Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
वाचन वेळ: 4 मिनिटे
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये (30 जूनला) मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतील गुहागर येथे सर्वाधिक 169 मिमी पाऊस झाला, तर रायगडमधील श्रीवर्धनमध्ये 145 मिमी आणि सिंधुदुर्गातील देवगडमध्ये 112 मिमी पाऊस पडला.
राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. जलसंपदा विभागाच्या 30 जूनच्या अहवालानुसार, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांसह सर्व धरणांमध्ये मिळून 40,861.07 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त क्षमतेच्या 22.49 टक्के आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 45.13 टक्के होता. पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 13.50 टक्के, तर कोकण विभागातील धरणांमध्ये 27.89 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये 21.54 टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये 29.74 टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये 20.30 टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे
रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक 145 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ म्हसळा (114 मिमी) आणि मुरूड (108 मिमी) येथे मुसळधार पाऊस झाला.
जिल्ह्यातील तळा (96 मिमी), पोलादपूर (66 मिमी), माणगाव (58 मिमी), रोहा (57 मिमी), सुधागड (54 मिमी), पेण (53 मिमी), पनवेल (53 मिमी) आणि महाड (50 मिमी) येथेही समाधानकारक पाऊस झाला.
तर माथेरान (26 मिमी), उरण (21 मिमी), कर्जत (16 मिमी) आणि खालापूर (4 मिमी) येथे तुलनेने कमी पावसाची नोंद झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे 112 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय रामेश्वर कृषी केंद्र (107.8 मिमी), कणकवली (88 मिमी), मुलदे कृषी केंद्र (86.8 मिमी), कुडाळ (86 मिमी), सावंतवाडी (86 मिमी), दोडामार्ग (82 मिमी), वैभववाडी (70 मिमी), मालवण (69 मिमी) आणि वेंगुर्ले (66 मिमी) येथेही चांगला पाऊस झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर दिसून आला. गुहागर (169 मिमी) येथे राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
त्याखालोखाल राजापूर (152 मिमी), मंडणगड (125 मिमी), संगमेश्वर (107 मिमी), दापोली (102 मिमी), वाकवली (101.6 मिमी), खेड (82 मिमी), लांजा (79 मिमी) आणि चिपळूण (71 मिमी) येथे जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, मराठवाड्यात तुलनेने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली, तर वसमत (5 मिमी), सेनगाव (4 मिमी), हिंगोली (4 मिमी) आणि औंढा नागनाथ (3 मिमी) येथे हलका पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात अंबड येथे सर्वाधिक 79 मिमी पाऊस झाला. तसेच मंठा (16 मिमी), परतूर (15 मिमी), बदनापूर (8.6 मिमी), जालना (7.2 मिमी), जाफराबाद (5 मिमी) आणि घनसावंगी (2 मिमी) येथे पावसाची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ येथे 18 मिमी, लातूर येथे 14 मिमी, रेणापूर येथे 10 मिमी, औसा येथे 7 मिमी, देवणी येथे 4 मिमी आणि निलंगा येथे 2 मिमी पाऊस झाला. तर चाकूर आणि जळकोट येथे पावसाची नोंद झाली नाही.
मराठवाड्यातील नांदेड आणि बीड जिल्ह्यांतही काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात भोकर येथे सर्वाधिक 68 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच मुखेड (11 मिमी), धर्माबाद (8 मिमी), नायगाव (6 मिमी), बिलोली (3 मिमी), उमरी (3 मिमी), अर्धापूर (3 मिमी), कंधार (2 मिमी) आणि मुदखेड (2 मिमी) येथे पाऊस झाला. तर किनवट, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, माहूर आणि लोहा येथे पावसाची नोंद झाली नाही.
बीड जिल्ह्यात केज येथे सर्वाधिक 22 मिमी पाऊस झाला. याशिवाय अंबाजोगाई येथे 20 मिमी आणि परळी वैजनाथ येथे 9 मिमी पावसाची नोंद झाली. तर माजलगाव आणि वडवणी येथे पावसाची नोंद झाली नाही.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे 21 मिमी आणि भिवंडी येथे 20 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच कल्याण (8 मिमी), उल्हासनगर (4 मिमी) आणि मुरबाड (2 मिमी) येथे पाऊस झाला.
पालघर जिल्ह्यात वसई येथे सर्वाधिक 81 मिमी पाऊस झाला. याशिवाय पालघर कृषी केंद्र (29 मिमी), विक्रमगड (24 मिमी), जव्हार (23 मिमी), तलासरी (10 मिमी) आणि वाडा (1 मिमी) येथे पावसाची नोंद झाली.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात देखील काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. गगनबावडा येथे 92 मिमी पावसाची नोंद झाली असून, शाहूवाडी (40 मिमी) आणि राधानगरी (39 मिमी) येथेही चांगला पाऊस झाला.
तसेच आजरा (23 मिमी), गारगोटी (19 मिमी), चंदगड (19 मिमी), गडहिंग्लज (10 मिमी), कागल (9 मिमी), हातकणंगले (9 मिमी) आणि पन्हाळा (7 मिमी) येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर शिरोळ येथे केवळ 2 मिमी पावसाची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यात इंदापूर येथे सर्वाधिक 27 मिमी पाऊस पडला. याशिवाय एनडीए (4.5 मिमी), निमगिरी (4 मिमी), बारामती (2 मिमी), हडपसर (1 मिमी), पाषाण (0.6 मिमी), शिवाजीनगर (0.5 मिमी), दापोडी (0.5 मिमी) आणि माळीण (0.5 मिमी) येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
एकूणच, कोकणात मान्सूनचा जोर कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या, ओढे आणि जलाशयांमध्ये पाण्याचा साठा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




