Home LATEST NEWS ताजी बातमी नाना पाटेकर म्हणाले होते, ‘जर ही माणसं भेटली नसती तर मी कदाचित...

नाना पाटेकर म्हणाले होते, ‘जर ही माणसं भेटली नसती तर मी कदाचित अंडरवर्ल्डमध्ये असतो’

3
0

Source :- BBC INDIA NEWS

आज, पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी नाना पाटेकरांचं गोव्यात निधन झालं.

  • Published

  • वाचन वेळ: 7 मिनिटे

“मला एके दिवशी एकानं विचारलं की, तू शेतावर काय लावतोस रे? मी म्हटलं लाकडं. माझी मी उगवतोय. हो, नाहीतर हे सगळे दोस्त लोक ओल्या लाकडावर जाळायचे. धूर डोळ्यात गेल्यावर यांच्या डोळ्यांत पाणी यायचं, आणि मी जळताना मला वाटायचं की, माझ्यासाठी रडतायत. असले नालायक आहेत. त्यामुळे, मी माझ्यासाठी सुकी लाकडं आणणार. धूर कमी. त्यामुळे मला जळताना कळेल की, खरा कोण आणि खोटा कोण. काय सांगावं. तिथेसुद्धा कदाचित मी उठेन मुस्काटीत मारायला.”

आपल्याच मरणाविषयी अगदी थेटपणे व्यक्त केलेली ही वाक्यं नाना पाटेकरांच्या रोखठोक स्वभावाचंच दर्शन घडवणारी आहेत.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंच्या ‘ग्रेट भेट’ मुलाखतीचा शेवट त्यांच्या या वाक्यांनीच होतो.

आज, पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी नाना पाटेकरांचं गोव्यात निधन झालं. भव्य समुद्रकिनारा असलेल्या डोना पॉलामधील त्यांच्या घरी.

त्यांना समुद्राचं मोठं आकर्षण होतं. सातवीला मुलानं सुधारावं म्हणून त्यांच्या आईनं त्यांना मावशीकडे मुरूड-जंजिऱ्याला पाठवलं होतं.

पण, आठवीला आपली मुलं बिघडतील की काय, या भीतीनं मावशीनंच त्यांना परत पाठवलं.

मुरूडला त्यांच्यासमोर नेहमी समुद्र असायचा. या आठवणींबद्दल नाना पाटेकरांनी म्हटलंय की, “त्यामुळे, जे काही पहायचं ते भव्यच पहायचं, अशी सवयच लागली आहे. छोटं पहायची सवयच नाही झाली. व्हायचं तर समुद्रासारखं मोठं होता आलं पाहिजे, असं वाटायचं.”

नाना पाटेकर

‘जर ही माणसं भेटली नसती तर मी कदाचित अंडरवर्ल्डमध्ये असतो’

नाना पाटेकरांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला अमिट असा ठसा उमटवला.

नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध प्रकारच्या भूमिकांमधून ते मराठीपल्याडही जाऊ शकले.

अत्यंत गरिबीतून ते वर आले. अभिनयामुळेच एका सामान्य घरातला ‘वांड’ मुलगा अभिनय क्षेत्रात समुद्रासारखी भव्यता प्राप्त करू शकला.

आपण वेगळे असण्यामागचं कारण समुद्र आणि आयुष्यात घडलेल्या घटना आहेत, हे सांगताना पुढे ते म्हणालेत की, “त्या समुद्रापेक्षा सगळ्यात जास्त मोठा समुद्र असतो तो म्हणजे भूक आणि अवहेलना.”

लहानपणी ते खूपच खोडकर आणि वांड होते. त्यांची हीच सगळी उर्जा नाटक अभिनयाकडे वळवण्यात ते यशस्वी ठरले.

