Source :- BBC INDIA NEWS

दोन दशकांपासून ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर काम; मुंबईच्या ‘नॉईज मॉनिटर’ला तुम्ही भेटलात का?
Published
यावर्षी गणेशोत्सवात लाऊडस्पीकर, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आला. याच विषयावर आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक सुमैरा अब्दुलाली दोन दशकांहून अधिक काळ काम करत आहेत.
2003 पासून त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी डेसिबल लेव्हल म्हणजे आवाजाची पातळी मोजली आहे.
त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच ध्वनीप्रदूषणाविषयी जागरुकता वाढली आणि कोर्टालाही दखल घ्यावी लागली. म्हणूनच काहीजण सुमैरा यांना मुंबईच्या ‘नॉईज मॉनिटर’ म्हणूनही ओळखतात, तर काही जण त्यांना ‘नॉईज मिनिस्टर’ही म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




