Home LATEST NEWS ताजी बातमी ‘सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांकडून अटक’ –...

‘सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांकडून अटक’ – रत्ना सिंह

5
0

Source :- BBC INDIA NEWS

सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हा फोटो पोस्ट करत लिहिलं,

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना आज (14 ऑक्टोबर) पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अटक केली असल्याचं सीजेपीच्या कायदेशीर बाबींच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी म्हटलं आहे.

रत्ना सिंह म्हणाल्या, “आत्ताच माहिती मिळाली आहे की, सौरव, आशुतोष आणि अजिंक्य यांना पुढील तासाभरात मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात एसईएम (सब-डिव्हिजनल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट) यांच्यासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. आपल्या माहितीसाठी सांगते की, ताब्यात घेतल्यापासूनची 24 तासांची मुदत लवकरच संपणार आहे.”

रत्ना सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “त्यांच्यावर अनाधिकृत प्रवेश, जामिनाच्या अटींचं उल्लंघन आणि सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणं यांसह इतर आरोप ठेवण्यात आले आहेत.

“त्यांना सकाळी एसईएम न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

“रात्री उशिरापर्यंत त्यांना त्यांच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. पहाटे 3 वाजता त्यांना एका खासगी व्हॅनमधून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या बेकायदेशीर कारवायांनंतरही त्यांचा आत्मविश्वास टिकून आहे.”

पोलिसांनी मंगळवारी सकाळी जंतर-मंतर येथून सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या तिघांना ताब्यात घेतले होते.

रत्ना सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं, “सध्या दिल्ली पोलीस एका विशिष्ट ‘नियमावली’नुसार काम करत असल्याचं दिसून येत आहे. ही नियमावली वरिष्ठांकडून प्राप्त आदेशांच्या आधारे ठरवली जाते. पोलीस कायद्याला डावलून या नियमावलीचं पालन करत आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “जंतर-मंतरवर केवळ तिरंगा फडकवण्यासाठी गेलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचं आम्ही पाहिलं. जवळपास 24 तास उलटले आहेत, तरीही त्यांना अद्याप कोणत्याही वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सुरुवातीला त्यांना ताब्यात घेण्याची किंवा अटक करण्याची कारणंही सांगण्यात आली नव्हती. नंतर अटकेची कारणं सांगण्यात आली. मात्र, सध्याच्या परिस्थितीत दिल्ली पोलीस मनमानी पद्धतीने काम करत आहेत, हाच खरा प्रश्न आहे.”

रत्ना सिंह म्हणाल्या, “पोलिसांनी केवळ सामान्य कार्यकर्त्यांना भेटण्यापासून रोखलं नाही, तर सकाळपासून तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनाही त्यांना भेटू दिलं नाही. घटनास्थळी उपस्थित पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि इतर अधिकारी सातत्याने वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशांनुसार काम करत असल्याचं सांगत होते. मग दिल्ली पोलिसांना हे असे आदेश कोण देत आहे, ते कोण आहेत जे स्वतःला कायद्यापेक्षाही वरचढ समजतात?”

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर तिघांचा फोटो पोस्ट करत लिहिलं, “कॉक्रोचेस अजिंक्य, आशुतोष आणि सौरव दास पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याच्या आत आहेत. कोणतीही गोष्ट त्यांचं मनोबल खच्ची करू शकत नाही.”

आंदोलनासाठी निर्धारित स्थळांच्या यादीतून जंतर-मंतरला वगळलं

कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांना मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोघांनी जंतर-मंतरच्या बंद प्रवेशद्वार ओलांडून आत प्रवेश केला होता.

दरम्यान, या घटनेच्या एक दिवस आधीच दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकलं होतं.

13 ऑक्टोबर रोजी आशुतोष रांका यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर एक व्हीडिओ शेअर केला होता. या व्हीडिओमध्ये आशुतोष आणि सौरव दास, संघटनेचे राष्ट्रीय प्रभारी अजिंक्य शिंदे यांच्यासोबत जंतर-मंतरच्या बंद प्रवेशद्वारावर चढून परिसरात प्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतलं.

लुटियन्स दिल्लीतील जंतर-मंतरमध्ये प्रवेश करण्याचा हा प्रयत्न, आंदोलनासाठी निर्धारित स्थळांच्या यादीतून त्याला वगळण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी झाला.

जंतर-मंतर

दिल्ली पोलिसांनी सोमवारी (12 ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनानुसार, शहराच्या विविध भागांमध्ये आंदोलने करण्यासाठी तीन नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, तसेच जंतर-मंतर येथे आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. याच ठिकाणी सीजेपीने जून आणि जुलैमध्ये मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर तत्कालिन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

परिपत्रकानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकांचा आंदोलन आणि धरणे करण्याचा अधिकार लक्षात घेऊन, सध्याच्या निर्धारित स्थळांना पर्याय म्हणून योग्य ठिकाणं निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली होती.

समितीच्या शिफारशींच्या आधारे जंतर-मंतरला आंदोलन स्थळाच्या दर्जातून वगळण्यात आलं असल्याचं परिपत्रकात म्हटलं आहे. यापुढे आंदोलनासाठी पर्यायी ठिकाणे म्हणून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान निश्चित करण्यात आले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC