Home LATEST NEWS ताजी बातमी उज्जैन : रस्ता रुंदीकरणासाठी मशि‍दीचा भाग पाडण्यावरून वाढला तणाव

उज्जैन : रस्ता रुंदीकरणासाठी मशि‍दीचा भाग पाडण्यावरून वाढला तणाव

2
0

Source :- BBC INDIA NEWS

उज्जैन : रस्ता रुंदीकरणासाठी मशि‍दीचा भाग पाडण्यावरून वाढला तणाव

Published

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईदरम्यान तणाव वाढला.

सिंहस्थ 2028 च्या तयारीसाठी रस्त्याचं रुंदीकरण सुरू असताना, सोमवारी सकाळी शाही मशिदीवरून वाद सुरू झाला. ही मशीद 650 वर्षं जुनी असल्याचं सांगितलं जातंय.

27 सप्टेंबरच्या रात्रीपासून छत्री चौक परिसरातील मशिदीजवळ मोठ्या संख्येनं लोक जमले होते आणि 28 सप्टेंबरच्या सकाळी जमाव आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरू झाला आणि त्याने हिंसक वळण घेतलं.

जमावाकडून दगडफेक झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर केला. आता शाही मशीद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या विषयावर बोलताना उज्जैनचे जिल्हाधिकारी रोशन सिंह म्हणालेत की, ‘सिंहस्थ 2028 च्या तयारीसाठीच्या मास्टर प्लॅननुसार रस्तारुंदीकरण आणि इतर बांधकामं सुरू आहेत. यामध्ये सर्व धर्म आणि समुदायांचे लोक सहकार्य करत आहेत.’

उज्जैनचे शहर काझी खलीक उर रहमान म्हणालेत की, ‘रविवारी रात्री मशीद समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, समितीनं तोच भाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. अफवांमुळे काही लोक संतप्त झाले आहेत. यामुळे काही प्रमाणात संघर्ष झाला, पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे.’

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC