Home LATEST NEWS ताजी बातमी शुभमन गिलचे द्विशतक, वेस्ट इंडिजविरोधात भारताची शानदार खेळी

शुभमन गिलचे द्विशतक, वेस्ट इंडिजविरोधात भारताची शानदार खेळी

4
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतीय कर्णधार शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले.

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा विजय झाला.

शुभमन गिलने शानदार द्विशतक केले. गिलने 117 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केले. त्याने 26 फोर आणि 8 सिक्स मारले. शुभमनने 133 बॉलमध्ये 223 रन्स केले.

रोहित शर्माने देखील शतक झळकावले.

भारताने केवळ दोन विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

वेस्ट इंडिजने भारतासमोर 405 रनांचे लक्ष्य ठेवले होते.

त्यांना प्रत्युत्तर देताना भारताने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 255 रनांची भागीदारी झाली.

शतक साजरे करून रोहित शर्मा आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आला. तीन फोर आणि एक सिक्स लगावून विराटने 29 रन बनवले आणि तो आऊट झाला.

वेस्ट इंडिजची मोठी धावसंख्या; तीन फलंदाजांची शतके

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 7 गडी गमावून 405 धावांची मोठी धावसंख्या उभारली. वनडेमध्ये वेस्ट इंडिजची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

जॉन कॅम्पबेलने 9 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 101 रन केले. शाय होपने 8 फोर आणि 3 सिक्ससह 104 धावा केल्या. तर अमीर जांगूने 13 फोर आणि 3 सिक्ससह 114 धावा करत शतक झळकावले.

सलामीवीर जॉन कॅम्पबेलने 68 चेंडूंमध्ये 101 धावा केल्या.

भारताच्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. परिधीन कृष्णाने एक विकेट घेतली.

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या 12 हजार धावा पूर्ण

या सामन्यात रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार धावांचा टप्पा गाठला.

भारताकडून अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी हा विक्रम केला आहे.

रोहित शर्मा

वनडेमध्ये वेस्ट इंडिजची सर्वोच्च धावसंख्या

भारताविरुद्ध 405 धावा करणाऱ्या वेस्ट इंडिजची एकदिवसीय सामन्यांमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी या संघाने इंग्लंडविरुद्ध 389 धावा केल्या होत्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC