Home LATEST NEWS ताजी बातमी IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? – सविस्तर...

IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? – सविस्तर रिपोर्ट

6
0

Source :- BBC INDIA NEWS

IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? – सविस्तर रिपोर्ट

Published

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणात आयआयटी मुंबईने प्रा. सुर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय कामकाज अधिष्ठाता ( अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्स डीन) या पदावरुन हटवले आहे. प्रा. डुल्ला यांना हटवण्यात आले, त्यांचे निलंबन करण्यात आले नाही असे आयआयटी मुंबईच्या मीडिया कोऑर्डिनेटरने माध्यमांना सांगितले.

18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.

परीक्षेत मोबाइल वापरताना पकडले गेल्यानंतर विद्यार्थ्याने जीवन संपवल्याचे आयआयटीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते. त्यावर आयआयटीने क्षमा मागितली होती.

शिक्षकाने मुलाला परीक्षेत गैरव्यवहार करण्यास रोखल्यानंतर मुलाने हे पाऊल उचलले, असे आयआयटी प्रशासनाने आपल्या निवेदनात सांगितले होते, त्यानंतर त्यांनी 21 सप्टेंबर रोजी माफी मागितली.

या प्रकरणात प्राध्यापक आणि आयआयटीतील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयुष्य संपवण्यास प्रवृत्त करणे तसेच जातिवाचक शिवीगाळ करणे याविरोधात विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली.

जातिवाचक भेदभाव आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे आरोप आयआयटी मुंबईकडून फेटाळण्यात आले.

मुंबई आयआयआटी फॅकल्टी फोरमने विद्यार्थ्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे त्याच वेळी त्यांनी संबंधित शिक्षकाला पाठिंबा देखील दर्शवला होता. प्रा. डुल्ला यांना डीन पदावरुन हटविण्यात आले.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी राजीनामा दिला नसल्याचे आयआयटीने स्पष्ट केले आहे.

साहिलच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप, IIT प्रशासनाची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घ्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC