Source :- BBC INDIA NEWS

खेळण्यांतून विज्ञान शिकवणारा अवलिया, पाहा वैज्ञानिक अरविंद गुप्ता यांची खास मुलाखत
कचऱ्यापासून वैज्ञानिक खेळणी बनवून मुलांमध्ये विज्ञानाची आवड रुजवणारे वैज्ञानिक आणि ‘पद्मश्री’ विजेते डॉ. अरविंद गुप्ता यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी महाराष्ट्राची गोष्ट या सिरीजमध्ये घेतलेली खास मुलाखत.
या मुलाखतीत त्यांनी सध्याची शालेय शिक्षण पद्धत, घोकंपट्टीची संस्कृती आणि कोचिंग क्लासेस या विषयांवर भाष्य केले.
खेळ, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्यामुळेच मुलांमध्ये खरा वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अनेक मुद्यांवर त्यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे.
विज्ञान, शिक्षण, विद्यार्थ्यांमधला वैज्ञानिक दृष्टीकोन अशा अनेक गोष्टींवर त्यांनी या मुलाखतीत चर्चा केली आहे. यासाठी संपूर्ण मुलाखत नक्की पाहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




