Home LATEST NEWS ताजी बातमी Video : निंबाळकरांसोबत जाण्याच्या प्रश्नावर कैलास पाटील यांनी दिलं ‘हे’ उत्तर

Video : निंबाळकरांसोबत जाण्याच्या प्रश्नावर कैलास पाटील यांनी दिलं ‘हे’ उत्तर

4
0

Source :- BBC INDIA NEWS

Video : निंबाळकरांसोबत जाण्याच्या प्रश्नावर कैलास पाटील यांनी दिलं ‘हे’ उत्तर

Published

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला. ‘मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं आणि यात मी निश्चितच पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांना प्राधान्य देईल,’ असे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच, ‘निधी मिळत नाही, काम करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे,’ असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर विरोधकांची कोंडी करत असल्याचा आरोप केला.

उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबाबतही त्यांनी माहिती दिली. बीबीसी मराठीसाठी मुस्तान मिर्झा यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC