Home LATEST NEWS ताजी बातमी ग्राऊंड रिपोर्ट : पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांनी सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला

ग्राऊंड रिपोर्ट : पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांनी सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला

5
0

Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांनी सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला

Published

बीडच्या सांडस चिंचोली येथील शेतकरी माऊली कदम यांनी पावसाअभावी 3 एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सोयाबीनला शेंगाच न आल्याने पीक वाचण्याची आशा उरलेली नसल्याचं ते सांगतात.

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण परिसरातही अशीच परिस्थिती आहे. पावसाअभावी मूग, सोयाबीन आणि कापूस पिकांचं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांनी उभं मूग पीक जनावरांना खाण्यासाठी सोडून दिलं आहे. मोसंबीच्या बागांनाही पाण्याअभावी फटका बसला आहे.

लातूरमध्ये पावसाची तूट 49 टक्के, तर परभणीत 45 टक्के आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. पीक नुकसानीचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील 286 गावं आणि 1,182 वाड्यांना 307 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता.

पाऊस आणखी लांबला तर महाराष्ट्रातील शेती आणि पाणीटंचाईची परिस्थिती किती गंभीर होऊ शकते?

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट- किरण साकळे

एडिट- निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC