Home LATEST NEWS ताजी बातमी पर्यटकांना पृथ्वीपल्याडच्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या लडाखच्या ‘अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बेसेडर’

पर्यटकांना पृथ्वीपल्याडच्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या लडाखच्या ‘अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बेसेडर’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

पर्यटकांना पृथ्वीपल्याडच्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या लडाखच्या ‘अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बेसेडर’

Published

डार्क स्काय रिझर्व्ह म्हणजे अशी जागा जिथे अंधार राखून ठेवला जातोय. जसं वन्य प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी क्षेत्र राखून ठेवलं जातं, तसंच इथे खगोल अभ्यासासाठी अंधार जपण्यासाठी विशिष्ट परिसरातला अंधार कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.

हानले गाव चांगथांग वनक्षेत्रात येतं. हानलेच्या भोवतीचा 22 किलोमीटरचा परिसर म्हणजे सहा गावं या डार्क स्काय रिझर्व्हचा भाग आहेत.

हानलेमध्ये वेधशाळा असली, तरी ती संशोधकांनाच वापरता येते. पण इथे आकाश निरीक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत होती. म्हणून मग अ‍ॅस्ट्रो-टूरिझमला चालना देण्यासाठी आणि अंधार जपण्याच्या उद्देश्यात स्थानिकांनाही सहभागी करून घेण्यासाठी एक उपक्रम सुरू करण्यात आला. तो म्हणजे, अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स.

लडाख प्रशासन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स यांनी मिळून 2022 साली हानले आणि आसपासच्या गावांतल्या 24 तरूण-तरुणींना खगोलशास्त्राची तोंडओळख करून दिली. त्यांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं.

खगोल संकल्पना, आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्रं ओळखणं याचे धडे देण्यात आले. सोबतच त्यांना टेलिस्कोप देण्यात आला आणि तो कसा वापरायचा हे देखील शिकवण्यात आलं. मोबाईलने आकाशगंगेचे फोटो काढायला शिकवलं गेलं.

आणि या प्रशिक्षणातून तयार झाले 24 अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स. यापैकी 18 मुली आहेत. पालजेस आंगमो, त्स्रिंग डुलकर, त्स्रिंग यांगडोल आणि पद्मा त्याच बॅचमधल्या.

  • रिपोर्ट : अमृता दुर्वे
  • व्हीडिओ आणि शूट : शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC