Source :- BBC INDIA NEWS

पावसाळ्यातच फुलणारी ही दुर्मिळ फुले महाराष्ट्रात कुठे दिसतात?
Published
दरवर्षी पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या देवाचे गोठणे गावाजवळचा कातळसडा पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरतो. पडिक वाटणाऱ्या या कातळसड्यावर दीपक्याडी, कापरी कमळ आणि परिसरातील हंसतुरा यांसारख्या दुर्मिळ वनस्पती आढळतात.
यापैकी काही वनस्पती एकेकाळी नामशेष झाल्या असल्याचं मानलं जात होतं, तर काही आजही मोजक्याच ठिकाणी आढळतात. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, अशा वनस्पतींचे अधिवास हे जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत.
रिपोर्ट आणि शूट- मुश्ताक खान
व्हीडिओ एडिट- शरद बढे
प्रोड्यूसर- प्राजक्ता धुळप
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