‘ग्रेटभेट’च्या मुलाखतीत ते सांगतात की, “मीच मूळात गरीब होतो रे. मी फुटपाथवर झोपलेलो आहे. महिन्याला 35 रूपये पगार आणि एक वेळचं जेवण. तेरा वर्षांचा असताना मी नोकरीला लागलो. मी नेहमीच म्हणतो की, त्यावेळी मला कुणी नातेवाईक नव्हतं. मग थोडसं नाव आणि पैसा आल्यावर खूप नातेवाईक झाले.”

नाना पाटेकरांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला अमिट असा ठसा उमटवला.

त्यांचे वडील गजानन पाटेकर मुंबईत कापडाच्या व्यवसायात होते.

त्यांच्या वडिलांना कुणीतरी फसवलं आणि त्यात त्यांचं सगळं गेलं. त्यामुळे, गरिबीत घराचा भार उचलण्यासाठी मग त्यांनी पेंटरची नोकरी केली.

तेव्हा ते सिनेमाचे पोस्टर्सदेखील करायचे. तेव्हा ते दादरच्या समर्थ विद्यालयात होते. दुपारी घरी येऊन जे मिळेल ते खाऊन दुपारच्या उन्हात आठ किलोमीटर चालत जायचं आणि मग रात्री पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. रोज सोळा किलोमीटर चालणं हा त्यांचा नित्यक्रम होता.

अशा या खडतर परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं. तेव्हा लहाणपणी आर्मीत जायचं त्यांचं स्वप्न होतं, पण आईवडिलांनी जाऊ दिलं नाही. आर्मीबद्दलचं आपलं हेच फॅसिनेशन पुढे जाऊन त्यांनी ‘प्रहार’ चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचं दिसतं.

दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट. पण, नाटकातली त्यांची एंट्रीही अगदी अपघात म्हणावी अशीच झाली.

ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहतांना ते गुरू मानत. त्यांच्यासहित अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे अशा माणसांच्या आपल्या जडणघडणीत वाटा आहे, असं ते सांगत असत.

‘जर ही माणसं भेटली नसती तर मी कदाचित अंडरवर्ल्डमध्ये असतो,’ या त्यांच्या वाक्यावरूनच ते लक्षात यावं.

ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहतांना ते गुरू मानत.

नानांसाठी अशोक सराफ आठ-दहा रुपये मुद्दाम हरायचे

नाना नोकरीतून नाटकात कसे आले, याबद्दलचा किस्साही मोठा रंजक आहे.

त्यावेळी ते ‘चांगुणा’ नाटकाची रिहर्सल पहायला गेले होते. ही रिहर्सल पाहत असतानाच ते त्यांच्या टिवल्या-बावल्या करत असायचे. स्टेट कॉम्पिटिशनचं दुसरं नाटक बसवायला घेणार होते तेव्हा सुलभाताई अरविंद देशपांडे यांना म्हणाल्या की, ‘तो मुलगा आहे ना. तो हा रोल करेल.’ तेव्हा नाना पाटेकर नोकरी करत होते. त्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती झाली की, नोकरी करू की काय करू? पण सुलभाताईंनी विश्वास ठेवून हा रोल दिल्यामुळे नानांना मोठा मंच मिळू शकला.

‘पुरूष’ नाटकातून पैसे अधिक मिळायचे म्हणून कितीतरी वर्षे ते हे नाटक करत राहिल्याचं सांगतात.

तेव्हा नाना पाटेकरांना प्रत्येक प्रयोगाला 50 रुपये तर अशोक सराफ यांना दोनशे रुपये म्हणजे चौपट मिळायचे. त्यावेळी अशोक सराफ जेव्हा त्यांच्यासोबत पत्ते खेळायचे तेव्हा ते आठ-दहा रुपये मुद्दाम हरायचे. नाना पाटकेर सांगातात की, “मला कळायचं की, तो मुद्दाम हरतोय तरी पण मी पैसे घ्यायचो. कारण माझी गरज होती.”

नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध प्रकारच्या भूमिकांमधून ते मराठीपल्याडही जाऊ शकले.

