Home LATEST NEWS ताजी बातमी महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, जाणून घ्या कोणत्या 7 प्रमुख सवलती मिळणार

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, जाणून घ्या कोणत्या 7 प्रमुख सवलती मिळणार

6
0

Source :- BBC INDIA NEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतीचं नुकसान समजून घेताना

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यात यावर्षी आशादायक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाअभावी पिके करपून गेली असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.

पावसाची स्थिती आणि पिकांच्या नासाडीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना आणि सवलतींचाही शासन निर्णयात उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, विरोधकांनीही राज्यातील दुष्काळाच्या स्थितीवरून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यासाठीची मागणी लावून धरली होती.

नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

कोणत्या सवलती आणि उपाययोजना जाहीर?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध उपाययोजना पुढीलप्रमाणे,

  • जमीन महसुलात सूट
  • पीक कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
  • कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
  • शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
  • रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
  • आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स

‘या’ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

राज्यातील 358 पैकी ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यांत म्हणजेच 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेले तालुके पुढीलप्रमाणे

नुकसान झालेले पिक

रायगड – श्रीवर्धन

रत्नागिरी – रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर

सिंधुदुर्ग – सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला

नाशिक – मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवस्ना, देवळा

धुळे – धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर

जळगाव – एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा जामनेर, जळगाव, भंडेगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल

नंदुरबार – अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापुर, तळोदा, अक्राणी

अहिल्यानगर – नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपुर, रहाता

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांशी चर्चा करताना

पुणे – भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर

सोलापूर – उ. सोलापूर, द. सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा

सांगली – मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ

सातारा – सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर

कोल्हापूर – पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड

छ. संभाजीनगर – छ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री

जालना – बदनापूर, घनसावंगी अंबड, जालना परतूर, मंठा भोकरदन, जाफ्राबाद

बीड – बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी

लातूर – लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, देवणी, जळकोट

धाराशिव – धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा

नांदेड – नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलुर, किनवट, हिमायतनगर, माहुर, धर्माबाद, उमरी, अर्धापुर, नायगाव

परभणी – पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी

हिंगोली – हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

नुकसान झालेले पिक

बुलढाणा – जळगावजामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा, शिंदेखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा

अमरावती – अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापूर

अकोला – अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर बार्शीटाकळी

वाशिम – वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा

यवतमाळ – यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव

वर्धा – वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी

नागपूर – नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर

भंडारा – भंडारा, पवनी, लाखंदूर

गोंदिया – तिरोडा

चंद्रपूर – चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजूरा कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा

गडचिरोली – गडचिरोली, चार्मोर्शी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे.”

“खरीप हंगामातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC