Home LATEST NEWS ताजी बातमी समज-गैरसमज: स्त्रीवाद म्हणजे पुरुषांविरोधात लढा? तोकडे कपडे आणि छोटे केस यांचा फेमिनिझमशी...

समज-गैरसमज: स्त्रीवाद म्हणजे पुरुषांविरोधात लढा? तोकडे कपडे आणि छोटे केस यांचा फेमिनिझमशी काय संबंध?

1
0

Source :- BBC INDIA NEWS

समज-गैरसमज: स्त्रीवाद म्हणजे पुरुषांविरोधात लढा? तोकडे कपडे आणि छोटे केस यांचा फेमिनिझमशी काय संबंध?

Published

स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय? तो पुरुषांविरोधात आहे का? स्त्रीवादामुळे समाजात, कुटुंबात फूट पडते का?

स्त्रीवादाबद्दल असे अनेक समज आणि गैरसमज समाजात आहेत. पण स्त्रीवादाची मूळ संकल्पना काय आहे? तो केवळ महिलांच्या अधिकारांपुरता मर्यादित आहे की स्त्री-पुरुष समानतेचा व्यापक विचार मांडतो?

‘समज-गैरसमज’च्या या भागात तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्त्रीवादाच्या अभ्यासक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी हे विषय सहज, सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उलगडून सांगितले आहेत. स्त्रीवादाचा इतिहास, पितृसत्ता, महिलांचे कायदेशीर अधिकार, महात्मा फुले यांचे विचार, हिंदू कोड बिल, तसेच जात, वर्ग आणि लिंगभाव यांचा परस्पर संबंध यावर त्या प्रकाश टाकतात. Gen-Z पिढीच्या नजरेतून स्त्रीवाद कसा पाहिला जातो आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांशी त्याचा काय संबंध आहे, याचीही या चर्चेत मांडणी करण्यात आली आहे.

लोकेशन- द बॉक्स, पुणे

लाइटिंग- मैत्रेय राणे

फिल्ड आणि रिसर्च- प्राची कुलकर्णी, गणेश पोळ

शूटिंग- नितीन नगरकर, शरद बढे, प्राजक्ता धुळप

ग्राफिक्स- वसीफ खान

एडिटिंग- शरद बढे

प्रोड्यूसर- प्राजक्ता धुळप

संपादक- अभिजीत कांबळे

SOURCE : BBC