नाना पाटेकरांचं अशोक सराफ यांच्यासोबतचं नातं किती दिलखुलास होतं, हे त्यांनी स्वत:चं निखिल वागळेंना दिलेल्या मुलाखतीत अधिक चांगल्या प्रकारे उलगडून सांगितलंय.

नाना पाटेकर सांगतात की, “अशोकने मला खूप मदत केली. खूप. गणपतीलासुद्धा आवर्जून पैसे द्यायचा. परत द्यायला गेलो की बोलायचा, काय पाटेकर पैसेवाले झालात. मी त्याला म्हटलं की, बाबा, पैसेच परत करतोय, वेळ काही परत करू शकत नाही. पण या मंडळीनी माझी खूप काळजी घेतली. अशोकचे मी पाय चेपायचो आणि डोक्याला जरा मालिश केलं की, तो मला तीन रूपये द्यायचा. अजूनही अशोक कुठेही भेटला आणि मी त्याचे पाय चेपायला गेलो की, तो झिडकारतो की, अरे काय आता काय हे म्हणून? त्यावर मी त्याला म्हणतो की, असं करून कसं चालेल? आमदनी आहे आपली. डोक्याला दोन मिनिटं मालिश केलं की पाच रूपये, दहा रूपये देतो आणि म्हणतो की चलो ले लो, ले लो, महंगाई बढ गयी है, मजा करो!”

अशोक सरांफासाठी जेव्हा नानांनी चालवली होती रिक्षा

दुसऱ्या बाजूला, अशोक सराफ यांनी नाना पाटेकरांबद्दलचा असाच एक किस्सा त्यांच्या ‘बहुरूपी’ या पुस्तकाद नोंदवला आहे.

‘हमीदाबाईची कोठी’च्या एका प्रयोगादरम्यान अतिशय हिंसक असा अनुभव केवळ अशोक सराफ यांनाच नाही, तर हमीदाबाईच्या सगळ्या टीमलाच आला होता.

एका आडगावात प्रयोग होता, रुढार्थाने थिएटर असं नव्हतंच. स्टेजवर कलाकार बोलायला लागले. पण प्रेक्षकांना काही दिसेना, आवाज येत नव्हता. पाच मिनिटांमध्ये पडदा पाडला. नाटक रद्द करायची वेळ आली होती, लोक बाहेर ओरडत होते.

2014 मधील 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

अशोक सराफ हा ओळखीचा, लोकप्रिय चेहरा असल्याने म्हमद्याच्या नावाने बाहेर प्रचंड गलका सुरू होता.

सगळा प्रसंग ओळखून या नाटकात भूमिका करणाऱ्या नाना पाटेकरांनी अशोक सराफांचा हात धरून त्यांना मागून बाहेर काढलं. तिकडे थिएटरमध्ये मारामारीला सुरूवात झाली होती.

“आम्ही दोघं रस्त्यावर पोहोचलो. तिथे चिटपाखरूही नव्हतं. नानानं एक सायकल रिक्षा थांबवली. त्या वयस्क रिक्षाचालकाला तो चढणीचा रस्ता चढणं झेपेना. नानानं त्याला उतरवलं आणि स्वतः रिक्षा ओढू लागला.

“नाना नसता तर त्या लोकांनी मारलंच असतं मला. नाटक न झाल्याचा सगळा राग माझ्यावर काढला असता. आजही ती आठवण आली की माझ्या अंगावर शहारा येतो,” असं अशोक सराफांनी लिहिलंय.

लैंगिक छळाचे आरोप ते ‘नाम’ फाऊंडेशन

नाना पाटेकरांनी मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. त्यांनी 1978 साली ‘गमन’ प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत.

त्यांनी ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली.

2014 मधील ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी साकारलेला ‘नटसम्राट’ही वेगळा ठरला. ‘देऊळ’ चित्रपटातील त्यांच्या पात्रावर आजही मीम्स होतात.

हिंदीतील परिंदा, अंगार, क्रांतिवीर, अपहरण या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.

