Gratuity Rule Change: केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर रोजी नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. 29 कामगार कायदे चार भागात एकत्रित केले आहेत. वेतन संहिता, 2019, औद्योगिक संबंध संहिता, 2020, सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य संहिता, 2020 अंतर्गत कायद्यात बदल करण्यात आले आहेत. 40 कोटी कर्मचाऱ्यांना या काद्याचा लाभ मिळणार आहे.  

Add Zee News as a Preferred Source

या कायद्यांनुसार, पगार, ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफ संबंधी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एक मोठा बदल ग्रॅच्युइटीबाबत आहे. आता कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या सेवेनंतर ऐवजी एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळणार आहे. पूर्वी, ग्रॅच्युइटी फक्त कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाच दिली जात होती, परंतु आता ग्रॅच्युइटीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल? जाणून घेऊया..

1. ठराविक मुदतीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी 
ठराविक मुदतीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी लाभ मिळणार आहे. त्यांना कायम कर्मचाऱ्यांसारखेच फायदे मिळतील, ज्यात रजा, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी लाभ देखील मिळतील. 

2 महिला कर्मचारी
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या  महिला कर्मचाऱ्यांनाही  ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना आता रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी आहे. शिवाय, महिलांना सर्व क्षेत्रात काम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

3 तरुण कर्मचारी
तरुण कर्मचाऱ्यांना देखील ग्रॅच्युइटीचे फायदे मिळतील. सर्व कामगारांसाठी किमान वेतनाची हमी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्ती पत्र मिळेल. कामगारांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनावर आधारित वेतन मिळेल.

4 . कंत्राटी कर्मचारी
कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे. या क्षेत्रातील कर्मचारी केवळ एक वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र असतील.

नवीन कामगार संहितेत संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र, गिग कामगार, स्थलांतरित कामगार, प्लॅटफॉर्म कामगार आणि महिला कर्मचारी यांचा समावेश आहे. याअंतर्गत, सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि वेळेवर वेतन दिले जाईल. गिग कामगारांना पेन्शन, पेन्शन आणि इतर फायदे यासारखे सामाजिक सुरक्षा फायदे देखील दिले जातील.