Source :- BBC INDIA NEWS

भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट घोंघावतंय? अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची मुलाखत

Published

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र एका गोष्टीची चर्चा होते आहे. केवळ ते दिसतंय म्हणून नाही तर त्याची झळ प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात बसली आहे. ती म्हणजे जी आर्थिक समस्या सध्या घोंघावत आहे.

‘घोंघावत’ यासाठी म्हटलं, कारण बरेच जण असाही अंदाज व्यक्त करत आहेत की, अजूनही आव्हानात्मक दिवस पुढे अजून यायचे आहेत. कधी येतील माहित नाही. किती असतील हेही माहित नाही. पण खरंच जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कशा प्रकारच्या आव्हानांना सामोरी जाते आहे?

भीती आहे. संदिग्धता आहे. काय खरं काय खोटं हेही नेमकं कळत नाही. कारण बरचसं बोललं जात आहे. त्याविषयीच समजून घेण्यासाठी आणि बोलण्यासाठी आम्ही ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांच्याशी बोललो.

डॉ. अजित रानडे यांना आपण यापूर्वी बऱ्याचदा ऐकलं आणि वाचलं असेल. ते लिखाणही भरपूर करत असतात. पुण्यातल्या ‘गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’चे ते कुलगुरु होते. ते नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत. सध्या ते ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ या संस्थेमध्ये ‘सिनियर फेलो’ म्हणूनही काम पाहत आहेत.

डॉ. अजित रानडे यांची ‘बीबीसी मराठी’चे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC