पादन 1.5 टन आहे. तर जर्मनीत प्रति हेक्टरी उत्पादन 3.7 टन आणि फ्रान्समध्ये 3.3 टन आहे.

भुईमूगाच्या बाबतीत भारतातील प्रति हेक्टरी उत्पादन 1.8 टन आहे. तर अमेरिकेत याचं प्रमाण प्रति हेक्टरी 4.5 टन आणि चीनमध्ये 3.9 टन आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC