Home LATEST NEWS ताजी बातमी Video : सीजेपीच्या आाशुतोष रांकांवर राजस्थानमध्ये हल्ला झाला ‘तो’ क्षण

Video : सीजेपीच्या आाशुतोष रांकांवर राजस्थानमध्ये हल्ला झाला ‘तो’ क्षण

3
0

Source :- BBC INDIA NEWS

Video : सीजेपीच्या आाशुतोष रांकांवर राजस्थानमध्ये हल्ला झाला ‘तो’ क्षण

Published

CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि इतर कार्यकर्ते राजस्थानमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीसाठी गेलेले असताना त्यांना मारहाण केली गेली. खुद्द आशुतोष यांनी X वर पोस्ट करत रामपुरा कंवरपुरामध्ये झालेल्या या घटनेची माहिती दिली.

या शाळेत पोहोचण्यापूर्वी काही लोक तिथे आपल्याला विरोध करण्यासाठी जमले होते असं रांका यांनी आणखी एका X पोस्टमध्ये म्हटलंय. राजस्थान पोलिसांना टॅग करत त्यांनी हा CJP च्या सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप केलाय.

आशुतोष रांका यांनी या घटनेसाठी स्थानिकांना दोष देऊ नका असं म्हणत शिक्षण मंत्री मदन दिलावर यांना थेट इशारा दिलाय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC