Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Arun SANKAR / AFP via Getty Images
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीने आज (10 ऑक्टोबर) दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने समर्थकांनी दिल्लीच्या दिशेने आगेकूच केली. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपी समर्थक जंतरमंतरच्या दिशेने येत होते. मात्र, पोलिसांनी सुरक्षा आणि सुव्यवस्थेचं कारण देत त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी शेकडो समर्थक, आंदोलन कव्हर करणारे पत्रकार यांनादेखील ताब्यात घेतलं आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतलं आहे.
सध्या दिल्लीत काय परिस्थिती आहे, या 10 फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊया.
फोटो स्रोत, Arun SANKAR / AFP via Getty Images
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून राजधानीतील अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक समर्थकांची पोलिसांनी धरपकड केली आहे. आंदोलकांसोबत काही पत्रकारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
फोटो स्रोत, Arun SANKAR / AFP via Getty Images
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
पक्षानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, दिल्ली पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या कारवाईचा उद्देश आजच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या नेतृत्वाला आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ करणे हा आहे, असं म्हटलं आहे.
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की आंदोलनाची माहिती वेळेत देण्यात आलेली नव्हती. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्यांमधील अटींचे पालन न केल्यामुळे यावेळी परवानगी नाकारण्यात आली आहे.
फोटो स्रोत, ANI
दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळी येणाऱ्या समर्थकांना रोखण्यासाठी अशाप्रकारे रस्त्यावर खिळे ठोकले आहेत.
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी बीएनएसएस कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सीआरपीएफच्या सुमारे 70 कंपन्याही दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. राजधानीतील परिस्थिती लक्षात घेता आज दिवसभर सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहेत.
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
सीजेपीने याला नागरिकांच्या मुक्त संचाराच्या अधिकाराचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले असून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. आंदोलनात सहभागी एका समर्थकाला ताब्यात घेताना पोलीस
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
सीजेपीच्या आंदोलनापूर्वी शेकडो जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
केंद्रीय गृह मंत्रालयाने जनपथ-कर्तव्य पथ परिसराच्या चार किलोमीटरच्या हद्दीत इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यास मंजुरी दिली आहे. हे निर्बंध 9 ऑक्टोबर रात्रीपासून लागू झाले असून 10 ऑक्टोबर रात्रीपर्यंत कायम राहणार आहेत.
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी दुसरीकडे आंदोलक आंदोलनस्थळाकडे जात असल्याची माहिती आहे.
फोटो स्रोत, Ritesh Shukla/Getty Images
या दरम्यान, आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापटी झाल्याचंही कळते. मात्र, जंतर मंतरपर्यंत पोहोचून आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




