Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
बुधवारी (24 जून) संध्याकाळी व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये एक प्रचंड भूकंप झाला. आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
मात्र, मृतांचा आकडा हजारांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फोटो स्रोत, Getty Images
व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.
फोटो स्रोत, Getty Images
‘युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे’च्या (USGS) मते, मृतांची संख्या 10 हजारच्या वर जाण्याची शक्यता 44 टक्के आहे.
फोटो स्रोत, Getty Images
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले आहेत. आपली घरे रिकामे करावीत असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांनी केले आहे.
फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला.
फोटो स्रोत, Getty Images
भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