विशेषत:, अन्यायाची चीड असलेला प्रखर असा ‘अँगी यंग मॅन’ त्यांनी आपल्या खास शैलीत उभा केला. म्हणूनच कदाचित राज ठाकरे यांनी वाहिलेल्या आदरांजलीत लिहिलंय की, “नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं.”

पण नाना पाटेकरांचं आयुष्यही असंच चढ-उतारांचं राहिलं. त्यांच्या आयुष्यातील सार्वजनिक स्वरूपात चर्चेत आलेली वादग्रस्त घटना म्हणजे त्यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप.

नाना पाटेकरांच्या आयुष्यातील सार्वजनिक स्वरूपात चर्चेत आलेली वादग्रस्त घटना म्हणजे त्यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप.

अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2008 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. या चित्रपटात ते दोघेही काम करत होते.

नानांनी हे आरोप नेहमीच नाकारले. भारतात #MeToo चळवळ सुरू झाली 2018 मध्ये ते पुन्हा समोर आलं. त्यानंतर तनुश्री दत्तानं गुन्हा दाखल केला आणि नाना नकारात्मक अर्थानं चर्चेत राहिले. पण, पुरेसे पुरावे न सापडल्याने पोलिसांनी जून 2019 मध्ये त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केलं.

“लैंगिक छळ म्हणजे काय? आम्ही सेटवर होतो आणि आमच्यासमोर 200 लोक बसले होते,” असं म्हणत त्यांनी ‘मिरर नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावरचे सगळे आरोप झिडकारले होते.

2015 साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांनी मकरंद अनासपुरे यांच्यासमवेत ‘नाम फाऊंडेशन’ची सुरूवात केली होती.

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथांकडे असलेल्या उदासीनतेविरुद्ध कृतीशील लढा देणं, हा यामागचा उद्देश.

आज महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना नाना पाटेकरांचं असं जाणं हे पापण्यांच्या कडा अधिक ओलावणारं आहे, एवढं नक्की.

नानांनी महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथांकडे असलेल्या उदासीनतेविरुद्ध कृतीशील लढा देण्यासाठी 'नाम फौंडेशन'ची स्थापना केली.

‘हेही चांगले आणि तेही चांगले’ अशा पद्धतीच्या वागण्यामुळे नाना पाटेकर ‘भूमिका घेण्याच्या’ बाबतीत फारसे ठाम नव्हते, अशी टीका त्यांच्यावर सतत व्हायची.

सर्वपक्षीय राजकारण्यांच्या तसे ते जवळचे होते.

‘बाबा आमटेही जवळचे आणि बाळासाहेब ठाकरेही जवळचे, असं कसं?’ असा प्रश्न त्यांना निखिल वागळेंनी ग्रेटभेटमध्ये विचारला होता.

त्यांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तरातून कदाचित नाना पाटेकरांच्या या ‘डुलत्या’ स्वभावाचा उलगडा होऊ शकतो.

नाना म्हणतात की, “मला जे आवडतं ते आवडतं. मी पक्षी आहे. मी कुठल्या फांदीवर बसायचं ते मी ठरवायचं. मी कुठलं फळ खायचं आणि कुठे शिटायचं, हे माझ्यावर अवलंबून आहे.”

पुढे एकेठिकाणी ते याच अनुषंगाने म्हणतात की, “सगळेच छान असतात रे.”

“मला कुराणमधील आयतं बोलता येतात. माझ्या गळ्यात ताईतसुद्धा आहे. कृष्णसुद्धा आहे. हे मी स्वत:हून घालत नाही बरं का. कुणीतरी दिलंय म्हणून घालतो.”

“मी देवळात जात नाही. शिर्डीला वगैरे मी जात नाही. मला साईबाबाचं दर्शन करायचं झालं तर मी इथेच हात जोडू शकतो आणि ते देव आहेत तर ते इथेही येऊ शकतात. इतकं साधं लॉजिक ते आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC