Home LATEST NEWS ताजी बातमी आईनं घेतलेलं औषध गर्भातल्या बाळापर्यंत कसं पोहोचतं? संशोधकांनी शोधली नवी चिप

आईनं घेतलेलं औषध गर्भातल्या बाळापर्यंत कसं पोहोचतं? संशोधकांनी शोधली नवी चिप

5
0

Source :- BBC INDIA NEWS

आईनं घेतलेलं औषध गर्भातल्या बाळापर्यंत कसं पोहोचतं? संशोधकांनी शोधली नवी चिप

Published

गर्भधारणा, गरोदरपण आणि बाळाला जन्म देणं या अतिशय नाजूक आणि तितक्याच काळजीच्या मानल्या गेलेल्या टप्प्यांबाबत गेली अनेक वर्षं जगभरात संशोधन सुरू आहे. त्यातही बाळ जन्माला येईपर्यंत त्याचं संरक्षण हे अतिशय भावनिक आणि काळजीचं असतं.

गरोदरपणाच्या काळात त्या होणाऱ्या आईला अनेक औषधं दिली जातात. ती त्या काळात घेणं सुरक्षित आहेत की नाही याबद्दल डॉक्टर आणि संशोधकांकडे पुरेशी माहिती नसते. याचं मुख्य कारण म्हणजे गरोदरपणाच्या काळात प्लेसेंटाचा थेट अभ्यास करणं अवघड असतं.

ही समस्या सोडवण्यासाठी ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन विमेन्स हेल्थ (ICMR-NIRWoH) आणि आयआयटी मुंबई (IIT Bombay) यांच्या संशोधकांनी मानवी प्लेसेंटाच्या महत्त्वाच्या कार्यांची प्रयोगशाळेत पुनर्निर्मिती करणारी ‘प्लेसेंटा ऑन चिप’ तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे.

या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय Biofabrication या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. या संशोधनात अंशुल भिडे, सौरव मुखर्जी, डॉ. किंजाल्का घोष, प्रा. अभिजित मजुमदार आणि प्रा. दीपक मोदी यांचा सहभाग होता.

स्टोरी- ओंकार करंबेळकर

शूट- शाहिद शेख

एडिट- निलेश भोसले

SOURCE : BBC